श्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व ते वैदिक तत्वज्ञान: हिंदू तत्वज्ञानाच्या प्रेरणेतून तयार झालेले हॉलिवूड चित्रपट!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भारत, हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती ह्या सर्वांचे पाश्चात्य जगाला फार पूर्वीपासून आकर्षण आहे. जुलिया रॉबर्ट्स ने हिंदू धर्म स्वीकारला आहे हे बऱ्याच लोकांना ठावूक आहे. अनेक प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्यांनी असे मान्य केले आहे की हॉलीवूडला भारताविषयी आकर्षण आहे.

आणि अनेक गाजलेल्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये हिंदू संस्कृतीचे किंवा हिंदू धर्मातील प्रतीकांचे छुपे संदर्भ आढळून येतात.

आज आपण अशाच काही हॉलीवूड चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत ज्यात कळात नकळत प्राचीन हिंदू तत्वज्ञानाचे संदर्भ सापडतात.

१. Avatar (२००९)

 

1920x1080 Wallpavatar-movie-marathipizzaa
poparta.com

James Cameron चा २००९ साली आलेला Avatar चा चित्रपट कॉस्मिक नेचर विषयी माहिती देतो. हा अतिशय गाजलेला चित्रपट आहे. अवतार हा संस्कृत शब्द आहे. आपल्या हिंदू धर्मात नेहेमी भगवान विष्णू ह्यांच्या अवतारांविषयी सांगितले जाते. ह्यात भगवान विष्णू ह्यांचे रामावतारात व कृष्णावतारात मेघश्याम असे वर्णन केले आहे.

म्हणजेच मेघासारखा सावळा रंग त्यांचा होता असे सांगितले जाते.

अथांग , असीम पसरलेल्या ब्रह्मांडाचा रंग निळा असल्याने श्रीराम व श्रीकृष्ण सुद्धा मेघश्याम रुपात अवतरले. कॅमेरॉन च्या ‘Avatar’ चित्रपटात सुद्धा Na’Vi ह्यांचा रंग सुद्धा निळाच दाखवला आहे. जेव्हा कॅमेरॉन ह्यांना ह्या निळ्या रंगाच्या निवडीविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की,

मला निळा रंग अतिशय आवडतो. तसेच ह्या रंगाचा संबंध हिंदू देवतांशी सुद्धा आहे. हिंदू संस्कृती, प्राचीन हिंदू वाङ्मय, हिंदू देवता मला अतिशय आवडले व ती संस्कृतीच अतिशय समृद्ध आहे. मला त्यात थेट हस्तक्षेप करायचा नाही. पण त्यांच्या प्रतिकांचा वापर करणे अतिशय इंटरेस्टिंग आहे. मला आशा आहे की मी कुठल्याही हिंदू व्यक्तीच्या भावना ह्या द्वारे दुखावलेल्या नाहीत.

 

sri-krishna-marathipizza
onlineprasad.com

जसे हिंदू धर्मात भगवान विष्णू पृथ्वीवर अवतार घेऊन अधर्माचा नाश करतात तसेच ह्या चित्रपटात Avatar सुद्धा पृथ्वीवर स्वार्थी प्रवृत्तीमुळे होणारा सर्वनाश थांबवण्यासाठी येतो असे दाखवण्यात आले आहे.

अवतार मध्ये Na,vi लोकांना शेपूट दाखवण्यात आले आहे. हे शेपूट श्रीरामाला मदत करणाऱ्या सुग्रीवाच्या वानरसेने सारखेच आहे. प्राचीन हिंदू वाङ्मयात जसा परकाया प्रवेशाचा उल्लेख दिसून येतो, तसाच प्रसंग अवतार ह्या चित्रपटात सुद्धा दाखवण्यात आला आहे.

तसेच ह्या चित्रपटात ते लोक dragon सदृश प्राण्यावर वर बसून इकडून तिकडे प्रवास करताना दाखवले आहेत. ते बघून भगवान विष्णूंचे वाहन गरुडाची आठवण होते.

