' तब्बल ७ वेळा उध्वस्त होऊनही दिमाखात उभी असलेली आपली राजधानी – InMarathi

तब्बल ७ वेळा उध्वस्त होऊनही दिमाखात उभी असलेली आपली राजधानी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

देशाचे वैभव, आपल्या देशाची राजधानी .. या शहराचा इतिहास तसा महाभारत काळापासूनचा आहे. पुराना किल्ल्याजवळ इंद्रप्रस्थ नावाचे गाव होते. पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ तीच असल्याच मानल्या जात.

इंद्रप्रस्थच्या पायावरच मुगल शासक हुमायूने पुराना किल्ला बांधला. पण जर ऐतिहासिक कागदपत्रांचा विचार केला तर आपल्या राजधानीचा पहिला संदर्भ हा इ.स. ७३७ मध्ये सापडतो.

तेव्हापासून ते इंग्रजांच्या साम्राज्यापर्यंत आपली राजधानी सात वेळा उध्वस्त झाली आणि पुन्हा नव्याने उभी देखील झाली. यादरम्यान सात वेगवेगळ्या शासकांनी येथे सात वेगवेगळी शहरं वसवली.

चला तर मग जाणून घेऊ दिल्लीच्या सात वेळा उध्वस्त होऊन देखील आपलं अस्तित्व जपाण्यामागील संघर्ष…

१. पहिलं शहर हे लालकोट जे राजा तोमरने वसवलं होतं…

 

lal-kot 1 InMarathi

ऐतिहासिक कागदपत्रांत दिल्लीचा पहिला संदर्भ हा इ. स. ७३७ मध्ये आला होता. तेह राजा अनंगपाल तोमर याने इंद्रप्रस्थ च्या १० मैल दक्षिणमध्ये अनंगपूर वसवले होते. येथे दिल्लीचे गाव होते.

काही काळानंतर त्या राजाने लालकोट हे नगर वसवलं. मानल्या जातं की हुमायने याच्याच पायावर पुराना किला बनवला. ११८० साली चौहान राजा तिसरे यांनी किल्ला राय पिथौर बनवला.

या किल्ल्याच्या आतच वसाहत होती. या किल्ल्याच्या भिंती ६ मीटर रुंद आणि १८ मीटर लांब होती. पण मोहम्मद गौरी याने राजाला हरवले आणि याद्वारे भारतात तुर्कांचे आगमन झाले.

२. दुसरं शहरं महरौली जे कुतुबुद्दीन याने वसवलं होतं…

 

kutubuddin abak InMarathi

मोहम्मद गोरीचा मुलगा शहाबुद्दीन याने गादि सांभाळल्या नंतर त्याच्या विश्वासू सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याला सर्व अधिकार सोपोविले.

ऐबक याने १२०६ मध्ये दिल्ली येथून शासन करण्यास सुरवात केली. त्याने कुतुब महरौली वसवली. हे दिल्लीचे दुसरे शहर होते.

चार वर्षांनंतर ऐबकची घोड्यावरून पडून मृत्यू झाली. ऐबकचा जावई इल्तुतमिष दिल्लीचा सुल्तान बनला. त्यानंतर त्याची मुलगी रजिया सुल्तान ही दिल्लीची शासक बनली.

३. तिसरं शहर जे अलाउद्दीन खिलजी याने वसवलं होतं…

 

Alauddin_Khilji_Tomb_Main InMarathi

रजिया सुल्तान नंतर कुतुबचे शासन संपुष्टात आले. १२९६ मध्ये अलाउद्दीन खिलजी गादीवर आला. त्याने सोनं लुटवत दिल्लीत प्रवेश केला. मंगोल शासकांनी जेव्हा हमला केला तेव्हा खिलजीने त्याच्या सैनिकांचे शीर कापून भिंतीत पुरले.

यामुळे त्याच्या किल्ल्याच नाव सिरी पडल. हिल्जीने रेवेन्यु सिस्टीम बनवल. सैन्य आणि बाजारपेठांवर त्याची नजर होती. त्याने रुग्णालय देखील बनविले. हे काम करणारे लोक या किल्ल्याच्या आतच राहायचे. या किल्ल्याच्या आतच पूर्ण शहरासाठी व्यवस्था होती.

४. चौथ शहरं तुगलकाबाद जे गयासुद्दिन तुगलक याने वसवलं…

 

tughlaqabad fort InMarathi

खिलजी कमजोर पडले तर १३२० मध्ये तुगलक दिल्लीत आले. गयासुद्दिन तुगलकने तुगलकाबाद किल्ला आणि गयासपूरच्या सभोवताली शहरं वसवलं. पण हा काळ तुगलकपेक्षा सुफी निजामुद्दीन औलिया आणि त्यांचे शागिर्द अमीर खुसरो यांच्यामुळे प्रकाश झोतात आले.

