' विदेशात गाडी चालवण्यासाठी International Driver’s License कसं मिळवाल? – InMarathi

विदेशात गाडी चालवण्यासाठी International Driver’s License कसं मिळवाल?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

Driver’s License कसं मिळवायचं हे आता सगळ्यांनाच माहित झालं आहे, आता तर ऑनलाईन अप्प्लाय करूनही Driver’s License सहज मिळवता येतं किंवा एखाद्या मोटार ट्रेनिंग स्कूल वाल्याला पकडलं तर गाडी देखील शिकता येते आणि सोबत Driver’s License देखील काढून मिळतं, पण हे जे Driver’s License मिळतं, ते आपण केवळ भारतात गाडी चालवताना वापरू शकतो, आपल्या देशाबाहेर हे Driver’s License चालण्यासारखं नाही, जर तुमचा बाहेरच्या देशात फिरायला जाण्याचा प्लान असेल आणि तिकडे तुम्ही स्वतः गाडी चालवणार असाल तर तुम्हाला गरज आहे- International Driver’s License ची, जे तुम्हाला बाहेरच्या देशांमध्ये गाडी चालवण्याची मुभा देते. पण आपल्याकडे अजूनही बऱ्याच जणांना हे International Driver’s License कसं मिळवावं याबद्दल पुरेशी माहिती नाही, तीच माहिती आज आम्ही तुमच्यासमोर उलगडत आहोत.

IDP-marathipizza01
musafirhuyaron.com

आपल्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या कार्यक्षम कारभारामुळे भारतात International Driver’s License मिळवणे हि आता पूर्वी सारखी गुंतागुंतीची प्रक्रिया राहिली नसून, अगदी सहज तुम्ही हे International Driver’s License मिळवू शकता.

रस्ते मंत्रालयाने देशभर आपली RTO offices स्थापित केली आहेत आणि यांच्याकडेच आपल्या क्षेत्रातील चालकांना International Driver’s License प्रदान करण्याचा अधिकार आहे. या व्यतिरिक्त तुम्ही International Driver’s License साठी थेट WIAA – Western India Automobile Association कडे देखील अप्लाय करू शकता.

 

सर्वात प्रथम जाणून घेऊया की International Driver’s License कोणत्या कागदपत्रांची गरज असते?

१) देशांतर्गत गाडी चालवण्यासाठी मिळालेलं वैध Driver’s License
२) पर्मनंट अॅड्रेस प्रुफ
३) आयडेंटीटी प्रुफ आणि पासपोर्ट
४) ४-५ पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स
५) एयर तिकिट्स आणि व्हिसा
६) मेडिकल सर्टिफिकेट

IDP-marathipizza02
india.com

सर्वप्रथम तुम्हाला https://parivahan.gov.in/sarathiservice/dlServicesDet.do या वेबसाईटवर जाऊन International Driver’s License साठी ऑनलाईन अॅप्पलीकेशन फॉर्म भरावा लागतो. त्यात सर्व महत्त्वाची माहिती भरल्यावर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे, फोटो स्कॅन करून अपलोड करावे लागतात. त्यानंतर International Driver’s License साठी फीसचे पेमेंट करावे लागते.

हे सर्व झाल्यावर तुम्हाला स्वत: RTO office मध्ये हजर राहून ओरीजनल कागदपत्रे दाखवावी लागतात. या सर्व प्रक्रीये दरम्यान कुठेही चूक झाल्यास तुमचे International Driver’s License चे अॅप्प्लीकेशन रिजेक्ट होऊ शकते. जर सर्व काही योग्यरीत्या पार पडले तर तुमचे नवे कोरे International Driver’s License तुमच्या हातात पडेल.

हे International Driver’s License इश्यू केलेल्या डेट पासून पुढील १ वर्ष valid असते. त्यानंतर दरवर्षी तुम्हाला तुमचे International Driver’s License renew (नुतनीकरण) करावे लागते. ही renew प्रोसेस तुम्ही जवळच्या RTO office मध्ये करू शकता किंवा जर तुम्ही भारताबाहेर असाल तर त्या देशातील Indian Embassy मध्ये जाऊन तुम्ही तुमचे International Driver’s License हे renew करून घेऊ शकता.

खाली दिलेल्या देशांमध्ये भारतीय व्यक्ती International Driver’s License सह गाडी चालवू शकतो.

IDP-maratahipizza04

IDP-marathipizza05

टीप: जर तुम्ही कोणत्याही देशात गेलात तर पहिले ६ महिने तुम्हाला International Driver’s License ची गरज पडत नाही. पहिले ६ महिने तुम्ही तुमच्या Indian Driver’s License सह गाडी चालवू शकता.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?