स्त्रीला प्रचंड खुश करणारा चॅम्पियन व्हायचंय? बस्स फक्त ह्या ८ गोष्टी करा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===


स्त्रीचं मन जिंकणे हे प्रत्येक पुरुषाचं स्वप्न असतं, जर पुरुष स्त्रीला सुखी ठेवण्यात यशस्वी झाला तर पुरुषाचा पुरुषार्थ सिद्ध होत असतो. प्रणय करतांना आपल्या पार्टनरला आपल्या जास्तीत जास्त शरीरसुख देण्यासाठी आणि आनंदी ठेवण्यासाठी पुरुष नेहमी प्रयत्नशील असतात.

पुरुषांना बेडरूम मध्ये आणि आपल्या मनावर फक्त स्वतःच नाव कोरायचं असतं.

 

300 rise of an empire ecstasy scene inmarathi

 

पण बऱ्याचदा पुरुष अश्या काही चुका करतात ज्यामुळे त्यांचा पार्टनरला आनंद मिळू शकत नाही. ज्यामुळे त्यांच्या नात्यात स्नेह उरत नाही आणि प्रणय हा देखील निरस होऊन जातो.

ज्यामुळे पुरुष तसेच स्त्री दोघेही असमाधानी राहून जात असतात. मग पुढे या असमाधानाचे रूपांतरण कलहात होत असते. त्यामुळे हे सर्व टाळण्यासाठी आपल्या पार्टनरला प्रणया दरम्यान समाधानी वाटावे यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे होते.

पण हे करायचं कसं हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर, टेन्शन घेऊ नका आमच्याकडे उपाय आहे.

असे आठ उपाय आहेत ज्यांचे तुम्ही पालन कराल तर तुम्हाला नक्की हे जमवून आणता येईल आणि तुमच्या पार्टनरच्या मनात कायमचं स्थान निर्माण करता येईल!

 

sex-inmarathi
onlymyhealth.com

 

१) प्रणयपूर्व क्रीडा


प्रणयपूर्व क्रीडा हे संपूर्ण प्रणय साधनेतील सर्वात महत्वपूर्ण अंग समजलं जातं. परंतु बरेच पुरुष त्याला हलक्याने घेतात आणि सरळ मुख्य कार्यक्रमाकडे वळतात. ज्यामुळे प्रणय स्त्रीसाठी निरस होत जातो.

स्त्रीला उत्तेजित व्हायला वेळ लागत असतो आणि तिला उत्तेजित करण्यात प्रणयक्रीडा अर्थात फोरप्ले अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो.

पुरुष लवकर चरमानंदाला पोहचत असतो याउलट स्त्रीला वेळ लागतो. जर प्रणयक्रीडाच नसेल तर स्त्रीला चरमानंद उपभोगता येत नाही. यामुळे स्त्री असमाधानी राहून जाते.

 

sex-foreplay-inmarathi
lifecrust.com

त्यामुळे पुरुषांनी प्रणयादरम्यान प्रणयक्रीडेला महत्व देणं गरजेचं असतं. प्रणयक्रीडा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. प्रणयक्रीडेची सुरुवात एकमेकांना गोंजारत होते मग हळूहळू एकमेकांत हरवून जावे लागते.

एकमेकांचा अनुभव घेत हळुवार सुरवात करावी लागते. जर हे करण्यात यशस्वी झालात तर तुमच्या पार्टनरच्या मनावर तुमचा प्रभाव पडेल.

२) उत्तेजित करणारी स्थाने शोधा

स्त्रीच्या चरमानंदाला एका वेगळ्या उंचीवंर नेऊन ठेवतील अशी अनेक स्थाने स्त्रीच्या शरीरात असत. त्यामुळे प्रणय करताना ही स्थान शोधणं खूप गरजेचं असतं.

 

male-sex-inmarathi
15min.lt

याद्वारे शरीरसुखातील वेगळी उंची गाठू शकतात आणि आपल्या पार्टनरला कायम आनंदी ठेवू शकतात.

३) तिची स्तुती करा

प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की तिच्या जोडीदाराने तिला गोंजारावं, तिच्या सौंदर्याची स्तुती करावी. बऱ्याचदा प्रणयाच्या नादात स्त्रीचा पुरुष फक्त वापर करत असतात. तिच्या भावनांची कदर करत नसतात. तिला टोमणे मारत असतात. पण असं करणं साफ चुकीचे आहे.

 

sexual-pleasure-inmarathi
hindustantimes.com

तुमचा जोडीदार एखादा सुंदर मॉडेल सारखा असेल गरजेचं नाही. प्रत्येक वेळी परफेक्ट बॉडी शेप असेल असं नाही, त्यामुळे अश्यावेळी तुम्ही तिला समजून घेतलं पाहिजे. तिच्या सौंदर्याची स्तुती केली पाहिजे.

यामुळे ती प्रणयात साथ देते आणि तुमचा प्रणय आनंददायी होतो. सोबतच तिच्या मनात तुमचं स्थान कायमचं पक्क होऊन जातं.

