“जिंदगी ना मिलेगी दोबारा”मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या टोमॅटिना फेस्टिवलची सफारी अनुभवायची असेल तर हे वाचाच…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

स्पेनमधील जगप्रसिद्ध ला टोमॅटिना फेस्टीव्हल म्हणजे जगातील सर्वात अनोखा उत्सव म्हणावा लागेल. उत्सवासाठी स्पेनमध्ये जगभरातील पर्यटकांची गर्दी होत असते. एकमेकांना टोमॅटो मारून किंवा टोमॅटोचा पल्प फेकून एकप्रकारे जणू टोमॅटोची धुळवडच यानिमित्ताने पर्यटक साजरा करत असतात.

 

la-tomatina-marathipizza01
kickasstrips.com

स्पनेमधील या फेस्टीव्हलमध्ये सुमारे २२,००० नागरिक आणि पर्यटक सहभागी होतात. स्पेनच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या बुनोल या छोट्याशा गावात दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या बुधवारी हा फेस्टीव्हल साजरा केला जातो. या फेस्टीव्हलबाबत नेमका इतिहास समोर आलेला नाही. याबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. जाणून घेऊयात काय आहे हा इतिहास.

हा फेस्टीव्हल नेमका कसा सुरू झाला याचा तंतोतंत इतिहास सध्या उपलब्ध नाही. एका परेडदरम्यान दोन मुलांचे भांडण सुरू झाले आणि हाणामारी दरम्यान त्या दोघांनी एकमेकांवर टोमॅटो फेकून मारायला सुरुवात केली, तेव्हापासून याची सुरुवात झाली असे काही जण सांगतात. तर काही लोकांच्या मते शहरातील प्रशासनाचा निषेध म्हणून हे टोमॅटो फेकायला सुरुवात झाली.

la-tomatina-marathipizza02
holidaysgenius.com

तर काही जण एका अत्यंत वाईट संगीतकारावर टोमॅटो फेकून मारण्यात आले होेते तेव्हापासून याची सुरुवात झाल्याचे सांगतात. पण १९४५ पासून १०,००० लोकसंख्येच्या या गावातील लोकांचे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या बुधवारी फेस्टीव्हल साजरा करण्यावर एकमत झाले आणि तेव्हापासून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

सुरुवातीच्या काळात या फेस्टीव्हलला अधिकृत मान्यता नव्हती. केवळ गावातील लोक ठरवून दरवर्षी एकाठिकाणी जमायचे आणि एकमेकांवर टोमॅटो फेकून हा फेस्टीव्हल साजरा करायचे. त्यासाठी ते स्वतः टोमॅटो घेऊन यायचे.

पोलिस आणि स्थानिक नेत्यांनी अनेकवेळा या महोत्सवाच्या विरोधात कारवाई देखिल केली. अन्न वाया जात असल्यामुले त्यांच्यावर कारवाई केली जात होती.

 

la-tomatina-marathipizza03
wikimedia.org

१९६० मध्ये फ्रान्सिस्को फ्रान्को यांच्या हुकूमशाहीच्या काळामध्ये ला टोमॅटिनो फेस्टीव्हवर बंदी लादण्यात आली होती. या फेस्टीव्हलला कोणतीही धार्मिक मान्यता नसल्याने ही बंदी लादली होती.

पण १९७५ मध्ये फ्रान्कोच्या मृत्यूनंतर सॅन लुईस बर्टन याने पुन्हा एकदा या महोत्सवाचे आयोजन करायला सुरुवात केली. विशेष म्हणजे त्यासाठी टोमॅटोही तोच पुरवायला लागला.

त्यानंतर १९८० मध्ये स्थानिक प्रशासनाने या फेस्टीव्हलची सुत्रे हाती घेतली आणि सध्या साजरा केला जाणारा हा फेस्टीव्हल धडाक्यात साजरा केला जाऊ लागला.

या फेस्टीव्हलला जगभरातील पर्यटकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि फेस्टीव्हलचे यश पाहता २००२ मध्ये स्पेनच्या पर्यटन विभागाने या फेस्टीव्हलची औपचारिक फेस्टीव्हल म्हणून घोषणा केली. स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता या महोत्सवाची सुरुवात होते. महोत्सवामध्ये सुमारे १,५०,००० टोमॅटोचा वापर केला जातो.

 

la-tomatina-marathipizza04
lovevalencia.com

गावातील एका चौकामध्ये एका खांबावर हॅम लटकवण्यात येते. जोपर्यंत फेस्टीव्हलमध्ये सहभागी झालेला एखादा व्यक्ती त्या खांबावर चढून ते हॅम खाली फेकत नाही तोवर टोमॅटो फेकायला सुरुवात होत नाही. ते हॅम खाली येताच सहभागी झालेले पर्यटक आणि नागरिक एकमेकांवर टोमॅटोने हल्लाबोल करतात.

२०१३ पासून या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी १२ डॉलर एवढे शुल्क आकारले जाते. तसेच पूर्वी या महोत्सवात सुमारे ५० हजारावर लोक जमायचे. पण सुरक्षेच्या कारणास्तव हा आकडा २२,००० एवढा मर्यादीत करण्यात आला आहे.

 

la-tomatina-marathipizza05
intoday.in

जिंदगी ना मिलेगी दोबारा हा चित्रपट ज्यांनी पाहिला असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती आवर्जून पोहोचावा, कारण हा चित्रपट पाहिलेला असा एकही व्यक्ती आढळणे मुश्कील जो म्हणणार नाही की माझ्या विशलिस्टमध्ये ह्या फेस्टिव्हल मध्ये सहभागी होण्याचे स्वप्न नाही…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?