फेसबुकवर उजव्या बाजूला “ट्रेंडिंग टॉपिक” दिसतात ना? ते कसे येतात जाणून घ्या!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

फेसबुक आपण रोजच वापरतो. हे फेसबुक वापरताना तुमचं कधी ट्रेंडिंग पर्यायावर लक्ष गेलंय का?

ट्रेंडिंग मध्ये सध्या फेसबुकवर कोणत्या विषयाची सर्वात जास्त चर्चा ते विषय.

काहीच दिवसांपूर्वी महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेतली, तेव्हा महेंद्रसिंह धोनी हा विषय फेसबुकवर ट्रेंडिंगमध्ये झळकत होता. त्याखालोखाल इतर विषय होते.

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की हे ट्रेंडिंग विषय ठरवले कसे जातात? म्हणजे कोणता विषय सर्वात वर असेल त्या खालोखाल कोणता विषय असेल हे फेसबुक कसं ठरवतं? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अजून मिळाली नसतील तर आज मात्र तुमची प्रतीक्षा संपलीये. कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हे फेसबुकवरचे ट्रेंडिंग विषय नेमके ठरवले कसे जातात.

facebook-trending-marathipizza00

स्रोत

युजरने प्रत्येक वेळी फेसबुकमध्ये लॉग इन केल्यानंतर ‘न्यूज फीड’ मधील कुठला मजकूर तो पाहतो, हे ठरवण्यासाठी फेसबुकवर वेगळी पद्धत वापरली जाते. युजर कुठे राहतो आणि कुठले पेजेस फॉलो करतो या बाबी सोडल्या, तर प्राथमिकपणे त्यासाठी वेगळे निकष तपासले जातात. जे विषय अनेकदा मेन्शन केले जातात. कुठलाही विषय अचानकपणे अनेकदा हॅशटॅग केला जातो किंवा जास्त वेळा तो मेन्शन केला जातो असा विषय वा शब्द तो बहुदा ट्रेंडिंगमध्ये येतो. पण, केवळ तो शब्द जास्तवेळा हॅशटॅग असणे किंवा जास्त वेळा मेमेन्शन केला जाणे एवढेच पुरेसे नसते. त्यासाठी आणखी काही बाबी आवश्यक असतात.

facebook-trending-marathipizza01

स्रोत

उदा. सचिन तेंडूलकरच्या नावाचा फेसबुकवर अनेकदा उल्लेख (हॅशटॅग) होतो. त्यामुळे त्याचा एकूण आकडा खूप मोठा असतो. केवळ याच निकषाच्या आधारे ट्रेंडिंग ठरवले जात नाही. हॅशटॅग बरोबरच फेसबुक त्याची इतर पातळीवर म्हणजे युजरमध्ये,  त्यांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये किती चर्चा होते, हे पाहिले जाते आणि त्यानंतर ट्रेंडिंग कोणते हे फेसबुक निश्चित करते.

एकदा ट्रेंडिंग कुठले हे निश्चित झाले, की त्याला फेसबुक कंट्रोलरकडून मान्यता दिली जाते. हा कंट्रोलर त्या ट्रेंडवर थोडे लिहितो. ट्रेंडिंगला मान्यता देणारे हे कंट्रोलर फेसबुकवर प्रत्यक्षात येत नाहीत आणि त्यांना ट्रेंडिंगबाबत बारीक लक्षही ठेवावे लागत नाही. त्यासाठी फेसबुकच्या विशिष्ट सिस्टमद्वारे आपोआप ते केले जाते. या यंसिस्टमणे ट्रेंडिंग निवडले की या कंट्रोलरना केवळ हेडलाइनद्वारे त्याची दखल घ्यायची असते.

facebook-trending-marathipizza02

स्रोत

आता हे फेसबुकचं अजून एक गौडबंगाल तुमच्यासमोर आज उघड झालंय !

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?