परफ्युम लावताना काय काळजी घ्यावी, जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

उन्हाळ्यात गर्मीमुळे घामाचा दुर्गंध येणे हे साहजिक आहे. अश्यात मग आपल्याकडे परफ्युम लावण्याशिवाय काही पर्यायच उरत नाही. ह्यात कधीकधी आपण काही चुका करतो, ज्यामुळे आपल्याला कुठला परफ्युम कसा वापरायला हवा ह्यात गफलत होते आणि फ्रेश वाटायच्या ऐवजी आपण काहीतरी असं लावून बसतो ज्याचा सुगंध आपल्या पर्सनॅलिटी सोबत जात नाही. पण खरेतर आपण जो परफ्युम लावतो तो आपल्या व्यक्तिमत्वाशी मॅच व्हायला हवं.

 

fragrance-inmarathi05
rosasdejardim.com

जर तुम्ही अंघोळीसाठी सुगंधित साबण वापरत असाल तर ह्यासोबतच तुमच्या शरीरावर एक सुगंधित लेयर बनायला सुरवात होते. ह्यानंतर सेकंड लेयर असते ती बॉडी लोशनची. आणि त्यानंतर परफ्युम. जर तुम्ही ह्याप्रकारचा रुटीन फॉलो करत असाल तर तुम्ही सुगंधित लेयारिंग परफेक्टली करत आहात.

 

fragrance-inmarathi03
beautyheaven.com

जर तुम्हाला तुमचा परफ्युम हा लॉंग लास्टिंग टिकवून ठेवायचा असेल तर हेवी सेंट आधी लावला जेणेकरून हलक्या सुगंधावर त्याचा परिणाम होऊ नये. त्यासाठी आधी हेवी सेंट लावावा त्याला काही वेळ सेटल होऊ द्यावं आणि त्यानंतर त्यावर हलका परफ्युम लावावा. एक किंवा त्याहून अधिक परफ्युम्सला अश्या प्रकारे मिक्स करावे की, फायनल सेंट हा जास्त हार्ड वाटू नये.

 

fragrance-inmarathi01
thepureoilperfume.blogspot.com

जर तुम्हाला सिंगल बेस परफ्युम हवा असेलं तर तुम्ही एक सारख्या परफ्युम्सचा वापर करू शकता, जसे फ्लोरल, वूडी, सायट्रस, ओरिएन्टल वगैरे.

 

fragrance-inmarathi04
beautyheaven.com

आणि जर तुम्हाला काही वेगळा एक्सपेरिमेंट करायचा असेलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या परफ्युम्सना एकत्र करून तुम्ही तुमचं एक्सक्लूसिव परफ्युम तयार करू शकतात. रोज आणि वॅनिला सोबत एक्सपेरिमेंट करणे सर्वात सोपे आणि तेवढेच चागले असेल.

 

fragrance-inmarathi06
rosasdejardim.com

जर तुम्हाला फ्रेश वाटायचं असेलं तर सायट्रस फॅमिलीचे परफ्युम्स आणि डीओ ट्राय करू शकता. जर तुम्हाला थोडा मोहक सुगंध आवडत असेल तर तुम्ही फुलांचा सुगंध असलेले परफ्युम्स ट्राय करू शकतात. आणि जर तुम्हाला हार्ड परफ्युम आवडत असेलं तर तुम्ही चंदनच्या सुगंधाचे परफ्युम्स ट्राय करू शकतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?