पाहूया भारतात कशी ठरवली जाते पेट्रोलची किंमत!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कधी कधी सकळी उठल्या उठल्या एक बातमी कानी पडते की “आज पेट्रोल ३५ पैश्यांनी महागलं”.

झालं…ही बातमी ऐकून गाडी वापरणारे काहीसे वैतागतात. तर कधी कधी अशी बातमी येते की “आज पेट्रोल २० पैश्यांनी स्वस्त झालं”. मग ही बातमी ऐकल्यावर ज्यांच्या कडे गाडी आहे ते खुश होतात. अश्या वेळी ज्यांच्या कडे गाडी नाही त्यान प्रश्न पडतो की, “३५ पेश्याने पेट्रोल वाढल्याने एवढा काय फरक पडतो? किंवा २० पैश्यांनी पेट्रोल स्वस्त झाल्यास एवढी काय बचत होते?”

 

Petrol-pump-marathipizza
mid-day.com

याचं उत्तर असं आहे की दिसायला जरी ही वाढ किंवा घट छोटी असली तरी तिचे राष्ट्रीय पातळीवरील परिणाम जबरदस्त आहेत. ३५ पैश्यांनी पेट्रोलची किंमत वाढवल्याने जरी एका व्यक्तीमागे जास्त काही फरक पडत नसला तरी संपूर्ण देशातील पेट्रोल वाहन धारकांचा विचार करता आर्थिक उलाढाल कोटी-अब्जोंच्या घरात जाते. तसेच काहीसे पेट्रोलच्या किंमतीमध्ये घट झाल्याने होते.

हे अधिक स्पष्ट पणे तेव्हा लक्षात येईल जेव्हा तुम्हाला कळेल की पेट्रोलची किंमत भारतात ठरवली कशी जाते. चला तर पाहूया!

भारत सरकार तेल उत्पादक देशांकडून कच्च्या तेलाचे बॅरल खरेदी करते. एका बॅरलमध्ये १५९ लिटर तेल असतं. ज्यापैकी प्रत्येकी १ लिटरची किंमत असते ११.२१ रुपये.

 

petrol-prices-marathipizza01
gazabpost.com

या किंमतीमध्ये ओशन फ्रेट चार्जेस आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस जोडले जातात आणि अश्या प्रकारे एक लिटर पेट्रोलची किंमत होते १९.२२ रुपये

 

petrol-prices-marathipizza02
gazabpost.com

जहाजामधून हे बॅरल आणले जातात. हे जहाज भारताच्या पोर्ट वर पोचल्यावर किंमतीमध्ये रिफायनरी ट्रान्सफर चार्जेस जोडले जातात. त्यामुळे पुन्हा एक लिटर पेट्रोलची किंमत वाढून होते १९.७० रुपये.

 

petrol-prices-marathipizza03
gazabpost.com

पेट्रोल पंपाच्या मालकांना वाढीव दरामध्ये बॅरल विकले जाते. त्यांना एक लिटर पेट्रोल २३.४७ रुपयांना दिले जाते.

 

petrol-prices-marathipizza04
gazabpost.com

या किंमतीमध्ये केंद्र सरकार एक्साईज ड्युटी जोडते, त्यामुळे पुन्हा एक लिटर पेट्रोलची किंमत वाढून ४४.९५ रुपये इतकी होते.

 

petrol-prices-marathipizza05
gazabpost.com

या किंमतीमध्ये पुढे डीलर कमिशन देखील जोडले जाते, ज्यामुळे एक लिटर पेट्रोलची किंमत होते ४७.२० रुपये

 

petrol-prices-marathipizza06
gazabpost.com

अजून पेट्रोलची अंतिम किंमत झालेली नाही. अजूनही पुढे वाढ व्हायची बाकी आहे. या किंमतीमध्ये प्रत्येक राज्य स्वत:चा VAT अर्थात व्हॅल्यु अॅडेड टॅक्स जोडते.  प्रत्येक राज्याचा VAT हा वेगवेगळ असतो त्यानुसार पुढील किंमतीमध्ये बदल होतात.

VAT लावल्यावर किंमतीमध्ये १० ते १२ रुपयांची वाढ हमखास होते. म्हणजे पुन्हा वाढ झाल्याने एक लिटर पेट्रोलची किंमत होते ५९.९५ रुपये…

 

petrol-prices-marathipizza07
gazabpost.com

वरील उदाहरण केवळ संदर्भांसाठी आहे. कधी कधी सरकारी धोरणांमुळे किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या पेट्रोलच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने अंतिम किंमत ७० ते ७५ रुपयांपर्यंत देखील जाऊन पोचते.

 

crude-oil-chart-marathipizza
thewire.in

असे आहे हे पेट्रोलच्या किंमतीमागचे अर्थकारण!!!

हे देखील वाचा: (पेट्रोल भरताना सतर्क राहा, कारण तुमच्या डोळ्यादेखत तुमची फसवणूक होऊ शकते)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?