औलिया तर महबूब-ए-इलाही म्हणून ओळखल्या गेले. तर खुसरो यांनी ब्रजभाषेला अरबी-फारसी भाषेत रंगविले. त्यांनी बंदिशे लिहिली, राग तयार केले. सितार आणि तबला यांसारखे वाद्य बनवले. औलियायांनी तुग्लक वंशाच्या सात आणि खुसरो यांनी पाच सुल्तानांना बघितले.

५. पाचवं शहरं फिरोजशहा कोटला जे फिरोजशहा तुगलक याने वसवलं…

 

feroz_shah_kotla_fort InMarathi

गयासुद्दिन तुगलक नंतर मोहम्मद बिन तुगलक सुल्तान बनला. तो राजधानीला काही दिवसांसाठी दौलताबाद येथे घेऊन गेला आणि त्यानंतर परत दिल्ली ला परतला. त्यानंतर त्याचे काका फिरोजशहा तुगलक गादीवर आला.

फिरोजशहा याने यमुनेच्या काठावर कोटला वसवलं. येथे १८ गावं होते. १० हमाम १५० विहिरी, ३० महाल देखील त्याने बनविले. कुतुब मिणारला दुरुस्त केलं. ५ सरोवर बनविली. १३८८ साली त्याच्या मृत्यू झाला.

तैमुर लंगने १३९८ साली दिल्लीवर हमला केला. तीन दिवस तीन रात्र लुट केली. फिरोजशहाच्या शानदार शहराला खंडर बनविले. हजारो लोकांचे शिश कापण्यात आले. पण तैमुर खूप काळापर्यंत नाही टिकू शकला. लोदींनी त्याला हरवले.

बहलोल आणि सिकंदर नंतर इब्राहीम लोदीने दिल्लीला पुन्हा नव्याने वसवलं.

६. सहावे शहरं दीन पनाह जे हुमायुने वसवलं…

 

dinpanah fort InMarathi

इब्राहीम लोदीला मुगलांचे संस्थापक बाबर याने हरवल. लोदी हा युद्धात मारल्या गेला. बाबर तर तिथून समोर निघून गेला पण मुगल तेथेच थान मांडून बसले. बाबरने आग्रा ला राजधानी बनवले, पण त्याच्या मृत्यू नंतर हुमायु दिल्ली आला.

पुराना किल्ला जवळील परिसराला त्याने दीन पनाह नाव दिले. १५३९ मध्ये शेर शाह सुरी ने हुमायुला युद्धात हरवले. त्यानंतर दीन पनाह ला शेरगढ नाव देण्यात आले. बंगाल ते पेशावर पर्यंत रस्ता त्यानेच बनविला. जो नंतर ग्रांड ट्रंक रोड म्हणून नावारूपास आला. रुपयाचे चलन देखील सुरीनेच सुरु केले होते

७. सातवे शहर शाहजहानाबाद जे शाहजहा वसवलं…

 

Shahjahanabad fort InMarathi

शेर शाह सुरीची मृत्यू १५४५ मध्ये झाली. १५५५ साली हुमायु परत दिल्लीला आला. शेरगढला परत दीन पनाह बनवलं. पण सात महिन्यानंतर त्याची मृत्यू झाली. हुमायुचा मुलगा अकबर याने राजधानी आग्रामध्ये बनवली.

जहांगीर आणि शाहजहा च्या काळात देखील आग्रा ही मुगलांची राजधानी होती. पण नंतर शाहजहाने नंतर दिल्लीचा दौरा केला आणि यमुनाच्या तीरावर शाहजहानाबादचा पाया ठेवला. हे दिल्लीचे सातवे शहर आहे.

त्यानेच १६३८ साली लाल किल्ला बनवला. ४६ लाख रुपयांत आपलं तख्त-ए-ताउत बनविल. जमा मशीद बनविली. चांदणी चौक वसवलं. मीना बाजार बनवला.

 

त्यानंतर भारतात इंग्रज आपले पाय पसरायला लागले. या दरम्यान मुगल शासक कमी होत गेले. १८०३  साली दिल्ली इंग्रजांच्या अधिपत्याखाली आली. १९११ मध्ये दिल्लीचे परत नाव बदलण्यात आले आणि दिल्ली आता नई दिल्ली म्हणून नावारूपास आली.

आता वेळ आली होती दिल्लीला इंग्रज साम्राज्याची राजधानी बनविण्याच. त्यासाठी बुराडी येथे दिल्ली दरबार भरविल्या गेला. देशातील राजांना आमंत्रण देण्यात आलं. हजारो लोकांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. दिल्लीला सजविण्यात आले.

जॉर्ज पंचम आणि व्कीन मेरी यांची सावरी चांदणी चौक येथून होत, दिल्ली दरबार पर्यंत पोहोचली. येथे येऊन जॉर्ज पंचम यांनी दिल्ली ला राजधानी म्हणून घोषित केले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

तर असा होता आपल्या दिल्लीचा प्रवास, जी सात वेळा उध्वस्त झाली आणि परत त्याचं जोमाने उभी राहिली.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?