जाणून घ्या इंग्रजी महिन्यांना नावे कशी मिळाली?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

आज संपूर्ण जगाने ‘ग्रेगरियन’ कालगणना स्‍वीकारली आहे. पोप ग्रेगरी (तेरावे) यांनी हे कॅलेंडर प्रचारात आणल्यामुळे त्यांच्‍या सन्मानार्थ याला ग्रेगारियन कॅलेंडर हे नाव देण्यात आले. या पद्धतीला न्यू स्टाइल, ख्रिस्ती वा इंग्रजी कालगणना असेही म्हणतात. मात्र, या कंलेंडरमधील महिन्‍याला नावे कशी दिली गेली, या नावांचा अर्थ काय ? ह्याची माहिती आपल्याला नाही, तीच माहिती आज जाणून घेऊया!

जानेवारी

month-marathipizza01
656a.kxcdn.com

जानेवारी हा शब्द ‘जॅनरियुस’ या लॅटीन भाषेतील शब्‍दापासून तयार झाला. ‘जानूस किंवा ‘जेनस’ या रोमन देवाच्‍या आधारे ‘जॅनरियुस’ हे नाव पडले. या देवाला पोटासमोर आणि पाठीमागे अशी दोन तोंडे असल्‍याची अख्‍यायिका आहे. त्‍यामुळे हा देव एकाच वेळी मागे आणि पुढे पाहू शकतो. जानेवारी महिन्‍याचेही असेच आहे. जानेवारीमध्‍ये मागील वर्षाला विसरले जात नाही आणि नवीन वर्षाचे स्‍वागत केले जाते. एकूणच काय तर व्‍यक्‍ती दोन वर्षांकडे समान नजरेने पाहते. त्‍यामुळे वर्षाच्‍या पहिल्‍या महिन्‍याला जानेवारी हे नाव दिले गेले.

 

फेब्रुवारी

month-marathipizza02
123rf.com

‘फॅबीएरियुस’ हा लॅटीन शब्‍दाचा ‘फेब्रुवारी’ असा अपभ्रंश झाला. ‘फेब्रू’ आणि ‘अरी’ हा त्‍याचा मूळ धातू. त्‍याचा अर्थ शुद्ध करणे असा होतो. प्राचीन रोमन संस्‍कृतीमध्‍ये हा महिना आत्‍मशुद्धी आणि प्रायश्चितासाठी महत्‍त्‍वाचा मानला जात होता. त्‍यामुळे त्‍याला फेब्रुवारी नाव दिले गेले.

 

मार्च

month-marathipizza03
ptplus.com

रोमन देवता ‘मार्टियुस’ (मार्स) याच्‍या नावावर ‘मार्च’ महिन्‍याचे नाव पडले. हा युद्ध आणि समृद्धीचा देव आहे. या महिन्‍याच्‍या 23 तारखेला सूर्य आकाशाच्‍या मधोमध तळपतो. या दिवशी दिवस आणि रात्र सारख्‍याच तासांचे असतात.

 

एप्रिल

month-marathipizza04
daily25.com

‘एप्रिलिस’ या शब्‍दांपासून ‘एप्रिल’ हा शब्‍द तयार झाला. एप्रिलिस हा लॅटिन भाषेतील ‘एप्रिल्ज’ या शब्‍दाचा अपभ्रंश आहे. उद्घाटन करणे, उघडणे, फुटणे असा त्‍याचा अर्थ आहे. या महिन्‍यामध्‍ये युरोपात वसंताचे आगमन होते. त्‍यामुळे या महिन्‍याचे नाव ‘एप्रिलिस’ असे ठेवले गेले. कालांतराने त्‍याला ‘एप्रिल’ असे म्‍हटले जाऊ लागले. रोमन देवी ‘एक्रिरिते’च्‍या नावावर हे नाव आधारित आहे.

 

मे

month-marathipizza05
foodimentaryguy.files.wordpress.com

‘मेइयुस’ या लॅटिन शब्‍दापासून ‘मे’ शब्‍द तयार झाला. हे नाव वसंतदेवी ‘मेयस’च्‍या नावावरून पडले, अशी अख्‍यायिका आहे

 

जून

month-marathipizza06
amazonaws.com

जून हा ‘जुनियुस’ शब्‍दाचा अपभ्रंश आहे. रोमची प्रमुख देवी ‘जूनो’ हिच्‍या नावावरून या महिन्‍याला हे नाव दिले गेले. ‘जूनो’ ही रोमन देवराज जीयस याची पत्नी आहे. जूनो शब्द ‘जुबेनियस’ या शब्‍दापासून तयार झाला. त्‍याचा अर्थ ‘विवाह योग्य कन्या’ असा होतो.

 

जुलै

month-marathipizza07
fbccov.org

रोमन सम्राट जूलियस सीजर याच्‍या नावावरून जुलै महिन्‍याचे नाव पडले. याच महिन्‍यात जूलियस सीजरचा जन्‍म झाला होता. त्‍याच्‍या जन्‍मापूर्वी या महिन्‍याचे नाव ‘क्विटिलिस’ असे होते.

 

ऑगस्‍ट

month-marathipizza08
stephaniedaily.com

जूलियस सीजरचा पुतण्‍या आगस्टस सीजर याने आपल्‍या नावावर या महिन्‍याचे नाव ठेवले. यापूर्वी या महिन्‍याचे नाव ‘सॅबिस्टलिस’ असे होते.

 

सप्‍टेंबर

month-marathipizza09
123rf.com

‘सप्टेम’ शब्‍दावर आधारित असलेल्‍या ‘सप्‍टेंबरचा अर्थ ‘७’ असा होतो. प्राचीन रोमन कॅलेंडरमध्‍ये ‘संप्टेबर’ महिन्‍याला सातवे स्‍थान होते. मात्र, त्‍यात सुधारणा होऊन आता हा वर्षातील नववा महिना आहे.

 

ऑक्‍टोबर

month-marathipizza10
ben10spel.org

प्राचिन रोमन कॅलेंडरमध्‍ये या महिन्‍याला आठवे स्‍थान होते. मात्र, आता हा दहावा महिना आहे. याचा अर्थ ‘८’ असा होतो.

 

नोव्‍हेंबर

month-marathipizza11
mycutegraphics.com

‘नोवज’ या लॅटिन शब्‍दावरून ‘नोव्‍हेबर’ हे नाव पडले. याचा अर्थ ‘नऊ’ असा होतो. प्राचिन रोमन कॅलेंडरमध्‍ये हा नववा महिना होता.

 

डिसेंबर

month-marathipizza12
i.pinimg.com

लॅटिन शब्द ‘डेसेम’ पासून ‘डेसेंबर’ (डिसेंबर) हा शब्‍द तयार झाला. याचा अर्थ १० असा होतो. प्राचीन रोमन कॅलेंडरमध्‍ये हा दहावा महिना होता. आता वर्षाचा शेवटचा आणि बारावा आहे.

आहे की नाही मौल्यवान माहिती…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?