बॅटमॅन “काल्पनिक” आहे, पण गुजरातमधील या बाईंचं घर बघून “बॅटवूमन” खरी आहे असं म्हणावं लागतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपण लहानपणापासूनच शिकत आलोय की, अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. ह्या गरजा भागवण्यासाठीच आपण सगळी धडपड करत असतो.

कोणी नोकरी करतं, कोणी व्यवसाय, उद्योग-धंदा करतं, म्हणजेच काय तर अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी मनुष्य खूप मेहेनत करतो.

म्हणजेच काय तर मनुष्य कठोर परिश्रमांनी आपल्या तसेच आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करतो.

ह्या गरजा पूर्ण झाल्यानंतर किंवा पूर्ण होतीलच ह्याची खात्री झाल्यावर आपण आपल्या अतिरिक्त गरजा (काही प्रमाणात चैनीच्या, आवडीच्या वस्तू म्हणू शकतो) भागवण्याचा विचार करू लागतो.

 

indian family inmarathi
saheliboston.org

 

घरातल्या गरजा पूर्ण झाल्यावर काही जणं आपल्यासाठी काही वस्तू घेतात, काही जणं आपल्या घराला आपल्या मनाप्रमाणे सजवतात, काही जणं आपली मनपसंद वस्तू खरेदी करतात.

एकूण काय तर अनेक जणं आपल्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर आपल्या मनाच्या वस्तू खरेदी करतात. आपल्या मधल्या बऱ्याच जणांना प्राणी पाळायची हौस असते.

कोणी कुत्रा पाळतं, कोणी मांजर पाळतं, कोणी मासे तर कोणी शेळ्या, बकऱ्या पाळतं. बळीराजाकडे तर गाय, बैल असतातच. वाळवंटात राहणाऱ्यांकडे उंट असतात.

कोणी पोपट, मैना, लव्ह बर्डस, कोंबड्या पाळतात. एकूण काय काही जणं उदरनिर्वाहासाठी प्राणी, पक्षी पाळतात, तर काही जणं आवड म्हणून, छंद म्हणून प्राणी-पक्षी पाळतात.

 

pets inmarathi
petnewsandviews.com

 

काही काही माणासांना जंगली प्राणी पाळायची हौस असते. जसे, अरब लोकं आपली शेखी मिरवायला, आपले सामर्थ्य दाखवायला वाघ, सिंह पाळतात.

काही जणं सर्पमित्र असतात जे साप, नाग, अजगर, सरडे ह्यासारख्या सरपटणार्या आणि ज्यांना सामान्य लोकं घाबरतात असे प्राणी पाळतात.

काही काही सर्पमित्र अश्या जनावरांना माणसांच्या घरात चुकून शिरले तर त्या जनावरांना सहीसलामत सोडवून त्यांच्या घरी म्हणजेच जंगलात सोडतात.

 

sarpamitra inmarathi
youtube.com

 

म्हणजेच, कोणाकोणाला भयंकर प्राणी पाळायचा देखील छंद असतो. आणि हे असे प्राणी मनुष्य पाळू शकतो हे जगजाहिरच आहे.

पण काही काही लोकं अतर्क्य, कल्पनातीत आणि विश्वास ठेवायला कठिण जाईल अशा गोष्टी करतात.

तो त्यांचा छंद असतो किंवा त्यांना येनकेन प्रकारेण प्रसिद्ध व्हायचं असतं. कारण काहीही असलं तरी अशी विचित्र, भीतीदायक गोष्टी करणारी माणसं आहेत.

आज आपण अशाच एका आजीबाईंचे पाळीव प्राणी बघणार आहोत ज्यांच्यामुळे तिचं घर भयावह वाटतं.

आपण बऱ्याचशा भयपटात बघितलं असेलच, जुना, पडका वाडा किंवा वर्षानुवर्षे बंद असणारे पडके घर, महाल, किल्ला असलं काही तरी दाखवतात.

 

scary house inmarathi
businessinsider.com

 

आणि मग खूप वर्षांनी तिकडे कोणी तरी जातं आणि मग एकदम फडफड करत, चीत्कारत त्यांच्या अंगावर (७० एम्.एम्. च्या पडद्यावर तर प्रेक्षकांना वाटतं त्यांच्याच अंगावर येतायत) येतात ती वटवाघळं!

एकदम शहारायलाच होतं तेव्हा भीतीने!

तर ह्या आज्जीबाईंनी त्यांच्या घरात हीच इतर, सामान्य लोकांना ज्यांची भीती वाटते अशी वटवाघळं पाळली आहेत. आणि ही वटवाघळं दोन चार नाही तर चक्क जवळपास २००० तरी असतील.

खरंच आहे की नाही भीतीदायक आणि आश्चर्यकारक? चला तर मग जणून घेऊ या ह्या आज्जींबद्दल आणि त्यांच्या या अनोख्या पाळीव प्राण्याबद्दल!

 

shantaben prajapati inmarathi
m.dailyhunt.in

 

त्यांनी ही महिती स्वतः एका खाजगी वृत्त वाहिनीला दिली आहे.

गुजरात राज्यातील राजपुर ह्या छोट्याश्या गावात राहणार्या ह्या आजींचं नाव आहे शांताबेन प्रजापती. छोटंसं खेडं असल्याने सगळ्यांची घरं साहजिकच कच्ची, मातीची आणि बैठी होती.

नंतर हळूहळू त्या गावात सुधारणा होऊ लागल्या. शांताबेनच्या आजुबाजुंच्यांनी पक्की, सिमेंटची घरं बनवून घेतली.