४) तिच्यासोबत संवाद साधा

तिला तुमच्या कडून खूप अपेक्षा असतात. जर तुम्ही तिला फक्त प्रणयासाठी वापरत असाल तर हे योग्य नाही. याने तुमच्याच नात्यावर परिणाम होणार आहे. ती दिवसभर तुमच्या सानिध्यात नसते. अश्यावेळी ती एकटी असते. फक्त रात्री तुम्ही आणि ती एकत्र येत असतात.

अश्यावेळी फक्त प्रणय हेच लक्ष ठेवाल तर तिचा भ्रमनिरास होतो आणि परिणामतः तुमचे संबंध तणावपूर्ण होतात.

 

rebelcircus.com

त्यामुळेच वेळोवेळी तिच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या पाहिजे. तिला तुमच्या दिवसाबद्दल सांगितले पाहिजे तसेच तिच्याकडून तिच्या दिवसाबद्दल जाणून घेतले पाहिजे याने तिच्या मनात तुमचे स्थान खूप वरचे होते. मग ती प्रणयात ती तुम्हाला समर्पण करते.

५) पॉर्न बघणं थांबवा

होय, ऐकायला जरी विचित्र वाटत असलं आणि करायला जरी कठीण असलं तरी असं करणं गरजेचं आहे. पॉर्न बघितल्याने आपल्या मनात त्यातल्या सुंदर पॉर्न स्टार्सची इमेज कोरली जाते.

त्यांच्यासारखं काही तरी करावं असं वाटू लागतं. पण खऱ्या आयुष्यात ते शक्य नसतं.

ते फक्त स्वप्नरंजन असतं.

त्यामुळे तसल्या कल्पना टाळण्यासाठी पॉर्न बघणं टाळणंच योग्य आहे. त्यापेक्षा नैसर्गिक प्रणय तुम्हाला निखळ आनंद देऊन जाईल.

 

porn-blue-films-inmarathi06
ewellnessexpert.com

पॉर्नमुळे लैंगिक विफलतेचा पण धोका असतो. त्यामुळे पॉर्न बघणं टाळणंच तुमच्या हिताचं असेल.

६) व्यायाम करा, वजन उचला

जेवढा जास्त तुम्ही व्यायाम कराल आणि वजन उचलाल तेवढा जास्त रक्त पुरवठा तुमचा शरीराला होईल. त्या रक्त पुरवठयाच्या वाढी बरोबर तुमच्या शरीरातील टेस्टटेरोंनची मातर देखील वाढेल.

 

gym-inmarathi
mensxp.com

यामुळे तुमची प्रणय क्षमता दुप्पट होईल आणि तुमच्या पार्टनरला तुम्ही खुश करु शकाल.

७) निरोगी राहण्यासाठी पुरेसा आराम करा

तुमच्या शरीराला तुम्हाला प्रणयासाठी फिट करायचे असेल तर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, पुरेशी झोप घेत जा. वेळ मिळेल तसा आराम करून घेत जा ज्यामुळे तुमच्या मध्ये क्षीण उरत नाही आणि क्षीण नसेल तर तुम्ही एकदम ताजेतवाने असता.

त्यामुळे तुमची प्रणयक्रीडा अत्यंत सकारात्मक होईल. अधिक आनंद उपभोगता येईल.

.

sleep-main-inmarathi.jpg
indianexpress.com

सोबतच तुम्हाला चांगलं निरोगी आयुष्य लाभेल ज्यामुळे तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध पण मजबूत होतील.


८) दारू आणि धुम्रपानावर नियंत्रण आणा

दारू पिण्याचा आणि धूम्रपान करण्याचा खूप वाईट परिणाम तुमच्या संबंधावर होत असतो. शरीरिकच नव्हर तर भावनिक संबंध यामुळे धोक्यात येत असतात.

तुमच्या दारू, सिगारेट पिण्यामुळे तुमच्या पार्टनरच्या मनात तुमच्या प्रति नकारात्मक भावना तयार होते. त्यामुळे याचा परिणाम प्रेमावर होतो.

 

tea wine01-marathipizza
punchdrink.com

दुरावा निर्माण होतो आणि शरीरसंबंध आपोआप कमी होत जातात. त्याच्यात यांत्रिकता येऊ लागते.

त्यामुळे दारू सिगारेट इत्यादी व्यसनांना आपल्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे त्याशिवाय तुम्हाला प्रणयात यश मिळवता येणार नाही. बंध मजबूत करता येणार नाहि.

अश्याप्रकारे फक्त शारीरिक व्यवहार हा तुम्हाला चॅम्पियन करत नसतो. तुमचा संपूर्ण व्यवहार तुमच्या नात्याला नियंत्रित करत असतो.

त्यामुळे जेवढी सकारत्मकता तुम्ही बाळगाल तेवढे जास्त तुमचे नातेसंबंध विकसित होत जातील. तुम्ही प्रेम करत रहाल आणि एकमेकांना शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या तृप्त करण्यात यशस्वी होऊ शकतात.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
4 thoughts on “स्त्रीला प्रचंड खुश करणारा चॅम्पियन व्हायचंय? बस्स फक्त ह्या ८ गोष्टी करा!

  • July 31, 2019 at 6:39 pm
    Permalink

    खूप चांगल व महत्वाच्या बाबी समजाऊन सांगितल्या आहेत, खूपचं उपयुक्त अशी लेखनातून जाणिव करून दिली. धन्यवाद

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?