समलैंगिकतेला विरोध करणाऱ्यांंनो, हे पहा प्राचीन धर्मग्रंथातील समलैंगिक संबंधाचे संदर्भ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


लेखक: नचिकेत शिरुडे 

===

काल सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिला. त्या निकालानुसार भारतात समलैंगिक संबंध ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे LGBT समूहाच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला यश आले आहे.

इंडियन पिनल कोडचं कलम ३७७ हे ब्रिटिशांनी १८६० साली लागू केलेलं कलम ज्यानुसार अनैसर्गिक शारीरिक संबंध हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला होता.

ते कलम पूर्णतः रद्द केलं गेलं नसून त्यातील काही पार्ट शिथिल करण्यात आला आहे. ज्यामुळे समलैंगिक संबंधांना कायद्याचं अधिष्ठान मिळालं आहे.

तरीही न्यायालयाच्या ह्या निकालावर धार्मिक संघटनांकडून विरोध सुरू झाला आहे. समलैंगिक संबंध हा धर्मानुसार एक “हराम” आहे असं मत सर्व धर्मातील प्रमुख संस्थांच आहे.

 

Gay_homo_inmarathi
india.com

अश्यावेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नेमका हा विरोध कोणत्या आधारावर केला जात आहे?
तर हा विरोध करण्यामागे दिलं जाणारं सर्वात मोठं कारण आहे,


” समलैंगिक संबंध भारतीय संस्कृतीला नष्ट करून ठेवतील.”

मुळात खरंच असं आहे का? खरंच भारतीय संस्कृतीला समलैंगिक संबंध मान्य नाहीत का?

तर ते आपण जाणून घेऊयात काही ऐतिहासिक संदर्भातून यामागील तथ्य..

प्राचीन भारतीय समाज हा आजच्या कॅनडा आणि जर्मनी सारखा उदारमतवादी होता का हा वादाचा मुद्दा आहे, परंतु समलिंगी, तृतीयपंथी यांचं त्याकाळी समाजाने वेगवेगळ्या प्रकारे स्वीकार केला होता. तो कसा केला होता हे आपण तीन वेगवेगळ्या अस्पेक्टमध्ये जाणून घेऊ..

हिंदू महाकाव्य, धर्मग्रंथ :-

भारतीय पुराण कथेत समलैंगिक संबंधाबाबतीत अनेक उदारमतवादी विचारांचे अनेक प्रसंग सापडतात. भगीरथ राज्याचा जन्म दोन राण्यांचा संभोगातून झाला आहे, असा उल्लेख आहे. तसेच भगवान कार्तिकेय यांचा जन्म अग्नि देवतेने भगवान शंकराचे अंश घेऊन झाला असल्याचा देखील उल्लेख आहे.

यावरून एक गोष्ट लक्ष्यात येते त्याकाळी लैंगिक समानता होती आणि लोकांचा खाजगी बाबींसकट त्यांचा स्वीकार करण्यात येत होता. तसेच लैंगिकतेला तिच्या प्रत्येक रुपात पूजलं जात होतं.

स्थापत्य व साहित्य :-

असे पुरुष ज्यांचा व्यवहार स्त्री सारखा असतो पण देह पुरुषांचा असतो. अश्या व्यक्तींचा भारतीय समाजात हजारो वर्षांपासून समावेश केला जातो. त्यांना क्लिबा नावाने ते त्याकाळी ओळखले जात. ब्रह्म शास्त्रात ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात देवांनी जगाची वाटणी ३ विश्वात केली.

तेव्हा परमेश्वराने स्वर्गातील दुःखाची वाटणी एका वैश्येत केली जी सामाजिक दृष्ट्या अमान्य करण्यात आलेली महिला होती.

 

homosexual-ancient-inmarathi
Stillunfold

नरकातील दुःखाची वाटणी एका कामपुरुषात केली तो ही सामाजिक दृष्ट्या अमान्य करण्यात आलेला पुरुष होता.

पृथ्वी वरच्या दुःखाची वाटणी ही एका क्लिबा जो एक तृतीयपंथी होता त्याचा वाट्याला करण्यात आली होती.

नंतर आलेल्या हिंदू स्मृती उदारणार्थ मनुस्मृती मध्ये मात्र तृतीयपंथीयांचे अधिकार नाकारण्यात आले. कुठल्याही कार्यात त्यांचा सहभाग निषिद्ध करण्यात आला.

त्यांना मालमत्ता न बाळगण्यासाठी सांगण्यात आले. क्लिबा चा अर्थ नामर्द अथवा नपुंसक असा होत नाही. हिंदू धर्मात क्लिबाचे १६ प्रकार देखील सांगण्यात आले आहेत. ज्यात एक आहे मुखभागा अर्थात तोंडावाटे प्रणय करणारे लोक, मनुस्मृतीने समलैंगिक संबंधांना अनेक शिक्षा दिल्या आहेत पण त्या शिक्षा फारच क्षुल्लक प्रकारच्या आहेत.

