कुठे ५० तर कुठे ७० डिग्री तापमान, ही आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सध्या संपूर्ण महाराष्ट्राला उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्ह एवढं वाढलं आहे की जराही बाहेर निघालं तरी अंगाची लाहीलाही होते. कुलर आणि एसी शिवाय जगणे आता कठीण झाले आहे.

पण तुम्हाला माहित आहे का, आपण ज्या ठिकाणी राहतो तिथे पडणारे उन्ह हे तर आपण सहन करू शकतो, पण जगात काही अशी ठिकाणं देखील आहेत जिथे अमर्याद उष्णता असते. म्हणजे त्या ठिकाणी कोणी जगूच शकत नाही असा उन्हाळा.

अश्या ठिकाणांना जगातील सर्वात उष्ण ठिकाणं म्हणून ओळखलं जातं.

दश्त-ए-लुत, ईरान :

 

Lut_Desert-inmarathi
topito.com

दश्त-ए-लुत हे जगातील सर्वात उष्ण ठिकाण आहे. येथील तापमान हे ७० डिग्री सेल्सिअस पेक्षाही जास्त असतं. २००४ साली येथील तापमान हे ७० डिग्री एवढं नोंदविण्यात आलं. तर २००५ साली येथील तापमान हे ७०.७ एवढं नोंदविण्यात आलं होतं. ह्या तापमानात कुठलाही मनुष्य किंवा जीव-जंतू जिवंत राहु शकत नाही.

केव ऑफ द क्रिस्टल, मेक्सिको :

 

cave of the crystal-inmarathi
aol.com

मेक्सिकोच्या नैका येथे एक क्रिस्टल गुहा आहे. ही गुहा एवढी गरम आहे की येथिल तापमान हे ५८ डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढल्याचं नोंदवलं गेलं. ह्या गुहेत एवढी उष्ण हवा असते की, येथे कुठल्या प्रकारचे संशोधन देखील करता येत नाही. ह्या गुहेला जगातील सर्वात नैसर्गिक क्रिस्टल गुहा मानले जाते.

मोठं वाळवंट :

 

queensland desert-inmarathi
australiastockphotos.com

बॅडलॅण्ड म्हणू प्रसिद्द असणाऱ्या क्वीन्सलँडचा एक मोठा भाग हा वाळवंटाने वेढलेला आहे. २००३ बसली येथील तापमान हे ६९.३ डिग्री सेल्सिअस एवढं नोंदविण्यात आलं होतं. म्हणूनच येथे भयंकर दुष्काळ देखील पडतो.

अल-अजीजियाह, लीबिया :

 

Aziziyah__Libya-inmarathi
bintang.com

लिबिया येथील अल-अजीजियाह ह्या ठिकाणाचा समावेश देखील जगातील त्या निवडक ठिकाणांमध्ये होतो जिथे सर्वात जास्त उष्णता असते. उन्हाळ्यात येथील तापमान हे ४८ डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचतं, तर १९९२ सली येथील तापमानाने ५७.८ डिग्री सेल्सिअस एवढा उच्चांक गाठला होता.

फ्लेमिंगो माउंटेन, चीन :

 

The-Flaming-Mountains-inmarathi
topchinatravel.com

चीन येथील फ्लेमिंगो माउंटेन हा देखील जगातील सर्वात उष्ण प्रदेशांपैकी एक आहे. २००८ साली येथील तापमान हे ६६.८ दिग्र सेल्सिअस एवढं वाढलं होतं

ह्या प्रदेशांच्या मानाने आपल्या देशात तर खूप कमी गर्मी आहे. जर आपल्या देशात देखील उन्हाळ्यात तापमानाने एवढा उच्चांक गाठला असता तर आपण कसं जगलो असतो. त्यामुळे ह्या ठिकाणांच्या तुलनेत आपल्याकडील उन्हाळा परवडला…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “कुठे ५० तर कुठे ७० डिग्री तापमान, ही आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं

  • May 1, 2019 at 9:10 pm
    Permalink

    जय श्रीरामछान माहिती

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?