' कार चालकांनी उन्हापासून कारची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या..! – InMarathi

कार चालकांनी उन्हापासून कारची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वाढत्या उष्णतेपासून आपल्याला त्रास होऊ नये याची काळजी आपण घेत असतो, तशीच काळजी आपण आपल्या कारची देखील घ्यायलाच हवी.

आपल्याप्रमाणेच कारला देखील उन्हाचा त्रास होत असतो. यासाठी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे जरुरीचे आहे.

 

burning car

 

उन्हात बऱ्याचदा रस्त्यावर उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतल्याची किंवा चालत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना आपण बघत असतो. बऱ्याचदा अशा घटनेमुळे जीवितहानी झाल्याचे बघायला मिळते.

अशा वेळेस काही छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे अतिशय जरुरीचे आहे.

कारचे इंटिरिअर ज्यात कारचे बाह्य स्वरूप आणि कारच्या आतील डॅशबोर्ड, सीट्स, एसी सिस्टीम, यांचा समावेश होतो.

तसेच कारचे टायर्स, वायपर्स, इंजिन, कुलंट सिस्टीम, वायरिंग,होजेस, अशा सर्वच गोष्टींची काळजी नियमितपणे घेणे आवश्यक आहे आणि खास करून उन्हात  जास्त आवश्यक आहे.

सर्वात प्रथम उन्हात तुमची कार सावलीत पार्क करा. तुमच्या कार साठी कव्हर्ड पार्किंग मिळेल याची व्यवस्था करा. कव्हर्ड पार्किंग नसेल तर कार सावलीत पार्क करा.

सावली नसेल तर कार कव्हर्स मार्केटमधे उपलब्ध असतात, त्याचा वापर करा जेणेकरून तुमची कार उष्णता आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून सुरक्षित राहील. कारचे इंटिरिअर देखील महत्वाचे आहे.

 

audi under tree

 

ऊन आणि धुळीमुळे कारचा रंग खराब होतो. यासाठी कार रोज धुवून पुसून स्वच्छ ठेवली पाहिजे. कार बाहेरून तापल्यास आतील बाजूचे तापमान देखील वाढते आणि त्याचा कुलिंग सिस्टीम वर परिणाम होतो.

यासाठी दर सहा महिन्यांनी कार वॅक्सिंग आणि पॉलिशिंग करून घेणे महत्वाचे आहे, ज्यामुळे धुळीस मोठ्या प्रमाणात अटकाव होतो. ही झाली अगदी प्राथमिक काळजी.

वेळच्या वेळी कार सर्व्हिसिंग करून घेणे हे अतिशय महत्वाचे. बऱ्याचदा कार डीलर कडून घेतल्यावर 3 फ्री सर्व्हिसिंग वेळेत करून घेतली जातात आणि नंतर नियमितपणे सर्व्हिसिंग केले जात नाही.

बऱ्याचदा कारमधे बिघाड झाल्यावरच सर्व्हिसिंग करून घेतले जाते. यात पैसे आणि वेळ यांचा मोठा अपव्यय होतो. तेव्हा नियमितपणे सर्व्हिसिंग आवश्यक पण उन्हाळ्यात जास्त आवश्यक ठरते.

आता पाहूया काही महत्वाच्या गोष्टी -जसे टायर्स, वायपर्स, कुलंट सिस्टीम, एअरकंडिशनर, केबिन, विंडोज वगैरे.

यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स आम्ही देत आहोत. त्याकडे लक्ष पुरविले आणि या टिप्सची अंमलबजावणी केलीत तर तुमचा कार प्रवास निश्चितच सुखकर होईल.

या आहेत महत्वाच्या दहा टिप्स….

 

१ : कार मधील कुलंट सिस्टीम-

कुलंट ऑईलची तपासणी करणे,होजेस कडे लक्ष देणे,कुठे छोटे क्रॅक नाहीत नाहीत ना याची तपासणी करणे,सर्व जॉइन्ट्स व्यवस्थित आहेत ना याची खात्री करून घेणे.

 

car coolant inmarathi

 

होज इंजिन ब्लॉकला जेथे जोडलाय तो ढिला तर झाला नाहीय ना याची खात्री करून घेणे, हे अतिशय महत्वाचे आहे.

 

coolant in car

 

इंजिन थंड असताना होज हातांनी दाबून बघितल्यावर मऊ किंवा स्पंजा सारखा वाटत असेल तर त्वरित बदलून घेणे.

 

२: इंजिनबेल्ट –

कारचा इंजिनबेल्ट जो कारच्या अल्टनेटर, फॅन आणि इतर कॉम्पोनंट मधून सर्पाकार फिरत असतो,तो ठीक आहे की नाही? त्याचे काही छोटे भाग गहाळ तर झाले नाहीत ना? कुठे क्रॅक तर नाही ना? याची खात्री करून घेणे.