 

२. Matrix Triology (1999-2003)

ह्या चित्रपटातील नायकाला योगीजनांसारखी शक्ती प्राप्त होते असे दाखवले आहे. मशीन्सने माणसावर विजय मिळवला आहे व सगळा कंट्रोल मशिन्सच्या हातात असून त्यांनी एक प्रोग्राम बनवला आहे, ज्यात माणसाला आपण जिवंत असून नॉर्मल आयुष्य जगतो असे वाटते परंतु खरं तर तो मशीनच्या कोशात कैद आहे.

 

matrix-marathipizza
youtube.com

हॉलीवूडमधील एक चित्रपट निर्माते Peter Rader असे म्हणतात की,

Matrix हा चित्रपट योगिक तत्वांवर आधारित आहे. योगिक तत्वज्ञान असे सांगते की हे जग म्हणजे एक मिथ्या आहे, माया आहे. आपण ह्या सर्व मोह मायेतून बाहेर पडलो तरच पुढे गती मिळवू शकतो.

हिंदू धर्मात हे जग माया आहे असेच सांगितले आहे. मूल गर्भात असताना त्याला सर्व सत्य कळत असतं, पण जन्माला आल्यावर मायेच्या प्रभावाने माणूस सगळं विसरतो आणि मिथ्या आयुष्य जगतो. तो मायेलाच सत्य समजतो, पण सत्य काय आहे हे त्याच्या कल्पनेत सुद्धा नसते.

जेव्हा संत सज्जन माणसाला ह्या मायेची जाणीव करून देतात, तेव्हा त्या माणसाला गुरुच्या मदतीने सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करता येतो. असेच काहीसे ह्या Matrix मध्ये सुद्धा दाखवलेले आहे. Neoला Morphus भेटल्यानंतरच त्याला सत्य काय आहे आणि मिथ्या काय आहे ह्याची जाणीव होते.

तसेच शेवटच्या सीन मध्ये Neo आणि Mr.Smith मध्ये जी मारामारी दाखवली आहे ती बघून महाभारतातील दुर्योधन व भीमाचे युद्ध ह्याची आठवण होते आणि चित्रपटाच्या शेवटी ‘असतो मा सद्गमय’ हा बृहदारण्यकामधील श्लोक बॅकग्राऊंडला म्हणताना आपण ऐकू शकतो.

असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मा अमृतंगमय
ओम शांती शांती शांती:

– हा हिंदू धर्मातील श्लोक देखील तर आपण देखील अनेक वेळा म्हणतोच…!

 

३. Interstellar (2014)

Interstellar हा चित्रपट universal super-consciousness च्या कल्पनेवर आधारित होता. ह्यात universal super-consciousness हा space आणि time च्या पलीकडे अस्तित्वात असतो आणि ह्याने माणसाचे संपूर्ण आयुष्य जोडलेले असते असे दाखवले आहे.

हि कल्पना खरं तर ३००० वर्षांपूर्वी वेदांमध्ये सांगितलेली आहे असे म्हणतात.

 

Interstellar-marathipizza
knowyourmeme.com

ह्या चित्रपटात असे दाखवलेले आहे की Miller ह्या ग्रहावरचा एक तास हा पृथ्वीवरील ७ तासांइतका असतो. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेममुळेह्या चित्रपटातील नायक व त्याचे सहकारी ह्या Miller नामक ग्रहावर ३ तासांसाठी अडकून पडतात.

म्हणजे पृथ्वीवरील २१ वर्ष ह्यात निघून जातात. म्हणजेच नायकाची दहा वर्षाची मुलगी ३१ वर्षांची होते पण नायक मात्र त्याच वयाचा कायम राहतो.

हिंदू पुराणात सुद्धा अशीच एक कथा सांगितली जाते.

एकदा देव व असुर ह्यांच्यात युद्ध झाले असता इंद्र्देवांनी मुचकुंद राजाची ह्या युद्धात मदत घेतली. राजा मुचकुंदाने ह्या युद्धात देवांची मदत केली. परंतु हे युद्ध एक वर्षभर चालले आणि हे युद्ध स्वर्गात झाले.

