इंदिरा यांना ‘गांधी’ हे आडनाव कसे मिळाले याबाबत प्रचलित आहेत ३ दावे!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

स्वतंत्र भारताचे पाहिले पंतप्रधान बनण्याचा मान जवाहरलाल नेहरू यांना मिळाला होता, त्यांच्यानंतर काही काळाने त्यांची मुलगी इंदिरा गांधी ही पंतप्रधान झाली. पण तुमच्या मनामध्ये असा विचार कधी आलाय का ? की जर इंदिरा ही जवाहरलाल नेहरू यांची मुलगी होती, तर तिचे आडनाव गांधी का ? नेहरू व त्यांच्या घराण्याबद्दल आजही लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. नेहरूंचे आडनाव गांधी होण्यामागे देखील एक कथा आहे. या घराण्यामध्ये नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या वंशजांचा देखील समावेश होतो. त्यांचे कुटुंब सुरुवातीपासूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संलग्न आहे. महात्मा गांधी हे तर स्वातंत्र्य चळवळीमधील महत्त्वाचा भाग होते. चला मग जाणून घेऊया की, कसे काय नेहरू यांची कन्या असूनही इंदिरा गांधींचे आडनाव गांधी झाले.

indira surname gandhi why.marathipizza
jagran.com

राज कौल हे नेहरू घराण्यातील पूर्वज होते. पुढे कौल हे नाव वगळून नेहरू हे त्यांच्या कुटुंबियांचे आडनाव बनले. ही १७०० सालची गोष्ट आहे.
जवाहरलाल नेहरू, म्हणजेच पंडित नेहरू हे मोतीलाल नेहरू यांचे पुत्र होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य म्हणून भारताला ओळख दिली.

इंदिरा ही जवाहरलाल नेहरू यांची कन्या होती. ती भारताच्या स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मोठी झाली आणि तिला राजकीय घडामोडींची चांगली जाणीव होती. वयाच्या ११ वर्षी तिने तिच्या आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाउल ठेवले आणि वडिलांबरोबर ब्रिटीशांविरुद्धच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला. त्यावेळी स्वदेशी चळवळ चालू झाली होती.

इंदिराचे गांधीमध्ये परिवर्तन होण्यामागे अनेक दंतकथा आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून इंदिरा प्रियदर्शनी गांधी कशी झाली, याबद्दल विविध गोष्टी  ऐकिवात आहेत. त्यापैकी खालील ३ गोष्टींची चर्चा जास्त होते. त्या कितपत खऱ्या याबाबत मात्र अद्यापही शंका आहे.

१. त्यांनी फिरोज खानशी लग्न केले.

इंदिरांचे वडील नेहमी राजकारणामध्ये व्यस्त असायचे आणि आई क्षयरोगाने पिडीत असायची त्यामुळे इंदिरा एकट्या होत्या. कालांतराने त्यांची फिरोझ खानशी भेट झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लंडनच्या मशिदीमध्ये त्या दोघांनी लग्न केले. इंदिरांनी आपला धर्म देखील बदलला आणि त्या ममूना बेगम बनल्या.

indira surname gandhi why.marathipizza1
biography.com

जवाहरलाल नेहरू हे त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते. त्यांना वाटत होते की, इंदिरा गांधींनी टाकलेले हे पाऊल त्यांच्या पंतप्रधानाच्या महत्वाकांक्षेला धोक्यात आणू शकते. त्यावेळी त्यांनी फिरोझ खानला आपले आडनाव खान बदलून गांधी करावे याबद्दल विचारणा केली. लवकरच, फिरोझ खान गांधी बनला आणि त्याच्याशी लग्न केल्यानंतर इंदिराजींचे इंदिरा गांधी असे नाव झाले.

 

२. महात्मा गांधींनी फिरोझ खानला दत्तक घेतले आणि त्याला आपले आडनाव गांधी दिले.

आणखी एक दावा असा करण्यात येतो की, नेहरू यांना आपल्या मुलीने आंतरजातीय लग्न करू नये असे वाटत होते. कारण असे तिने केल्यास नेहरू कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचणार होता.

indira surname gandhi why.marathipizza2
d2ydh70d4b5xgv.cloudfront.net

त्यानंतर झालेली सर्व परिस्थिती बघून, महात्मा गांधी यांनी फिरोझ खानला दत्तक घेण्याचे ठरवले आणि त्याला आडनाव गांधी हे दिले. त्याच्यानंतर नेहरू यांना फिरोझ आणि इंदिराच्या लग्नाबद्दल काहीच समस्या नव्हती आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न फिरोझशी लावून दिले आणि त्यानंतर इंदिरा ह्या इंदिरा गांधी बनल्या.

 

३. फिरोझ गांधी हे खरेतर फिरोझ जहांगीर घांधे म्हणून जन्माला आले होते.

शेवटचा आणि सर्वात वेगळा सिद्धांत म्हणजे, फिरोझ गांधी हे वास्तविक मध्ये फिरोझ जहांगीर घांधे  होते. फिरोझचा जन्म पारशी कुटुंबामध्ये झाला होता. त्याचे पालक फारदून जेहांगीर घांधे आणि रातीमाई हे बॉम्बेमध्ये राहत होते.
१९३० मध्ये आपले शिक्षण सोडून दिल्यानंतर फिरोझ घांधे  यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रवेश केला. येथे ते महात्मा गांधीच्या विचाराने प्रेरित झाले आणि त्यांनी आपले आडनाव घांधे बदलून गांधी असे केले.

indira surname gandhi why.marathipizza3
m.media-amazon.com

विकिपीडियानुसार, १९३३ मध्ये फिरोझ याने इंदिराला लग्नासाठी मागणी घातली, पण इंदिरा आणि तिची आई कमला नेहरू हिने इंदिरा खूप लहान आहे हे सांगून नकार दिला. पण कमला नेहरूच्या मृत्युनंतर फिरोझ नेहरू कुटुंबियांच्या आणि इंदिराच्या जवळ आला आणि नंतर १९४२ मध्ये त्यांनी हिंदू धर्माच्या परंपरेनुसार लग्न केले.

ही ती तीन कारणे आहेत, ज्यामध्ये इंदिरा ह्या गांधी कश्या झाल्या हे सांगितले आहे, पण याबद्दल कोणताही ठोस पुरावा नाही आहे. त्यामुळे यातील कोणती गोष्ट नक्की खरी आहे, यावर अजूनही संशोधन करणे आवश्यक आहे. पण या सर्व दाव्यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानाचे कर्तुत्व काही कमी होत नाही हे देखील तितकेच खरे!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?