 

engine belt inmarathi

 

तसे काही आढळल्यास इंजिनबेल्ट वेळेवर बदलून घेणे आवश्यक आहे.

 

३ : वायपर्स –

गाडीच्या काचा साफ करण्यासाठी वायपर्स चालू स्थितीत असणे आवश्यक आहे.

उन्हात काचेवर धूळ जमा होते आणि गाडी चालवताना दृष्यमानता कमी होते, हाच त्रास पावसाचे पाणी काचेवर जमा झाल्यास, अथवा हिवाळ्यात धुक्यामुळे काच धुरकट झाल्यास समोरील रस्ता ठिक दिसत नाही. अशावेळेस वायपर्स चालू करून काच स्वच्छ केली जाते.

 

wipers

 

वायपर्समधे अडकलेला कचरा रोजच्यारोज साफ करणे,तसेच कार सुरू करण्यापूर्वी साफ आहेत याची खात्री करून घेणे अतिशय महत्वाचे आहे.तसेच वायपर्सचे रबर लायनिंग खराब असेल तर काच व्यवस्थित साफ होत नाही.

अपघातास निमंत्रण देण्याऐवजी वायपर्स बदलून घेणे जास्त सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

 

४ : सर्व प्रकारचे फ्लूईड्स चेक करणे.

 

fluids of car

 

कार ऑइल,ब्रेक्स तसेच पॉवरस्टेअरिंग आणि विंडशिल्ड वॉशर यांचे फ्लूईड्स चेक करून घ्या किंवा बदलून नवीन घाला.

 

५ : एअरकंडिशनर सिस्टीम आणि एअर फिल्टर्स –

काही जुन्या कार सोडल्यास आजकाल नवीन गाड्यांमध्ये एअरकंडिशनिंग सिस्टीम बसवलेली असते. उन्हात बऱ्याच भागातील टेम्परेचर ४५ अंशांच्या घरात गेलेय.

साहजिकच कारची बाहेरील बाजू तापल्याने केबिनमध्ये उष्णता वाढते. अशावेळेस बहुतेकजण एसी फुल करतात.

 

Auto-Air-Conditioning-System. inmarathi

 

तुमच्या कारमधील HVAC सिस्टीम वर याचा ताण येतो आणि काही वेळेस ही सिस्टीम बंद पडते. म्हणून एसी फुल करू नका. एसीचे व्हेंट्स तपासून स्वच्छ करा. रेफ्रिजरेशन सिस्टीम व्यवस्थित चालू असल्याची खात्री करून घ्या.

गाडी मधील एअर फिल्टर्स वेळेवर साफ करून घ्या. आजकाल पोलन फिल्टर्स देखील बसवलेले असतात. ते साफ असल्याची खात्री करून घ्या. जरूर पडल्यास टेक्निशियनची मदत घ्या.

 

६ : बॅटरी चेकिंग

गाडीच्या बॅटरीची कंडिशन चांगली असल्याची खात्री करून घ्या. उन्हाळ्यात बॅटरीचा चार्ज वाढलेला असतो, बॅटरी ओव्हरचार्ज होणार नाही याची काळजी घ्या.

 

battery checking

 

तसेच उन्हाळ्यात बाष्पीभवन होत असल्याने बॅटरी कडे लक्ष देणे आवश्यक आहे.बॅटरी वायर्स तपासून घेणे महत्वाचे आहे.
कार दोनतीन दिवसांपेक्षा जास्त काळ बंद ठेवणार असल्यास बॅटरी केबल डीसकनेक्ट करून ठेवणे श्रेयस्कर ठरते.

 

७ : टायर्स –

टायर्स नेहमीच उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे.बरेचसे अपघात टायर फुटल्याने होतात. टायरमधील हवेचा दाब नेहमीच तपासून बघावा.
शक्य असल्यास टायरमधे नायट्रोजन भरावा.

 

types-of-car-tyres

 

टायरच्या ट्रेड्समधे वाळू किंवा बारीक खडी, डांबरखडी अडकली नाहीय ना याची खात्री करून घ्या.

खिळे किंवा कोणतीही टोकदार वस्तू अडकली नाहीय याची खात्री करून घ्या कारण यामुळे टायर फाटू शकतो. टायरला फुगवटा आला नाहीना याची खात्री करून घ्या.

 

८ : डॅशबोर्ड आणि ब्रेक्स व ऍक्सीलेटर

गाडीच्या आतील इंटिरिअर मधील सर्वात महत्वाचा भाग. डॅशबोर्ड स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे.सर्व डिस्प्ले चालू आहेत आणि स्वच्छ आहेत हे बघणे आवश्यक. गाडीचे ब्रेक्स ही सर्वात मोठी काळजी घेण्यासारखी गोष्ट. ब्रेक ऑइल नेहमी तपासून बघणे आवश्यक आहे.