जेव्हा युद्ध संपले तेव्हा मुचकुंदाने परत पृथ्वीवर जाण्याची व त्याच्या कुटुंबाला परत भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा इंद्र्देवाने त्याला सांगितले की स्वर्गातील १ वर्ष म्हणजे पृथ्वीवरील ३६० वर्ष होतं. इतक्या वर्षात मुचकुंदाचे कुटुंब, त्याचे राज्य काळाच्या ओघात नष्ट झाले असणार.

पुराणात आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे,

एकदा एक राजा व त्याची मुलगी रेवती हे स्वर्गातून जाऊन ब्रह्मदेवाला भेटतात. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना सांगतात की प्रत्येक लोकात काळाची गती वेगवेगळी आहे. जेव्हा ते ब्रह्मदेवांना भेटण्यासाठी स्वर्गात काही वेळ थांबले असता पृथ्वीवर मात्र हजारो वर्ष उलटून गेलेली आहेत.

जेव्हा तो राजा व त्याची मुलगी ब्रह्मदेवांना भेटून परत पृथ्वीवर येतात, तेव्हा पृथ्वीवर झालेला सगळा बदल बघून त्यांना आश्चर्य वाटते. भूप्रदेशात तसेच वातावरणात अनेक बदल झालेले त्यांना दिसून येतात आणि मानवजातीची अधोगती झालेली त्यांना दिसून येते.

ह्या चित्रपटातील अजून एक दृश्य म्हणजे चित्रपटातील नायक Matthew McConaughey उपनिषदांचा संदर्भ देताना दाखवण्यात आला आहे. तसेच तो इंद्रजालासारख्या परीस्थितीमध्ये अडकून पडल्याचे दाखवले आहे.

इंद्रजाल ही एक ब्रह्मांडाला दिलेली उपमा आहे. इंद्रजाल म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून हे संपूर्ण ब्रह्मांड, त्यातील सर्व ठिकाणे, त्यातील सर्व लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. फक्त प्रत्येक ठिकाणाचे, प्रत्येक लोकातील कालचक्र, काळाची गती वेगवेगळी आहे.

 

४. Star Wars Series

Star Wars मध्ये Princess Leia हिचे Darth Vader हा दुष्ट Warlord अपहरण करून तिला तिच्या इच्छेविरुद्ध बंदी बनवून ठेवतो. तिच्या मदतीची आर्त हाक एक नॉन ह्युमन the android R2-D2 ऐकतो आणि तिची परिस्थिती एका तरुणाला म्हणजेच नायकाला Luke Skywalker ला सांगतो.

मग नायक प्रिन्सेस ची मदत करायला, तिला दुष्टाच्या कचाट्यातून सोडवायला येतो. तेव्हा त्याची मदत Chewbacca नामक एक जीव करतो, जो अर्धा मनुष्य व अर्धा प्राणी आहे.

Star Wars trilogy च्या शेवटी Luke ची मदत एक गूढ Jedi knight Obi-Wan Kenobi करतो. तो एका मानववंशीय अस्वल सैन्याचे नेतृत्व करतो आणि प्रिन्सेसच्या सुटकेसाठी मोठे युद्ध होते. Darth Vader आणि त्याच्या दुष्ट सैन्याचा पराभव होतो, प्रिन्सेसची सुटका केली जाते व सगळीकडे वातावरण आनंदी होते.

– असे हे ह्या चित्रपटाचे कथानक आहे.

 

star-wars-marathipizza
aztecatrends.com

हे कथानक वाचून आपल्याला रामायणाची आठवण झाली तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. कारण रामायण व ह्या चित्रपटाच्या कथानकात बरेचसे साम्य आहे.

रावणाने सीतामातेचे अपहरण करणे, तिला लंकेत अशोकवनात तिच्या मनाविरुद्ध कैद करून ठेवणे, जटायू ह्या पक्ष्याने श्रीरामाला सीतामातेच्या अपहरणाचा वृत्तांत सांगणे. त्यानंतर श्रीरामाने सुग्रीवाच्या वानरसेनेच्या मदतीने व हनुमान व जांबुवंत ह्यांच्यासह रावणाशी युद्ध करून त्याचा वध करून सीतामातेची सुटका करणे व रामराज्य स्थापन करणे ह्यावरूनच ह्या चित्रपटाच्या कथेची प्रेरणा घेण्यात आली आहे असे म्हणायला हरकत नाही.

