' ‘व्हाईट हाऊस’, ‘ताजमहल’, ‘कुंभकर्ण’ यांच्यामुळेच भारताने अमेरिकेच्या हेरगिरीवर मात केली होती! – InMarathi

‘व्हाईट हाऊस’, ‘ताजमहल’, ‘कुंभकर्ण’ यांच्यामुळेच भारताने अमेरिकेच्या हेरगिरीवर मात केली होती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताने सगळ्यात पहिली अणुचाचणी मे १९७४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात केली होती. या अणुचाचणीचे नाव स्माइलिंग बुद्धा असे होते.

यानंतर मे १९९८ मध्ये  राजस्थानच्या पोखरण इथे करण्यात आलेल्या ५ अणुबॉम्ब चाचण्यांचा पोखरण-२ एक भाग होता.

भारताने ११ आणि १३ मे रोजी राजस्थानच्या पोखरण इथे या ५ अणुचाचण्या केल्या होत्या.

या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर भारत सरकारने पुढील वर्षापासून दरवर्षी ११ मे रोजी ‘रीसर्जंट इंडिया डे’ साजरा करण्याचे ठरवले होते.

भारताने केलेल्या यशस्वी अणुचाचणीने जगातील सर्वच बलाढ्य देशांची झोप उडवली होती.

 

pokhran-atom-test-marathipizza01

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – अमेरिका एका थोर “अटल” राजकारण्याच्या मृत्यवर हळहळतीये, ज्याची भारतीयांना अजिबात ओळख नाही

अमेरिकेची गुप्त संघटना CIA भारताच्या या हालचालीवर लक्ष ठेवून होती. त्यांनी अरबो रुपये खर्च करून पोखरणवर नजर ठेवण्यासाठी चार उपग्रह अवकाशात सोडले होते.

हे असे उपग्रह होते की जमिनीवर उभे असलेल्या सैनिकाच्या घड्याळातील वेळ सुद्धा पाहू शकत होते. परंतु भारताने त्यावर सुद्धा मात केली होती.

प्रसिद्ध पत्रकार राज चेंगप्पाद्वारे लिहिण्यात आलेल्या ‘वेपन्स ऑफ पीस’ या पुस्तकामध्ये याबद्दलच्या सत्य गोष्टी उघड करण्यात आल्या आहेत.

चाचणी कुठे करण्यात आली?

चाचणीची जागा पोखरण येथे जैसलमेर पासून ११० किलोमीटर लांब जैसलमेर-जोधपुर मार्गावर ठरवण्यात आली. भारताने या जागेची यासाठी निवड केली होती कारण येथून मानवी वस्ती खूप लांब आहे.

शास्त्रज्ञांनी हे मिशन पूर्ण करण्यासाठी वाळवंटामध्ये वाळूच्या मोठमोठ्या विहिरी खोदल्या आणि त्यामध्ये बॉम्ब ठेवण्यात आले.

 

pokhran wells inmarathi

 

नंतर त्या विहिरी वाळूने बुजवण्यात आल्या, त्यावर वाळूचे डोंगर रचण्यात आले आणि त्यामधून तारा वर काढण्यात आल्या, नंतर त्या तारांना आग लावली गेली आणि त्याचा परिणाम म्हणून जोराने स्फोट झाला.

ह्या स्फोटामुळे एक मोठ्या आकाराचा राखाडी रंगाचा ढगासारखा भाग तयार झाला आणि स्फोट झालेल्या जागी एक मोठा खड्डा तयार झाला होता.

यापासून काही अंतरावरच २० शास्त्रज्ञांचा समूह या घटनेवर लक्ष ठेवून होता.

असे म्हणतात की स्फोट झाल्यानंतर एका शास्त्रज्ञाने हवेत हातवारे केले आणि तो म्हणाला की, कॅच अस इफ यू कॅन!

हे अमेरिकेच्या गुप्त संघटनेला खुले आव्हान होते.

 

pokhran test inmarathi

 

कोणत्या शास्त्रज्ञांनी या चाचणीमध्ये भाग घेतला होता?

भारतीय सैन्यातील ५८ अभियतांच्या पलटणीला या कामासाठी निवडले गेले होते. या पलटणीचे कमांडर कर्नल गोपाल कौशिक होते. त्यांच्या देखरेखी खालीच ह्या चाचणीची अंमलबजावणी करण्यात येणार होती.