 

dashboard

 

ब्रेक्स न लागल्याने किंवा कमी लागल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. ब्रेक्स चांगल्या स्थितीत ठेवणे अत्यावश्यकच आहे.
ब्रेक्स प्रमाणे ऍक्सीलेटरची निगा आणि काळजी घेणे आवश्यक आहे.

वेळीच गाडीचे सर्व्हिसिंग करून घेणे आणि गाडीतील तांत्रिक गोष्टी व्यवस्थित असल्याची टेक्निशियनकडून खात्री करून घेणे आवश्यक आहे.

 

९ : गाडीची स्वछता

आपण गाडीच्या तांत्रिक गोष्टींची चर्चा केलीय आता गाडीच्या स्वच्छतेकडे वळूया. बऱ्याच कार बाहेरून चकचकीत दिसतात परंतु आतून अतिशय घाण असतात.लहान मुले गाडीत बसल्यावर काहीनाकाही खात असतात.यातील बरेच खाद्यपदार्थ गाडीत सांडतात.

पाणी किंवा शीतपेये सांडतात.मुलांनी खाल्लेले चॉकलेट आणि चुइंगम चे रॅपर्स गाडीतच पडून रहातात. कधीकधी मुलं चुइंगम सीटला चिकटवून ठेवतात.

 

car wash

 

हा सर्व कचरा वेळच्यावेळी साफ नाही केला तर गाडीत दुर्गंधी पसरते. शिवाय गाडी अतिशय अस्वच्छ दिसते. सीट साफ करण्याबरोबरच पायाशी असलेली मॅट्रेस बाहेर काढून गाडी पूर्ण साफ आणि कोरडी करणे आवश्यक आहे.

गाडीत डॅशबोर्डवर एखादे एअरप्युरीफायर लावल्यास जास्त चांगले.गाडीचे सिटकव्हर्स लेदरचे असतील तर बऱ्याचदा बंद गाडीत लेदरचा वास पसरलेला असतो.

गाडी सुरू करण्यापूर्वी गाडीचे दरवाजे पाच मिनिटं उघडे ठेवावेत म्हणजे वास निघून जाईल.

 

१० : ड्रायव्हिंग –

गाडी आणि गाडीच्या तांत्रिक गोष्टींचा विचार झाल्यावर तुम्ही अथवा तुमचा चालक यांचा आराम देखील महत्वाचा आहे.प्रवास सुरू करण्यापूर्वी चालकाची झोप पूर्ण झाली नसेल तर पटकन डुलकी लागून गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याच्या घटना भरपूर प्रमाणात दिसतात.

दारू अथवा अमली पदार्थांचे सेवन करून गाडी चालवल्यास हमखास गाडीवर नियंत्रण न राहिल्याने गाडी उलटून अथवा दुसऱ्या वाहनावर धडकून अपघात होतात.

 

car driving inmarathi

 

अंगात ताप असताना अथवा झोपेची गोळी किंवा काही मेडिसिन मधील गुंगी येणाऱ्या घटक पदार्थांमुळे कधीही गुंगी येऊ शकते किंवा डुलकी लागू शकते.

मोबाईलवर बोलणे अथवा मेसेजेस पहाणे, व्हिडिओ पहाणे यामुळे गाडी चालवण्याकडे झालेले दुर्लक्ष अपघातास कारणीभूत ठरते.
यासाठी नशापान करून गाडी चालवणे,सर्दीतापावरील औषधे घेऊन गाडी चालवणे,मोबाईलचा वापर करणे,ह्या गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत.

चालकाची झोप पूर्ण झालेली असली पाहिजे.रात्रीची २ ते ४ वाजे पर्यंतची वेळ ही ऐन झोपेची असते त्यामुळे शक्य झाल्यास ही वेळ विश्रांतीसाठी वापरा.  हे शक्य नसेल तर गाडी सुरू करण्यापूर्वी भरपूर झोप किंवा विश्रांती घेतलेली असली पाहिजे.

 

car headlight inmarathi
Which.uk

 

गाडीचे हेडलाईट आणि टेल लाईट व्यवस्थित असलेच पाहिजेत. त्यांची बॅटरी कनेक्शन्स तपासूनच गाडी सुरू करा.

एखादा जास्तीचा फ्लॅशलाईट जवळ बाळगा म्हणजे गाडी बंद पडल्यास मागून येणाऱ्या वाहनास सावध करता येईल किंवा मदत मागता येईल.

अधूनमधून थोडावेळ गाडी बंद करून पायांना आराम द्या आणि पायांची मोकळी हालचाल करा. गाडी बंद केल्याने तापलेली गाडी थोडी थंड व्हायला मदत होते.

वर दिलेल्या टिप्स लक्षात ठेवून गाडी सुस्थितीत ठेवा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करून उन्हाळ्यात आपली गाडी छान ठेवा आणि सुरक्षित प्रवास करा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?