इमारती होऊ लागल्या, त्यासाठी झाडे, जंगल तोडली गेली आणि वटवाघळांचं घर नष्ट झलं आणि ती आसऱ्याला आली शांताबेनच्या घरात.

कारण, फक्त शांताबेन ह्यांचंच घर जुनं, कच्चं आणि बैठं आहे जे वटवाघळांना आवडतं.

शांताबेननी पहिल्यांदा एकच वटवाघुळ घराच्या छताला लटाकलेलं बघितलं. पण, शांताबेननी त्या वटवाघळाला हाकललं नाही. मग सुरू झालं बाकीच्या वटवाघळांचं येणं!त्यांनाही शांताबेननी आसरा दिला.

दोन खोल्यांच्या ह्या घरात छताला, भींतीला सगळीकडे वटवाघळं लटकलेली दिसतात. एक, दोन करता करता हळू हळू हजारोंच्या संख्येत गेलेली ही वटवाघळं आजींच्या घरात निर्धास्तपणे राहतात.

 

bats inmarathi
latestly.com

 

त्यांचा ची ची आवाज सर्वत्र घुमत असतो. ७० वर्षांच्या शांताबेनच्या पतींचे – कानजीभाईंचे निधन सुमारे ४० वर्षापूर्वी झाले आणि त्यांना चार मुले आहेत.

दिनेश हा एकुलता एक मुलगा आणि ज्योत्स्ना, चंद्रिका आणि कांचन ह्या तीन मुली, ह्यांचा संभाळ, पालनपोषण शांताबेनने एकटीने शेतात मजुरी करून केले.

दिनेशने घर सोडून गेल्याला खूप वर्ष झाली. त्यामुळे मुलीच आईचा खर्च संभाळतात. पण, त्यांनाही त्यांच्या घर-संसारामुळे नेहेमी येता येत नाही.

आणि त्यातही शांताबेनची नातवंडं ह्या वटावाघळांना घाबरतात. मग अशा परिस्थितीत शांताबेननी ह्या वटवाघळांनाच आपले कुटुंब मानले आहे.

अतिशय श्रद्धाळू असणाऱ्या शांताबेन रोज सकाळी मंदिरात जातात. तिथे प्रार्थना, भजन वगैरे केल्यावर परत येऊन सुरू होते त्यांची लगबग!

चहा, नाश्ता वगैरे झाल्यावर सुरुवात होते त्यांच्या साफसफाईला. आता एव्हढी वटवाघळे घरात आहेत म्हंटल्यावर ते घरात घाण करणारच! आख्खं घर घाणीने भरलेलं असतं सकाळी.

त्यामुळे गावातले लोक पण शांताबेनना म्हणतात की, “वटवाघळांमुळे तुमच्या घरात दुर्गंधी पसरेल, त्यांच्यामुळे तुम्ही आजारी पडाल” वगैरे.

त्यांचा पुतण्या बाबुभाई प्रजापती पण त्यांना वटवाघळांना घरातून हाकलण्यास सांगतो नेहेमी. पण, शांतबेन त्याला ठाम नकार देतात.

कितीही साफसफाई करायला लागली तरी चालेल पण, वटवाघळांना हाकलणार नाही असं त्या सांगतात.

 

shantaben inmarathi
anandabazar.com

 

शांताबेन रोजच्या साफसफाईबरोबरच घरात कडुलिंबाची पाने देखील जाळतात ज्यामुळे सगळे जीवाणू, विषाणू नष्ट होतात.

त्यांना वटवाघळांची, त्यांच्या ची ची आवाजाची भीती वाटत नाही. त्या ची ची आवाजातही त्या एखादी डुलकी काढू शकतात.

एक वटावाघूळ चीत्कारायला लागले तर तो आवाज सहन होत नाही इकडे तर हजारो आहेत. किती आवाज असेल त्यांचा! ही वटवाघळे कधीही येतात कधीही बाहेर जातात.

शांताबेनच्या हातातून फळे घेऊन खातात. शांताबेनना हे सगळे आशीर्वाद असावेत असंच वाटतं.

काही गावकरी त्यांच्या तब्येतीसाठी वटवाघळांना हाकलण्यास सांगतात पण, काही लोकांना मात्र शांताबेनचे कौतुक वाटते.

अनेक दशकांपासून शांताबेनच्या शेजारी राहणाऱ्या घेमती दलजी ह्यांना शांताबेनच्या दयाळू स्वभावाचे खूपच कौतुक करतात. त्या म्हणतात,

‘शांताबेन वटवाघळांची काळजी घेते हे खूपच उत्तम कार्य करित आहे’. गावातली तरूण मुलं तर शांताबेनना ‘Shantaben chamachidiyawala’ (the bat lady) ह्या नावाने ओळखतात.

 

batwoman inmarathi
anandabazar.com

 

शांताबेन म्हणतात,

“ह्या वटवाघळांना कधीही येऊ दे, कधीही जाऊ दे, त्यांनी किती आवाज करू दे, कितीही घाण करू दे! मला ह्यांचा राग येत नाही उलट मला ही खूपच आवडतात. देवाचा जणू आशीर्वादच आहेत ही वटवाघळे म्हणजे!”

खरंच शांताबेनची ही अनोखी कहाणी वाचून लोकांचे छंद, आवडी किती वेगळ्या असू शकतात हे लक्षात येते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “बॅटमॅन “काल्पनिक” आहे, पण गुजरातमधील या बाईंचं घर बघून “बॅटवूमन” खरी आहे असं म्हणावं लागतं!

  • May 17, 2020 at 9:46 am
    Permalink

    सुंदर माहितीपूर्ण लेख

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?