मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर काय कराल? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

मोबाईल ही किती आवश्यक गोष्ट झाली आहे हे कुणालाही वेगळं सांगायला नको. कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त सोयी असलेले अँड्रॉइड मोबाईल ते जास्तीत जास्त किंमत असलेले स्टेटस सिम्बॉल असलेले मोबाईल.

अशी सरधोपट दोन गटात विभागणी केली तरी मोबाईलचं महत्त्व कमी होत नाही. आजकाल बहुतेक सर्व लोक स्मार्टफोन वापरतात. पण अपवादात्मक रित्या सुरुवातीला असलेले साधे फोन आजी आजोबा लोकच वापरतात.

 

cell-phones-senior-citizens Inmarathi
Senior Citizens – LoveToKnow

पण नातवंडं, सुना यांच्या मदतीनं हे आजी आजोबा लोकसुद्धा स्मार्ट होऊ लागले आहेत. विविध ऍपनी माणसाचं जीवन फारच सोपं बनवलं आहे.

रेल्वेच्या तिकीटापासून सिनेमाचे तिकीट आणि कपड्यांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सारं काही एका अंगठ्यावर आणून दिलं आहे या तंत्रज्ञानानं. करलो दुनिया मुठ्ठी में हे गंमत वाटणारं वाक्य आता तंतोतंत खरं ठरलं आहे.

पण कधीकधी हा जीवाचा सखा मोबाईल हरवतो किंवा चोरीला गेला तर काय अवस्था होते? कारण हा मोबाईल तुमचं सारं काही असतं.. तुमची गॅलरी असते ‌.. तुमचं मनोरंजन असतं, तुमची बॅन्क असते.

एकाएकी मोबाईल हरवला तर दुसरा मोबाईल मिळेपर्यंत काय करायचं हा केवढा मोठा प्रश्न पडतो. तर… आज या लेखात मोबाईल हरवला तर काय कराल ही माहिती…

 

Finding missing cell phone Inmarathi
Today Show

१. रिपोर्ट-
तुम्ही ज्या कंपनीचं नेटवर्क वापरत असाल तर या कंपनीला डाटा प्रोव्हायडर असं म्हणतात. या कंपनीला आपलं सिम कार्ड लाॅक करायला सांगावं म्हणजे तुमचा मोबाईल त्याक्षणी बंद होतो.

त्याचबरोबर मोबाईलला एक MEI नंबर असतो जो प्रत्येक फोन सोबत वेगवेगळा असतो तो नंबर कंपनी देत असते तो नंबर देत असते तो नंबरही कळवला की कंपनी तुमचा फोन शोधायला मदत करु शकते.

कारण समजा चोरानं कार्ड टाकलं तरी तो नंबर काढू शकत नाही. त्यावरुन तो फोन शोधता येतो. तसंच पोलिसांची तक्रार दाखल करा. त्यामुळे तुमचे अनावश्यक फोन काॅल लक्ष देऊन बंद करता येतात.

 

sim block Inmarathi
Wired

२. विमा-
फोन जितका महाग असेल तितका तो जपून वापरावा..त्याचाही विमा उतरवावा.तो या स्थितीत लागू आहे का हे तपासून घ्यावे.

 

mobile-insurance Inmarathi
www.jagran.com

३. नवीन सिम कार्ड-
फोन हरवला की प्रथम नविन सिम कार्ड घ्या. ज्यामुळे तुमचं मूळ कार्ड ब्लाॅक होईल. कंपनी ते कार्ड चालू करण्यासाठी नाममात्र शुल्क आकारते. तसेच नवा फोन घेऊन त्यात तुमचे नंबर चालू करुन घ्या.

४. ट्रॅकिंग-
डिव्हाईस मॅनेजरच्या मदतीनं फोन ट्रॅक करायचा प्रयत्न करा. त्यासाठी गूगलची मदत घ्यावी.वायरलेस प्रोव्हायडरपासून तुमचा फोन प्रथम  करा.त्यामुळं चोर फोन रिसेट करु शकणार नाही.

की दुसरं सिमकार्ड त्यात बसवून वापरु शकणार नाही. त्याचबरोबरीने तुमचा IMEI नंबर दिला तर फोनचे लोकेशन ट्रेस होते. त्यासाठी हा नंबर *#०६# हा नंबर डायल करुन मिळवू शकता.

तो नंबर मोबाईल चोरीला गेल्यानंतर cop@vsnl.net वर मेल केला की मोबाईल ट्रॅकिंग सुरु होते आणि २४ तासात जरी सिम कार्ड बदलले तरीही मोबाईल ट्रॅक करता येतो.

 

mobile phone with gps and map in background
Mobile number Tracker

मात्र त्यासाठी तुमचा मेल आयडी, शेवटचा वापरलेला सिम कार्ड नंबर, मोबाईल माॅडेल, तुमचे नांव, पत्ता हे सर्व आवश्यक आहेत.

प्रत्येक मोबाईल मध्ये डिव्हाईस मॅनेजर असतोच. त्याच्या मदतीनं तुम्ही डेस्कटॉपवरून तुमचा मोबाईल ऑपरेट करु शकता.

गूगलच्या मदतीने तुम्ही आपलं डिव्हाईस आपल्या गूगल अकाऊंट सोबत सिंक्रोनाईझ केलं असेल तर डिव्हाईस मॅनेजर मधून आपला फोन कुठे आहे ते पाहू शकता. त्यावरुन डेस्कटॉपवरून त्याला लाॅक करु शकता.

किंवा त्यातील सर्व डेटा काढून टाकू शकता. हे करताना डेस्कटॉप जवळ नसेल तर एखाद्या मित्राचा फोनही वापरु शकता. पण त्यासाठी इंटरनेट हवं ते नसेल तर काही करता येत नाही.

पण यासाठी फोन लाॅक करायची सवय लावून घ्यावी. म्हणजे फोन लाॅक असल्यामुळे जरी तो कुणाला सापडला किंवा कुणी घेतला तरी त्याची सेटींग्ज सहजासहजी वापरु शकत नाही.

गूगल मॅप हिस्ट्री ऑन असेल तर त्यावरुनही मोबाईल चे लोकेशन डेस्कटॉपवरून ट्रेस करता येते.

शक्यतो मोबाईल हरवू नये म्हणून काळजी घ्या पण त्यातूनही हरवलाच तर वर सांगितलेल्या टिप्स लक्षात घेऊन मोबाईल शोधून काढा… पोलिसांच्या मदतीशिवाय!!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?