त्यांना हे मिशन गुप्त ठेवण्यास सांगितले होते. अभियंते १८ महिन्यांपर्यंत गुप्तपद्धतीने हे काम करत होते.

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि त्यावेळेचे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आर.चिदंबरम या मिशन मध्ये असलेले दोन मोठे शास्त्रज्ञ होते.

या मिशनमध्ये एकूण ८० शास्त्रज्ञ रक्षा अणुसंशोधन आणि विकास संघटना तसेच अणुऊर्जा संघटनेशी जोडलेले होते.

या चाचणीसाठी कश्या प्रकारची गुप्त काळजी घेण्यात आली होती?

या मिशनवर असताना सर्व जण एकमेकांशी सांकेतिक भाषेमध्ये संवाद साधत असतं, एवढेच काय तर इथे शास्त्रज्ञांची खोटी नावे सुद्धा ठेवली गेली होती. सगळे एकमेकांना खोट्या नावाने हाक मारत असत.

 

pokhran-inmarathi

 

सगळ्यांना या जागी सैन्याच्या गणवेशात नेले जाई त्यामुळे CIA ला असे वाटे की या ठिकाणी सैनिकी कारवाई सुरु आहे.

सांकेतिक भाषेत संवाद साधताना सिक्रेट चेंबरला ‘कॅन्टीन’, शास्त्रज्ञांना ‘सियरा’ आणि बॉम्ब ग्रुप्सना ‘व्हिस्की’ म्हटले जाई.

डीआरडीओ च्या टीमला ‘चार्ली’, बीएआरसीच्या टीमला ‘ब्रावो’ आणि सैन्याला ‘माइक’ संबोधले जाई.

याच क्रमाने हायड्रोजन बॉम्बचे नाव ‘व्हाईट हाउस’ ठेवले गेले होते. अॅटम बॉम्बच्या ग्रुपला ‘ताजमहल’ असे नाव ठेवण्यात आले. तिसऱ्या बॉम्बच्या ग्रुपचे नाव ‘कुंभकरण’ ठेवण्यात आले होते.

अश्याप्रकारे भारताच्या हालचालींवर नजर ठेवून असलेल्या अमेरिकाच नाही तर सर्वच देशांच्या गुप्तचर संस्थांना भारतीय शास्त्रज्ञांनी शिताफीने चकवा दिला होता.

 

pokhran-atom-test-marathipizza03

 

सर्व बॉम्बची नावे अश्याप्रकारे होती:

शक्ती १ – एक थर्मान्यूक्लियर डिवाइस जो ४५ किलो टन उत्पनाचा होता परंतु याला २०० किलोपर्यंतच्या उत्पन्नासाठी बनवले गेले होते.

शक्ती २ – एक प्लुटोनियम इम्प्लोजन डिझाइन जे १५ किलो टन उत्पन्नाचे होते, ज्याला एका बॉम्ब किंवा मिसाइल द्वारे एक वॉर-हेड च्या रुपात वापरण्यात येऊ शकते.

शक्ती ३ – हे एक प्रयोगात्मक लीनियर इम्प्लोजन डिझाइन होते, ज्यामध्ये न्यूक्लियर फिशनसाठी आवश्यक “बिगर-हत्यार ग्रेड” प्लुटोनियम ही सामग्री होती, हे ०.३ किलो टन वजनाचे होते.

शक्ती ४ – एक ०.५ किलो टनाचे प्रयोगात्मक डिवाइस.

शक्ती ५ – एक ०.२ किलो टनाचे प्रयोगात्मक डिवाइस. अजून एका सहाव्या अतिरिक्त डिवाइसची चाचणी केली गेली नव्हती.

pokhran-atom-test-marathipizza04

 

हे ही वाचा – “पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाका!” म्हणणाऱ्या भारतीयांसाठी अमेरिका-रशियाचा इतिहास

या चाचणी यशस्वी झाल्याने भारतीयांमध्ये प्रसन्नतेचे वातावरण होते, परंतु इस्राइल व्यतिरिक्त कोणत्याच देशाने भारताच्या या चाचणीचे समर्थन केले नाही. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?