रामानंतर रघुवंशातील ह्या राजांनी सांभाळला अयोध्येचा राज्यकारभार

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

भगवान राम हे अयोध्येचे राजा होते, तसेच ते हिंदू धर्मियांचे प्रमुख देव देखील आहेत. त्यांना भगवान विष्णूचे सातवे रूप मानले जाते. भगवान राम यांच्याआधी त्यांचे पिता राजा दशरथ हे रघुवंशाचे प्रमुख होते. रघुवंशला ‘ईक्ष्वाकु वंश’ देखील म्हटल्या जाते, कारण ईक्ष्वाकु यांनी या वंशाची स्थापना केली होती.

 

raghuvansh-inmarathi01

रघुवंशाच्या प्रमुख राजांमध्ये रामासोबतच हरिश्चंद्र, भगीरथ, दिलीप, रघु, अजा आणि दशरथ यांची नावं तर आपण ऐकलीच आहेत. पण रामानंतर रघुवंशाला कुठले राजा मिळाले? याबद्दल कदाचितच आपल्याला माहित असेल.

 

raghuvansh-inmarathi

लव-कुश हे राम-सीताचे जुळे मुलं होते. कुश लवपेक्षा मोठा होता. रामाने एका धोब्याचे ऐकून सीतेला अयोध्येतून जाण्यास सांगितले होते. तेव्हा सीता ही महर्षी वाल्मिकी यांच्या येथे जाऊन राहिली आणि तीने तेथेच लव-कुशला जन्म दिला.

महर्षी वाल्मिकी यांनीच लव-कुशला शिक्षा दिली. रामाने एकदा आपल्या महालात अश्वमेध यज्ञ करवले, त्यावेळी त्याला कळाले की लव-कुश त्याचेच मुलं आहेत.

 

raghuvansh-inmarathi02

असं म्हणतात की विष्णू अवतारांची मृत्यू होत नाही, तर ते वैकुंठात जातात. त्याचप्रकारे भगवान राम देखील पृथ्वीवरील त्याचं कार्य पूर्ण करून वैकुंठात परतले.

 

lord ram story-inmarathi04

त्याआधी त्यांनी आपल्या मुलांना अयोध्येचा राजा बनवून सर्व कामकाज त्यांच्यावर सोपवले. त्यांनी लव याला श्रावस्ती आणि कुश याला कुशवटीचा राजा बनवले. या दोघांनीच लवपुरी (लाहौर) आणि कसुर या राज्यांचा शोध लावला होता.

 

raghuvansh-inmarathi03

 

लव-कुश नंतर कुशचा मुलगा अतिथी राजा बनला. मुनी वशिष्ठ यांच्या सानिध्यात अतिथी एक कुशल राजा बनला. तो अतिशय विनम्र आणि एक महान योद्धा होता. अतिथी नंतर त्यांचा पुत्र निषध राजा बनला.

त्यानंतर नल राजा बनले, ते देखील एक महान योद्धा होते. नलयांचा एक मुलगा होता नभ. जेव्हा नभ मोठा झाला तेव्हा नल जंगलात निघून गेले आणि आपल्या मुलाला राज्य सोपवले. नभ नंतर पुण्डरीक राजा बनले.

 

raghuvansh-inmarathi04

पुण्डरीक नंतर त्यांचा मुलगा क्षेमधन्वा या वंशाचे राजा बनले. क्षेमधन्वाचा मुलगा हा देवतांच्या सेनेचा प्रमुख होता म्हणून त्याचं नावं देवानीक ठेवण्यात आले होते.

राजा देवानीक यांच्यानंतर त्यांचा मुलगा अहीनगु राजा बनला. त्यांनी संपूर्ण पृथ्वीवर राज्य केले. ते एवढे चांगले राजा होते की त्यांचे शत्रू देखील त्यांच्या मोहात पडायचे.

 

raghuvansh-inmarathi05

राजा अहीनगु नंतर त्यांचा मुलगा पारीयात्र आणि त्यानंतर त्यांचा मुलगा आदि राजा बनले.

तसे तर रघुवंशाचे वारस आजही आहेत, पण सुमित्रा हे अयोध्येचे शेवटचे राजा असल्याचं मानल्या जाते.

स्त्रोत : speakingtree

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?