महाकाय पूर्वज ते सुपरस्मार्ट एलियन्स: सर्व तर्कांना छेद देत पिरॅमिडच्या बांधकामामागचं गूढ उलगडलंय…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

इजिप्तचे पिरॅमिड सर्व जगात प्रसिद्ध आहेत. जीवनात एकदा तरी इजिप्तला जाऊन जगातील हे महान आश्चर्य उघड्या डोळ्यांनी पाहावे अशी प्रत्येक भटक्याची इच्छा असते. हे पिरॅमिड म्हणजे आजही एक कोडंच आहेत. दगडांवर दगड रचून कश्याप्रकारे ते बांधले हे अजूनही शास्त्रज्ञांना किंवा जाणकारांना ठोसपणे सांगता येत नाहीये.

अगदी प्राचीन काळी कुठे होती आधुनिकता, कुठे होती यंत्रे आणि मनुष्यबळही इतके नव्हते. मग या लोकांनी पिरॅमिड कशाच्या माध्यमातून बांधले?

हे तुम्हाला-आम्हाला पडणारे प्रश्न अनेक शोधकर्त्यांना देखील पडत असतात आणि मग सुरु होतो अभ्यास अश्या गूढ गोष्टींचा!


पिरॅमिड बाबत याच कुतुहलाने एक संशोधन सुरु केले साउथ वेल्समधील सिंटेक इंटरनॅशनलमधील पीटर जेम्स या अभियंत्याने! आणि त्याने आजवर कधीही न मांडला गेलेला एक आगळावेगळा सिद्धांत मांडून जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

pyramids-marathipizza00

स्रोत

या नव्या सिद्धांतानुसार,

पिरॅमिडचे बांधकाम करताना सर्वप्रथम आतल्या बाजूने मोठा ढिगारा तयार करून नंतर त्याच्या बाहेरून विटा जोडल्या असाव्यात.

पिरॅमिडच्या बांधकामाबाबतच्या प्रचलित सिद्धांतानुसार महाकाय दगडी ठोकळे अतिशय लांबलचक घसरगुंडय़ांसारखा उतार वापरून एकमेकांवर ठेवून हे पिरॅमिड बांधण्यात आले. मात्र, जेम्स यांच्या दाव्यानुसार बांधकामाचा हा प्रकार शक्य नाही.

 

pyramids-marathipizza01

स्रोत


अशा प्रकारच्या पद्धतीने बांधकाम करण्यासाठी हे ठोकळे इतक्या उंचावर घेऊन जाण्यासाठी योग्य कोन तयार करताना सुमारे पाव मैल लांबीचा उतार लागला असता.

त्याच प्रकारे सध्याच्या सिद्धांतानुसार सुमारे २० लाख दगडी ठोकळे एकावर एक रचण्यासाठी त्या काळातील इजिप्शिअन लोकांना दर तीन मिनिटाने एक या गतीने या उतारावर ठेवावे लागले असते, असे जेम्स यांचे म्हणणे आहे.

जर तसे झाले असते तर त्या उताराच्या खुणा त्यावर दिसून आल्या असत्या. मात्र, तशा कोणत्याही खुणा त्यावर दिसून येत नाहीत.

 

pyramids-marathipizza02

स्रोत

पीटर जेम्स गेल्या वीस वर्षांपासून इजिप्तच्या पिरॅमिडचा अभ्यास करत आहेत. त्यांनी ४६०० वर्षे जुन्या स्टेप पिरॅमिड आणि रेड पिरॅमिडमधील दफन कक्षांचे पुनरुज्जीवन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.


 

pyramids-marathipizza03

स्रोत

या स्टेप पिरॅमिडच्या आत जेम्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक टन वजनाचे लहान लहान दगड हजारो वर्षे जुन्या पाम वृक्षाच्या केवळ एका फांदीला लटकत ठेवल्याचे आढळले.

त्यावरूनच हे पिरॅमिड आतल्या बाजूने लहान, सुटसुटीत ठोकळ्यांनी बांधून त्यावर मोठेठोकळे बसवले असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. म्हणजेच हे बांधकाम ‘बाहेरून आत’ असे न होता ‘आतून बाहेर’ असे झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 

pyramids-marathipizza04

स्रोत

हा नवा सिद्धांत तर्कशुद्ध असून त्यामुळे पिरॅमिड संशोधनाला नवीन दिशा मिळाली आहे. येणाऱ्या काळात अजून नवनवीन गोष्टी या सिद्धांतामुळे नक्कीच पुढे येतील.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?