सिलेंडर किती सुरक्षित आहे हे केवळ लिकेज चेक करून कळत नसतं !
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
दर महिन्याला कोणी आलं नाही आलं तरी काही फरक पडत नाही पण तो आलाच पाहिजे. कारण त्याच्या शिवाय आपली डाळ शिजत नाही. आणि तो म्हणजे आपल्या घरातला सिलेंडर. दर महिन्याला हा आपल्या घरी येत असतो. जेव्हा हा सिलेंडर आपल्या घरी येतो तेव्हा आपण तो लिक तर नाही तर हे आवर्जून चेक करतो. जे सुरक्षेच्या दृष्टीने करायलाच हवं. पण तुम्ही कधी हे चेक केलं आहे का की, तुमच्या घरी आलेला हा सिलेंडर किती जुना आहे, त्याची सुरक्षा तपासणी कधी झाली आहे? सुरक्षेच्या दृष्टीने जेव्हा आपण लिकेज चेक करतो तेव्हा हे देखील गरजेचं आहे असं नाही का वाटत तुम्हाला?

पण कोणीही ह्याची तपासणी करत नाही. आणि करणार पण कसं ना? म्हणजे लिकेज असेल तर कसं चेक करायचं ते तर आपल्याला माहित आहे, पण त्या सिलेंडरची सुरक्षा तपासणी कधी केली हे कसं माहित करून घेणारं? तर मंडळी जर लिकेज चेक करण्याची एक पद्धत असते तसचं तो सिलेंडर किती जुना आहे आणि त्याची सुरक्षा तपासणी कधी झाली आहे हे चेक करण्याची देखील एक पद्धती असते.

तर प्रत्येक एलपीजी सिलेंडरवर एक कोडवर्ड असतो, जो हे सांगतो की तुमच्या घरी जो सिलेंडर आला आहे त्याची सुरक्षा तपासणी किती वेळाआधी झाली आहे. हा कोडनंबर सिलेंडरला पकडायला जी गोल कडी असते त्याच्या खाली असलेल्या त्या तीन लोखंडाच्या पट्टींपैकी एका पट्टीवर लिहिलेला असतो. ह्या पट्टीवर ए, बी, सी, डी ह्या अक्षरांसोबत एक कोड लिहिलेला असतो. ज्यावरून हे कळत की, तुमच्या घरी आलेला हा सिलेंडर सुरक्षित आहे की नाही.

सिलेंडरवर लिहिलेल्या ह्या कोडमधील ए, बी, सी, डी हे महिने दर्शवितात. म्हणजेच ए म्हणजे जानेवारी ते मार्च, बी म्हणजे एप्रिल ते जून, सी म्हणजे जुलै ते सप्टेंबर, डी म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर. आणि ह्यानंतर लिहिलेले नंबर हे वर्ष दर्शवतात. म्हणजे जर कुठल्या सिलेंडरवर सी-19 असे लिहिले असेलं तर ह्याचा अर्थ असा होतो की, त्या सिलेंडरची तपासणी जुलै ते संप्टेंबर दरम्यान २०१९ साली झाली आहे. म्हणजेच तुमचा सिलेंडर हा पूर्णपणे सुरक्षित आहे. पण जर कुठल्या सिलेंडरवर ए-१५ असा कोड आहे तर तो सिलेंडर एक्सपायर झाला आहे.
कारण कुठल्याही सिलेंडरची तपासणी ही ६-८ महिन्याआधी झालेली असणे अपेक्षित आहे. जर असा सिलेंडर तुमच्या घरी आला तर लगेच तो बदलून घ्या. कारण तो असुरक्षित ठरू शकतो.

एलपीजी गॅस सिलेंडर ला बीआईएस३१९६ नुसार बनवल्या जाते. ज्या कंपन्यांकडे लायसेन्स सोबतच सीसीओई म्हणजेच कंट्रोलर ऑफ एकस्प्लोसिवचे अनुमती पत्र असते, त्याच कंपन्यांना सिलेंडर बनविण्याचा अधिकार असतो. गॅस सिलेंडर बनवत असताना त्याला हाय प्रेशर चाचणी पास करावी लागते. हे ह्यासाठी केले जाते कारण ह्यावरून ह्याची निश्चिती केल्या जाते की सामान्य परिस्थितीत तो सिलेंडर फुटणार नाही.
बीआईएस कोड्स आणि गॅस सिलेंडर नियम २००४ नुसार प्रत्येक सिलेंडर ग्राहकापर्यंत पोहोचण्याआधी त्याची सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असते. तसेच कुठलाही सिलेंडर हा त्याच्या प्रोडक्शनच्या १० वर्षानंतर परत त्याला सुरक्षा तपासणी आणि प्रेशर चाचणीला पाठवणे गरजेचे असते. त्यानंतर ५ वर्षांनी पुन्हा सिलेंडरची तिसऱ्यांदा त्याची चाचणी केली जाते. म्हणजेच एका सिलेंडरची लाईफ ही १५ वर्षांचीच असते ज्यात तीन वेळा त्याची तपासणी व्हायला हवी असते. ह्या चाचण्यांत पास झालेले सिलेंडर हे गॅस भरून समोर पाठवले जातात तर नापास झालेले सिलेंडर हे नष्ट केले जातात.
म्हणून ह्यानंतर जेव्हा कधी तुमच्याकडे सिलेंडर येईल तेव्हा नुसत लिकेज न तपासता त्याची सुरक्षा तपासणी ह्याआधी कधी झाली आहे हे देखील तपासून घ्या, म्हणजे कुठलाही अपघात होण्यापासून टाळता येईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.