कॅन्सरच्या जीवघेण्या पेशींना मारून टाकणारी “केमोथेरपी” कशी काम करते? वाचा, समजून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

केमोथेरपी हा शब्द तसा बदनाम आहे. केमोचे नाव घेतलं की डोळ्यासमोर येतं अशा रोगाचं नाव ज्याचा संपूर्ण इलाज अजून वैद्यकशास्त्रासमोर आव्हान आहे.

केमो आणि कॅन्सर या दोघांचं नाव तस एकत्र घेतलं जात कारण केमो ही कॅन्सरसाठी विख्यात अशी थेरपी आहे.

याच्यामध्ये अशा औषधांचे combination करून पेशंटला दिले जाते ज्याने शरीरामध्ये असलेल्या कॅन्सरच्या पेशी मरून जातील.


जर समजा कॅन्सर पेशंट ची सर्जरी झाली असेल अथवा होणार असेल तरी सर्जरीबरोबर रेडीएशन आणि केमोथेरपी या संयुक्त उपचार पद्धतीचा वापर ट्रीटमेंट मध्ये केला जातो.

ही एक उपचार पद्धती असल्यामुळे यात तोंडी घेण्याच्या गोळ्या, इंजेक्शन किंवा सलाईन मधून सोडली जाणारी औषधे या सर्व बाबींचा सामावेश होतो.

 

cancer-inmarathi01
chronicles.com

खरे पाहता ही थेरपी किती दिवस घ्यावी लागते याला कसलीही मर्यादा नाही. कॅन्सर पेशी मरून शरीरामध्ये नवीन पेशी तयार होण्यासाठी पेशंटचे शरीर किती अवधी घेईल हे दर पेशंटच्या बाबतीत वेगळे सत्य असते.

कदाचित काही दिवस, काही महिने किंवा काही वर्ष ही थेरपी सुरु राहते. कित्येक वेळा पेशंटचा सकारात्मक प्रतिसाद असेल तर ट्रीटमेंट लवकर देखील संपू शकते.


इंग्रजीमध्ये हर एका रोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टर साठी निरनिराळी नावे असतात. कॅन्सरसाठी जो डॉक्टर उपचार करतो त्याला onchologist ( ऑंकोलॉजिस्ट) असे म्हटले जाते.

असे कॅन्सर तज्ञ पेशंट ची उपचार पद्धती ठरवताना आणि पेशंटचे वय, झालेला सर्जरी चा प्रकार, घराण्यात पूर्वी असलेली रोगांची पूर्वपीठीका, पेशंटला असलेले इतर रोग या सर्वांचा एकत्रित साकल्याने विचार करतात.

केमोथेरपीची गरज का भासते?

खरे पाहता ज्यावेळी कॅन्सरचे ऑपरेशन करून शरीरातून ट्युमर काढला जातो त्याच्यानंतर केमोथेरपी घ्यावी असा सल्ला डॉक्टर देतात.

कारण जरी सर्जरी करून कॅन्सरग्रस्त भाग बाहेर काढला असेल तरीही कॅन्सरच्या पेशी शरीरामध्ये राहिलेल्या असू शकतात. अशा पेशींना पूर्णपणे मारून टाकण्यासाठी केमोचा चांगला उपयोग होवू शकतो.


 

chemotherapy-inmarathi
yournewswire.com

कधी जर ऑपरेशन जास्त अवघड असेल तर डॉक्टर अगोदर केमोचा मारा करून शरीरातील ट्युमर संकुचित करता येतो का ते पाहतात.

जर केमोचा उपयोग होवून ट्युमर बऱ्यापैकी आटोक्यात आला तर त्यानंतर पेशंटची स्थिती बघून ऑपरेशनचा निर्णय घेतला जातो.

केमो शरीरात झालेल्या ट्युमर च्या रक्तवाहिन्या वर हल्ला करून त्यांची वाढ थांबवते परिणामी ट्युमार शरीरात पसरत नाही.

केमो फक्त कॅन्सर ग्रस्त पेशींबरोबर लढा देत राहते मात्र या प्रक्रियेमध्ये कॅन्सरग्रस्त पेशींबरोबर शरीरातील चांगल्या आरोग्यदायी पेशी देखील मारल्या जातात. हा या थेरपीचा एक drawback म्हणावा लागेल.


केमोथेरपीसाठी कुठली औषधे वापरली जातात?

केमोथेरपी मध्ये अनेक औषधांचा संच वापरला जातो. पूर्वीपासून शरीरामध्ये सोडली जाणारी आणि शरीरावर चांगला आणि वाईट असा दोन्ही परिणाम करणारी औषधे कॅन्सर थेरपी मध्ये उपलब्ध आहेत.

उदा. अल्कलाईन एजंट या प्रकारची औषधे अगदी पूर्वी पासून कॅन्सरवर दिली जातात.

या प्रकारच्या औषधांच काम असत कॅन्सरग्रस्त पेशींची वाढ थांबवणे. या प्रकारची औषधे कॅन्सर पेशी नष्ट करतात पण या प्रक्रीयेमध्ये शरीराच्या हाडांमध्ये असणारा Bone Marrow देखील नष्ट होतो.

अँटीमेटॅबोलिक एजंट्स या प्रकारात येणारी औषधे कॅन्सरग्रस्त पेशींचा जो मेटॅबोलिझम असतो तो थांबवण्याचे काम करतात. याचा अर्थ कॅन्सरग्रस्त पेशींना शरीरातील चांगल्या पेशी वापरता येत नाही आणि त्याचं कार्यक्षेत्र थंडावत जात.


 

chemo-inmarathi
cancerpreventionnews.com

अॅन्थ्रासायक्लीन केमोथेरपी या प्रकारामध्ये दिली जाणारी औषधे कॅन्सरग्रस्त पेशींचा जो DNA असतो त्याच्यावरच जोरदार हल्ला चढवतात.

परिणाम कॅन्सरग्रस्त पेशींची वाढ थांबून त्या नष्ट होण्याची प्रक्रिया सुरु होते. मिटॉटिक इनहिबीटर्स या नावाने ओळखली जाणारी औषधे मुख्यत: कॅन्सरग्रस्त पेशीना आपल्या शरीरातून जे प्रोटीन मिळत ज्याच्यावर या कॅन्सरग्रस्त पेशींची वाढ चालू असते.

ते प्रोटीन बनवण्याची प्रक्रिया पूर्णपणे तोडून टाकण्याचं किंवा थांबवण्याच काम या औषधांमार्फत केले जाते.

स्टेरॉईडसचा देखील कॅन्सर थेरपी मध्ये उपयोग केला जातो. केमोथेरपीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी केमोच्या फेऱ्या झाल्यानंतर येणारी चक्कर, उलट्या थांबण्यासाठी अशी औषधे दिली जातात.

केमोथेरपीचा उपयोग होतो आहे किंवा नाही हे कॅन्सरतज्ञ शरीरातील असणाऱ्या ट्युमरची साईज कमी झाली आहे का नाही या निकषावर ठरवतात.


जर ट्युमरची वाढ थांबली आहे आणि तो कमी कमी होत चालला आहे ही बाब यशस्वी केमोथेरपीचे लक्षण समजली जाते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?