इस्रो मध्ये इंटर्नशिपसाठी कसं अप्प्लाय करावं?
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
इस्रो म्हणजे भारताची शान. गेल्या काही वर्षांतील भारताची अवकाश संशोधंत क्षेत्रातील भरीव कामगिरी पाहता येणाऱ्या काळात इस्रो भारताचे नाव अवकाशात कायमचे कोरणार हे मात्र नक्की. तर अश्या या इस्रोच्या सातत्यपूर्ण अभिमानास्पद उपक्रमांमुळे अवकाश संशोधन क्षेत्रात करियर करू इच्छिणारी नवीन पीढी इस्रोकडे आकर्षित होतेय. इस्रोच्या भविष्यातील प्रोजेक्ट्सचा आपण देखील एक भाग व्हावं अशी स्वप्न पाहतेय. इस्रोमध्ये काम करायला मिळाव अश्या इच्छा बोलून दाखवल्या जातायत. त्याच दृष्टीने अवकाश संशोधन क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीसाठी हा मार्गदर्शकपर लेख आम्ही घेऊन आलोय. ज्यात तुम्हाला माहिती मिळेल की तुम्ही कश्याप्रकारे इस्रो मध्ये इंटर्नशिपसाठी अप्प्लाय करू शकता?

कोठे अप्प्लाय करावं?
संपूर्ण भारतभरात इस्रोची अनेक केंद्रे आहेत जेथे विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी मिळू शकते. पण त्या त्या केंद्रामार्फत एक ठराविक पात्रता निकष ठरवले जातात आणि त्यानुसारच इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्याची निवड करण्यात येते. या केंद्रांमार्फत आणि तेथील इंटर्नशिपच्या पात्रता निकषांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला त्या त्या केंद्राच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
इंटर्नशिपसाठी निवड कशी होते?
इस्रो अंडरग्रॅज्यूएट आणि पोस्टग्रॅज्यूएट अश्या दोन्ही श्रेणीतील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देते.प ण सहसा B. Tech/B.E च्या फायनल इयर मधील विद्यार्थ्यांना किंवा जे एखाद्या मान्यताप्रपात युनिव्हर्सिटीमधून मास्टर डिग्रीचे शिक्षण घेत असतील त्या विद्यार्थ्यांनाच त्यांच्या इंटर्नशिपसाठी किंवा एखाद्या प्रोजेक्टच्या ट्रेनिंगसाठी बोलावले जाते. बऱ्याचदा अनेक शैक्षणिक संस्था स्वत: पुढाकार घेऊन त्यांच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये काम करण्यास संधी मिळावी म्हणून अर्ज करतात. इस्रोमधील अधिकारी अश्या अर्जांची पडताळणी करतात, त्यांचे मूल्यमापन करतात, विद्यार्थ्यांना कोणत्या विषयामध्ये जास्त रस आहे हे पाहतात आणि त्यानंतर आपल्याला ज्या प्रोजेक्टसाठी इंटर्नची गरज आहे त्यानुसार इंटर्नशिपसाठी विद्यार्थ्यांची निवड करतात.

इंटर्नशिपसाठी अप्प्लाय करताना कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मान्यताप्राप्त संस्थेमधून शिक्षण घेतलेले हवे आणि अप्प्लाय करताना तुमच्या संस्थेच्या प्रमुखाचे शिफारसपत्र किंवा विनंती पत्र सोबत जोडणे गरजेचे आहे. इस्रो नेहमी अश्या विद्यार्थ्यांना झुकतं माप देते ज्यांचे गुण सगळ्यात जास्त आहे किंवा जे आपल्या शाळेचे किंवा कॉलेजचे टॉपर्स आहेत. त्यामुळे तुम्हाला जर इस्रोच्या नजरेत यायचे असेल तर तुमचे गुण/GPA जबरदस्त हवा. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये अवकाश संशोधनावर काही प्रोजेक्ट्स तयार केले असतील आणि ते खरंच प्रभावी असतील तर त्या बाबतीत तुम्ही उजवे ठरू शकता. जर तुम्ही या क्षेत्रासंबंधी काही संशोधन केले असेल तर अतिउत्तम! बऱ्याच वेळा असेही होऊ शकते की इस्रो तुमच्या संस्थेमधील प्रोफेसरच्या विनंतीनुसार तुम्हाला इंटरव्हूसाठी बोलावू शकते, तेथे ते तुमच्या कामाबद्दल माहिती घेऊन तुम्हाला पुढील प्रोजेक्टसाठी इंटर्नशिप ऑफर करू शकतात.

तर मग मित्रांनो इस्रोमध्ये इंटर्नशिप करणाऱ्या तुमच्या मित्रमंडळींपर्यंत ही माहिती पोचवा आणि त्यांना त्यांची स्वप्ने साध्य करण्यात मदत करा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.