चित्रपटात युद्धासाठी ट्रेनिंग घेताना Yoda आणि Luke ह्यांचे नाते वेदातील गुरु शिष्याप्रमाणे भासते. आणि जसे श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगून मार्गदर्शन केले तसेच चित्रपटात मार्गदर्शन केले Yoda ने Luke ला केले.

Star Warsचे निर्माता George Lucas ह्यांनी हे साम्य नाकारले नाही. ते म्हणाले की,

मी प्राचीन काळातील कथा नव्या स्वरुपात मांडतोय!

 

५. Inception

Inception हा चित्रपट पूर्णपणे भारतीय तत्वज्ञानावर आधारलेला आहे.

 

inception-marathipizza
kudago.com

आदि शंकराचार्य ह्यांच्या अद्वैतवादानुसार ‘ब्रह्म सत्यम जगत मित्या, जीवो ब्रह्मैव नापरः’ म्हणजेच ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे. हे सर्व जग माया आहे, मिथ्या आहे आणि जीवात्मा हा ब्रह्मच आहे. आपल्या भारतीय हिंदू तत्वज्ञानानुसार आपण जे सत्य मानतो, ते सर्व मिथ्या आहे, परमेश्वराने निर्मिलेली माया आहे.

हे जग जे आपण खरं मानतो ते परमेश्वराचे स्वप्न आहे. भगवान विष्णू जेव्हा निद्रावस्थेत असतात तेव्हा त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेवाचा जन्म होतो व ते ह्या सर्व सृष्टीची निर्मिती करतात. अनेक युगांनंतर जेव्हा भगवान विष्णू जागृत होतात, तेव्हा ब्रह्मदेव परत विलीन पावतात आणि ह्या सृष्टीचा अंत होतो असे आपल्या पुराणात म्हटलेले आहे.

तसेच ह्या चित्रपटात असे म्हटले आहे की, स्वप्नांच्या जगात काळाची गती बदलते. खऱ्या जगातील ५ मिनिटे म्हणजे स्वप्नांच्या जगात पहिल्या पातळीवर १ तास. असेच पुढेपुढे पातळी वाढली की अंतर वाढत जाते. म्हणजेच स्वप्नांच्या जगात जर पुढच्या पुढच्या पातळ्यांवर गेल्यावर तुमचा खऱ्या जगाशी असलेला संबंध तुटत जातो.

Inception मधील ड्रीम वर्ल्ड आणि ड्रीम टाईम हि कल्पना आपल्या हिंदू पुराणातील मानवी वर्ष, देवांचे वर्ष आणि पितारांचे वर्ष ह्यांच्या सारखीच आहे. आपल्या पुराणात सुद्धा मानवी वर्ष आणि देवांच्या वर्षामध्ये फरक आहे.

आपले एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असतो असे म्हणतात. म्हणूनच असे म्हणतात की आपले जग, आपले आयुष्य हे परमेश्वराचे स्वप्न आहे. ह्यातले काहीही खरे नाही आणि शाश्वत नाही. आपल्याला मायेच्या जंजाळात अडकल्यामुळे अंतिम सत्याचा विसर पडला आहे.

म्हणूनच आपण स्वप्नांना खरे मानून दु:ख करीत बसतो आणि “पुनरपि जननं पुनरपि मरणं , पुनरपि जननी जठरे शयनं” ह्या चक्रात अडकतो. हाच विचार थोड्या फरकाने ह्या चित्रपटात दिला आहे.

तर असे हे चित्रपट आहेत जे आपल्या हिंदू तत्वज्ञानावर आधारित आहेत…!

कधी विचार केला होता का असा?!

हे देखील वाचा : (हिंदू नसूनही या जगप्रसिद्ध व्यक्तींनी देखील मान्य केले होते भगवद्गीतेचे महात्म्य!)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “श्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व ते वैदिक तत्वज्ञान: हिंदू तत्वज्ञानाच्या प्रेरणेतून तयार झालेले हॉलिवूड चित्रपट!

  • January 21, 2018 at 12:10 pm
    Permalink

    wow great , thanks to Hollywood

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?