' एका छोट्याश्या चुकीनेही तुमचा स्मार्टफोन हॅक होऊ शकतो ! सुरक्षित करायचाय? हे वाचा.. – InMarathi

एका छोट्याश्या चुकीनेही तुमचा स्मार्टफोन हॅक होऊ शकतो ! सुरक्षित करायचाय? हे वाचा..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सध्या अँड्रॉइड फोन्स ने धुमाकूळ घातला आहे, अगदी अबालवृद्ध आता अँड्रॉइड मोबाईलचा वापर करत आहेत. या आधी असलेले फिचर मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या पण दिवसेंदिवस कमी होत आहे. टेलिफोन तर आता इतिहासजमा होण्याचा मार्गावर आहेत. पण अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या लोकांची वाढती लोकसंख्या आणि त्यात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे व ती जगाच्या लोकसंख्येच्या ४०% आहे.

परंतु या स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे एक नवी समस्या निर्माण झाली आहे. ती म्हणजे लोकांच्या प्रायव्हेट डेटाच्या रक्षणाची!

आज अँड्रॉइड फोन लोकांची गरज बनला आहे. लोक बँकिंग, ऑनलाईन पेमेंट आणि खरेदीविक्री साठी स्मार्टफोनचा वापर करतात. अश्यावेळी अँड्रॉइड फोन एखाद्या मालवेअरच्या मदतीने हॅक करणे अधिक सोपे झाले आहे. यातून वापरकर्त्याचा प्रायव्हेट डेटा जशे बँक पासवर्ड, सोशल मीडिया साईट्स वरील माहिती, खाजगी फोटोग्राफस, सिक्रेट फाईल्स या सर्वाना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या प्रायव्हेट माहितीच्या संरक्षणासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

oled-display-inmarathi
androidauthority.com

फोन हॅक कसे होतात यावर एक्सपर्ट सांगतात की जेव्हा आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये कुठलीही अँप इंस्टॉल करतो तेव्हा आपण ती अँप गुगल प्ले स्टोअर कडून व्हेरिफाय आहे का नाही हे बघत नाही.

कुठलेही थर्ड पार्टी अँप डाऊनलोड करतो, ज्यात बऱ्याचदा मालवेअर कंटेंट असतो. जो आपल्या फोनमध्ये प्रवेश केल्याबरोबर फोनमधील डेटाची चोरी करतो. आपल्या फोन मधील कुठल्या फिचरचा वापर करण्याची परमिशन अँपला द्यायची ते आपल्या हातात असते परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करून सर्व ऍक्सेस अँप ला देऊन टाकतो. ज्यामुळे आपली माहिती चोरने अधिक सोपे होते.

मग अश्या मोबाईल हॅकिंग पासून आपल्या मोबाईलचे रक्षण कसे करायचे याबाबत एक्सपर्ट सांगतात की अँप प्ले स्टोअर व्हेरिफाईड आहे का नाही हे तपासायचे. प्ले स्टोअर वगळता दुसरीकडून कुठूनच अँप डाउनलोड करू नये. अँपला मोबाईल ऍक्सेसचा सर्व परमिशन्स कधीच देऊ नये. गुगल प्ले प्रोटेक्ट ऑन करून घेणे.

 

indiatoday.in

आपल्या थर्ड पार्टी अँप कधीच इंस्टॉल करू नयेत. cयामुळे व्हेरिफाईड अँप वापरणे गरजेचे आहे. मागे पाकिस्तानने हॅकर्सच्या मदतीने अश्याच प्रकारे अमेरिकेच्या व ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांची व राजदूत निवासातील कर्मचाऱ्यांची माहिती चोरली होती. आपल्या मोबाईल ला अश्या थर्ड पार्टी अँप्स तसेच मालवेअरपासून वाचवण्यासाठी एक महत्वाच फिचर आहे त्याचं नाव आहे गुगल प्ले प्रोटेक्ट, आता आपण काही स्टेप्समध्ये जाणून घेऊयात की हे सिक्युरिटी फिचर ईनेबल कसं करायचं.

स्टेप १ : स्मार्टफोनमधील सेटिंग्स आयकॉन वर क्लीक करा.

स्टेप २ : स्क्रोल केल्यावर तुम्हाला मोअर सेटिंग्स हा ऑपशन दिसेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप ३ : त्यातल्या सेक्युरिटी ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप ४ : सेक्युरिटी वर क्लिक केल्यावर तुम्हाला गुगल प्ले प्रोटेक्ट हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप ५ : इथे स्कॅन डिव्हाइसेस फॉर सेक्युरिटी थ्रीट आणि इंपृव्ह अँप डिटेक्शन हा ऑप्शन दिसेल.

स्टेप ६ : त्या ऑप्शनला ईनेबल केल्यावर लगेच आपल्या डिव्हाईसची सेक्युरिटी वाढते आणि व्हायरसचे अटॅक होण्याचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?