संस्कृती:-

मंदिरावरील स्थापत्याचा अभ्यास तसेच ऐतिहासिक दस्ताऐवजांचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की भारतात समलैंगिक संबंध अस्तित्वात होते. पण ते मुख्यधारेचा भाग नव्हते. त्यांचा अस्तित्वाची माहिती होती पण मान्यता नव्हती. काही प्रमाणात त्याचा स्वीकार केला जात होता.

भिन्न लैंगिक भाषे नुसार जेव्हा पुरुषाचे रूपांतर स्त्री मध्ये होते तेव्हा त्याचा मनात पुरुषांच्या प्रति वासना जागृत होते हाच तृतीयपंथी थियरीचा बेस मानला जातो.

तृतीयपंथी लोकांचे अस्तित्व भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून आहे. त्यांच्यात स्वतला स्त्री समजणाऱ्या पासून स्त्री सारखा पेहराव करणाऱ्या पर्यंतचा समावेश होत असतो. सोबतच ज्यांचा लिंगाची योग्य वाढ होत नाही ते देखील या कॅटेगिरीत येतात.

 

Homosexuality-in-Egypt-inmarathi
raseef22.com

तृतीयपंथी लोकांचे देशभरात वेगवेगळे सण उत्सव एकत्रीकरण होत असतात जे अनंत काळापासून चालू आहेत. त्यांना देखील देव असतात. जे त्यांचा प्राचीन काळापासूनच्या अस्तित्वाविषयी माहिती देत असतात.

मुघल सम्राट बाबरने सोडलेल्या त्याचा काही लेखनात मान्य केलं आहे की त्याला तरुण मुलांचा लगाव होता. अल्लाउद्दीन खिलजी व मलिक कफुरचे संबंध यावरून सिद्ध होते की “गे” लोकांचे अस्तित्व सर्व सामाजिक स्तरावर त्याकाळी होते.

त्याकाळी लोकसंख्या ही प्रति चौरस किलोमीटर ३२ होती आज ती  आहे. त्याकाळी दुष्काळ , साथीचे रोग यामुळे लोकसंख्या कमी होती. त्यावेळी उत्पादन कमी होतं. औषधशास्त्र अस्तित्वात नव्हतं. माता मृत्युदर तसेच शिशु मृत्यू दर भयावह होता.


माणसाचं सरासरी वय हे ४० वर्ष होतं.

त्याकाळी इतक्या कमी जनसंख्येत लोकांना समलैंगिक संबंधावर विचार करण्या इतका वेळ नव्हता. त्यांना तशी गरज नव्हती. त्यामुळे सामाजिक परवानगी वगैरेंची भानगड तेव्हा नसायची. तसेच समलिंगी लोकांची संख्या देखील फार कमी होती.

ब्रिटिश राज आल्या नंतर त्यांनी १८६० मध्ये ३७७ कलम लागू केलं. ज्या देशावर त्यांनी राज्य केलं तेथे त्यांनी ते कलम लागू केलं.

त्यामुळे समाजातील सर्व अनैसर्गिक संबंधांवर गदा आली. तेव्हा ही भीती निर्माण झाली. लोकांना समलैंगिक संबंधाबाबतीत कळू लागलं. त्या आधी इग्नोरन्स होता. जो नंतर नाहीसा झाला.

 

lgbt-marathipizza01
livemint.com

आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय त्यामुळेच योग्य आहे. मुळात जे कधीच आपल्या संस्कृती साठी अयोग्य नव्हतं ते आज अयोग्य ठरवण्याचा प्रयत्न लोक करत आहेत तो चुकीचा आहे.

अर्धनारिंटेश्वराला पूजणाऱ्या संस्कृतीचे आपण धनी आहोत, आपल्याकडून असा विरोध होणे अपेक्षितच नाही.

मुळात हा प्रश्न विरोध किंवा समर्थनाचा नाही आहे हा प्रश्न त्या दोन व्यक्तीचा स्वातंत्र्याचा आहे, जे आज एका कायद्यामुळे अमानवी ठरवले गेले आहेत.

ज्यांचं नातं अयोग्य ठरवण्यात आलं आहे. हा निर्णय त्यांचा स्वीकाराचा नसून त्यांचा प्रेमाचा व समानतेच्या अधिकाराचा आहे. जो स्वतंत्र भारतात मिळणे हे भारतीय लोकशाहीची खूप मोठी उपलब्धी आहे.


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?