फेसबुकवर ट्रोल्सना वैतागलात? ह्या युक्ती वापरून ट्रोलिंग निष्प्रभ करू शकता

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

फेसबुक आणि व्हाटसअप  हे सध्याचे सर्वात मोठे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आहेत. फेसबुकवर लहानातील लहान गोष्ट देखील वाऱ्यासारखी पसरते. त्यामुळे आपले मत मांडण्यासाठी सोशल मीडिया हे एक महत्त्वाचे साधन लोकांना मिळाले आहे. आज फेसबुकचा वापर आपल्या भारतात आणि जगातील इतर देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. फेसबुकवर येणाऱ्या पोस्टवरून आपल्या ज्ञानामध्ये नेहमीच भर पडत असते.

 

Facebook Artificial Intelligence.Inmarathi
thehindu.com

पण याच फेसबुकच्या माध्यमातून खूप वेळा लोकांना ट्रोल केले जाते आणि या ट्रोलिंगमुळे लोकांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागते. कधी – कधी या ट्रोलमुळे मनस्ताप देखील तेवढाच सहन करावा लागतो. पण अशा काही युक्त्या आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही या ट्रोल्सपासून वाचू शकता.

आपल्याला नेहमीच कंटाळवाणे, मूर्ख, त्रासदायक आणि वाईट माणसे इंटरनेटवर पाहायला मिळतात. तुम्हाला देखील अशा प्रकारच्या लोकांनी कधीतरी कोणत्यातरी तुमच्या पोस्टवरून त्रास दिला असेल. मग या लोकांबरोबर स्वतःला त्रास न करून घेता कसे वागावे? याबद्दल कॉलेज ह्यूमरच्या कम्युनिटी मॅनेजर एली युडिन यांनी सल्ला दिलेला आहे, त्यांची संपूर्ण नोकरी ही इंटरनेटवर अनोळखी माणसांशी बोलण्याची आहे.

तुम्हाला येणाऱ्या ट्रोलला कधीही मनावर घेऊ नका. सर्वकाही मस्करीत घ्या. जे काही तुम्ही येथे कराल ते सार्वजनिकपणे करा. कधीही त्याचा स्वतःला त्रास करवून घेऊ नका. सार्वजनिकपणे काही बोलल्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रेक्षकांची मदत होते. हे ट्रोल मोडीत काढण्यासाठी सर्वात जालीम अस्त्र आहे.

 

Facebook trolls.Inmarathi
focusjunior.it

दुर्लक्षित किंवा निशब्द करा 

कधीही आपण आपले काम असल्याशिवाय कोणालाही ऑनलाईन प्रतिसाद देत नाही. त्यामुळे अनोळखी लोकांच्या बोलण्याचा आपल्यावर परिणाम करून घेऊ नये. कधीतरी मूर्खपणा करावा यासाठी हे लोक असे काहीतरी कमेंट तुमच्या पोस्टवर टाकतात. पण त्यांच्याकडे कधीही लक्ष देऊ नये .

बहुतेकदा अशा ट्रोल करणाऱ्या लोकांकडे लक्ष न देता, त्यांच्या बोलण्याला दुर्लक्षित करावे. पण कधी – कधी ही ट्रोल करणारी माणसे असे काही बोलतात, जे तुम्ही सहन करू शकत नाही. त्यावेळी त्यांना निशब्द करून त्यांच्या मूर्खपणाच्या बॊलण्याचे त्याच पद्धतीने उत्तर देणे तेवढेच गरजेचे आहे.

स्त्रियांच्या बाबतीत अशा प्रकारचे ट्रोलिंग मोठ्या प्रमाणावर होते. जर तुम्ही स्त्री असाल आणि जर तुम्ही एखादी पोस्ट टाकली तर कोणी पुरुष मंडळी तुम्हाला त्या पोस्टवरून सतावणार, त्यावर सतत कमेंट्स करणार. अशावेळी तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका किंवा तुम्ही त्याच्या त्या कमेंटला लाईक करून त्याला गप्प करू शकता. असे केल्याने त्यांना वाटेल की, तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात आणि ते गप्प बसतील.

 

Facebook trolls.Inmarathi1
kinja-img.com

कधीही घाबरू नका 

जर कुणी तुम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला घाबरून जाऊ नका. तुम्ही त्याला घाबरलात, तर त्याला वाटेल की तो जिंकला. त्यामुळे विचार करून आणि आपल्या ऑनलाईन मित्रांच्या साथीने त्या ट्रोलला योग्य ते उत्तर द्या आणि त्याला गप्प करा. पण उगाच त्याच्याशी वाद घालत बसू नका आणि या ट्रोलना घाबरून तुमचे मत सोशल मिडियावर मांडण्याचे बंद करू नका.

अशाप्रकारे तुम्ही या इंटरनेटवर येणाऱ्या ट्रोलना घाबरून न जाता, योग्य ते उत्तर देऊन गप्प करू शकता.

मग आता तुम्हाला कधी कुणी फेसबुकवर ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तर वरील युक्ती वापरून या ट्रोल करणाऱ्या लोकांना गप्प करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?