सकाळी उठून जॉगिंगला जाण्याचा कंटाळा येतो? ह्या ९ गोष्टी तुमचं जॉगिंग प्रचंड आनंददायी करतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्या सर्वांना फिट राहायचं आहे पण त्यासाठी कुठलीही मेहनत घ्यायची नाहीये. पण फक्त आपल्याला वाटत म्हणून आपण फिट राहू शकत नाही तर त्यासाठी मेहनत करावी लागते.

मग त्यासाठी आपण जिम मध्ये जातो, तिथे गेल्यावर पहिल्यांदा काही करावं लागतं असेल तर ते म्हणजे रनिंग.

अनेकजण सकाळी सकाळी जॉगिंगला देखील जातात. पण रनिंग हे नेहमी बोरिंग वाटत असतं आणि म्हणून हळूहळू आपला त्यातील रस कमी होत जातो.

म्हणून आज आम्ही आपल्यासाठी काही अश्या टिप्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमची जॉगिंग किंवा रनिंग अधिक इंटरेस्टिंग होईल.

१. फन रन्स :

 

running-tips-inmarathi08
tcagenda.com

आपल्या रनिंगला आणखी रंजक बनवण्यासाठी तुम्ही ह्या “फन रन्स” चा आधार घेऊ शकता.

ह्यामध्ये तुम्ही चिखलातून रनिंग करण्याची मजा अनुभवू शकता. त्यात काही अडथळे देखील घातले जातात ज्यामुळे रनिंगची ही पद्धत अतिशय अॅडवेन्चरस होऊन जाते.

२. सिनरन्स :

 

mensxp.com

जर तुम्ही एखाद्या समुद्र किनारी राहत असाल, तर समुद्र किनारी रनिंग नक्की करा. त्याची मजाच काही और असते.

तसेच तुम्ही नदी किंवा तलावाच्या काठाने देखील रनिंग करू शकता. ह्यामुळे तुम्हाला रनिंग करता करता एक सुंदर असा निसर्गरम्य देखावा देखील बघायला मिळेल.

३. ट्रेल रन्स :

 

running-tips-inmarathi07
decathlon.in

जर तुम्ही रस्तावरून, बगिच्यात किंवा ट्रेडमिलवर धावून कंटाळला असाल तर तुम्ही ट्रेल रनिंग ट्राय करू शकता.

जवळपासच्या एखाद्या चढावाच्या ठिकाणी किंवा डोंगराळ ठिकाणी तुम्ही ट्रेल रनिंगचा आनंद घेऊ शकता.

४. मित्रांसोबत जॉगिंग :

 

Feeling that runners high
active.com

जर एकटे एकटे धावून कंटाळले असाल तर तुम्ही तुमच्या मित्र/मैत्रिणींसोबत जॉगिंगला जाऊ शकतो. ह्यादरम्यान तुम्ही अनेक विषयांवर चर्चा करू शकता, काही नवीन गोष्टी जाणून घेऊ शकता.

ह्यामुळे तुम्ही फिट देखील राहाल आणि तुम्हाला जॉगिंग करताना कंटाळा देखील येणार नाही.

५. आपल्या कुत्र्यासोबत रनिंग करा :

 

running-tips-inmarathi05
dailydogstuff.com

जर तुमच्याकडे तुमचा एक छान केसाळ मित्र आहे तर तुम्हाला जॉगिंगसाठी आणखी कुणाचीही गरज नाही. तुम्ही त्याच्यासोबत आपल्या रनिंगची मजा घेऊ शकता.

६. पैज लावा :

 

running-tips-inmarathi03
runwaterloo.com

एकटे धावण्यात ती मजा नाही पैजमध्ये आहे. पैज म्हटलं की सर्वांनाच जिंकावस वाटतं त्यामुळे त्यात आपल्या इंटरेस्ट वाढतो आणि त्यासाठी आपण मेहनत करायला देखील तयार असतो.

त्यामुळे दर आठवड्याला तुम्ही आपल्या मित्रांसोबत धावण्याची पैज लावू शकता.

७. ट्रेडमिलवर टीव्ही लावा :

 

running-tips-inmarathi02
menshealth.com

जर तुम्ही जिममध्ये ट्रेडमिलवर रनिंग करत असाल तर त्यासमोर एक टीव्ही लावून घ्या. आणि त्यावर आपले आवडते कार्यक्रम बघता बघता रनिंग करा. म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही.

तसेच ह्यावेळी तुम्ही रनिंग विषयी माहिती जाणून घेऊ शकता, जॉगिंग प्रोग्राम्सबघू शकता जे तुम्हाला प्रेरणा देतील.

८. चांगले हेडफोन वापरा :

 

running-tips-inmarathi01
iamlivingit.com

रनिंग करताना गाणी ऐकणे हे खरंच तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे शरीरात एक वेगळीच उर्जा संचारते.

त्यामुळे रनिंग करताना चांगल्या प्रतीचे हेडफोन्स वापरा. ज्यावर तुम्ही तुमच्या आवडीची गाणी ऐकू शकता. ज्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुमची रनिंग बोरिंग होणार नाही.

९. चांगले शूज निवडा :

 

health-inmarathi05

रनिंग करायचं म्हटलं तर चांगल्या प्रतीचे बूट असणे खूप महत्वाचं असतं. कारण रनिंग ही एक शारीरिक क्रिया आहे त्यामुळे बूट चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे.

त्यामुळे रनिंग साठी बूट घेताना त्यांच्या क्वालिटी, सोल, कम्फर्ट इत्यादी सर्व बघूनच घ्यावे. त्यामुळे तुम्हाला रनिंग करताना त्रास होणार नाही.

रोज ३० मिनिटे रनिंग करणे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, त्याने आपले शरीर निरोगी आणि वजन नियंत्रणात राहते.

त्यामुळे फिट राहण्यासाठी रोज रनिंग करा आणि त्याला आणखी रंजक बनविण्यासाठी वरील गोष्टींचा नक्की अवलंब करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?