भारतात राष्ट्रपती निवडणूक कशी होते?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

राष्ट्रपती म्हणजे देशाचे प्रथम नागरिक. हुद्द्याच्या हिशोबाने पंतप्रधानांपेपेक्षाही त्यांचे स्थान उच्च. अश्या या राष्ट्रपती पदावर बसणारी व्यक्ती देखील तितकीच लायक आणि पात्र असली पाहिजे असा आग्रहच असतो. सामान्य माणसाला राष्ट्रपतीबद्दल भलतेच कुतुहूल असते आणि अश्यावेळी सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येतो की, आपल्या देशाचे राष्ट्रपती निवडले कसे जातात?

आपल्या देशामध्ये संविधानातील कलम ५४ मध्ये राष्ट्रपती निवड प्रक्रीयेचे सविस्तर वर्णन आढळते. या प्रक्रीये अंतर्गत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनातील सदस्यांच्या एका निर्वाचन समितीद्वारे राष्ट्रपतींची निवड केली जाते.

pranav-mukharji-marathipizza

राष्ट्रपती निवडणूक कधी घेतल्या जाव्यात ते विद्यमान राष्ट्रपती ठरवतात, त्यानुसार निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया सुरु करते. यात उमेदवारांचे फॉर्म भरून घेण्यापासूनच्या गोष्टी येतात. उमेदवारला निवडणुकीसाठी १५००० रुपये डीपोझीट देखील भरावे लागते. प्रत्येक उमेदवार हा ५० सदस्यांद्वारा प्रस्तावित असला पाहिजे, तसेच अन्य ५० सदस्यांचा त्याला पाठींबा असला पाहिजे.

पात्रता:

राष्ट्रपती पदासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तीसाठी काही पात्रता अटी घालून दिलेल्या आहेत-

उमेदवार भारताचा नागरिक असावा
उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे
उमेदवारामध्ये लोकसभेचा सदस्य बनण्याची योग्यता हवी
उमेदवार कोणताही लाभ प्राप्त करण्याच्या स्थितीमध्ये नसावा
तो लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य नसावा

 

राष्ट्रपती निवड प्रक्रीयेसाठी गठीत केलेली निर्वाचन समिती

या समितीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य अर्थात सर्व खासदार आणि विधानसभेसाठी निवडले गेलेले सर्व सदस्य यांचा समावेश असतो.

राष्ट्रपती निवड प्रक्रियेमध्ये निर्वाचित समितीमधील सर्व सदस्य सिंगल ट्रान्सफरेबल वोट सिस्टम आणि सिक्रेट बेलोट द्वारा मतदान करतात.
एम.पी आणि एम.एल.ए. यांच्या मंतांमध्ये युनिफोर्मीटीआणि पॅरिटी या दोन नियमांचं पालन करण अतिशय गरजेचे असते.

lok-sabha-marathipizza

स्रोत

युनिफोर्मीटी म्हणजे प्रत्येक राज्याच्या एम.एल.ए.च्या मतांची संख्या त्या राज्याच्या लोकसंख्येच्या गुणोत्तरामध्ये असेल. हे ठरवण्यासाठी एक फॉर्म्युला देण्यात आला आहे.

राज्यामध्ये निवडले गेलेले एकूण एम.एल.ए. / १०००

या फॉर्म्युलाचा वापर करून प्रत्येक राज्याच्या एम.एल.ए. मतांची संख्या माहित करून घेतली जाते आणि सर्व संख्या हाती आली की त्याची सरासरी काढली जाते.

==

पॅरिटी म्हणजे सर्व एम.पी.च्या मतांची संख्या सर्व एम.एल.ए. च्या मतांच्या संख्येएवढी असली पाहिजे. यासाठी देखील एक फॉर्म्युला देण्यात आलेला आहे.

सर्व राज्यांतील एम.एल.ए.च्या मतांची एकूण संख्या / लोकसभा आणि राज्यसभेमध्ये निवडल्या गेलेल्या एकूण एम.पी.ची संख्या

==

राष्ट्रपती निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला किमान आवश्यक मत मिळवावं लागतं. यासाठी देखील एक फॉर्म्युला देण्यात आलेला आहे.

विजयी कोटा = वैध मतांची एकूण संख्या / एकूण सीट्स + १ म्हणजेच १+१+१

अगोदर सांगितल्याप्रमाणे सिंगल वोट सिस्टमचा वापर केला जातो, ज्यामध्ये एक मतदार एकच मत देऊ शकतो.

तसेच या प्रक्रियेमध्ये Indication of Preferences by the Electors देखील महत्त्वाचे ठरते. यामध्ये मतदार बेलोट पेपरवर इच्छुक उमेदवारांची १,२,३,४,५ या प्राधान्य क्रमाने नावे लिहितो. ज्या उमेदवाराला या सदस्याने पहिले प्राधान्य दिले आहे त्याला त्याचे मत जाते, पण समजा हा उमेदवार विजयी कोटा मिळवू शकला नाही किंवा इतरही उमेदवार मिळवू शकले नाहीत तर त्याने ज्या उमेदवाराला दुसरे प्राधान्य दिले आहे त्याला त्याचे मत जाते.

map-of-india-marathipizza

स्रोत

जर कोणताच उमेदवार विजयी कोटा मिळवू शकला नाही तर मात्र ज्या उमेदवाराला सगळ्यात कमी मते आहेत त्याला बाद केले जाते आणि त्याची मते सर्वात जास्त २ रे प्राधान्य मिळालेल्या उमेदवाराला दिली जातात. जोवर एखादा उमेदवार विजयी कोटा मिळवत नाही तोवर ही प्रक्रिया सुरु राहते. परंतु सहसा अशी परिस्थिती उद्भवत नाही आणि राष्ट्रपती हा बहुमताने निवडला जातो.

तर अशी असते ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रथम नागरिकाची निवड प्रक्रिया!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?