‘बीबीसी’ फेक न्यूजचा इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

बातमी विश्वसनीय सूत्रांकडून समजते की….असं सांगणारे वृत्त निवेदक आठवतात? त्यावर पुलंनी केलेली कोटी आठवते का? जसं एखादी बातमी देताना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असं सांगतात तशी बायकोने दिलेली बातमी मंगळसूत्राकडून मिळाली असं म्हणावं का?

InMarathi Android App

असल्या गप्पा या गाॅसिप म्हणून कुचेष्टेचा विषय असतो. बऱ्याचदा एक हात लाकूड आणि दहा हात ढलपी असा मामला होतो.

कधी कधी तर वडाची साल पिंपळाला जोडून काही भलतेच विनोदी अनर्थसुद्धा या गाॅसिपवाल्या बातम्यांनी घडवले आहेत. अगदी भारतात सुध्दा पेव फुटलेले या वृत्तवाहिन्यांचे वार्तांकन कधीकधी चुकीचे होते.

टीआरपी वाढवण्यासाठी भलत्या सलत्या बातम्या, लोकांची वक्तव्यं प्रसिद्ध करताना अर्धवट टाकून, कधीकधी अर्धवट माहितीवर आधारित प्रतिक्रिया देऊन या वृत्तवाहिन्या वादात सापडलेल्या आपण पाहिल्या आहेत.

 

z news inmarathi
trendrr.net

खूपदा बातम्या टेलरमेड दिल्याचे आरोपही काही वाहिन्यांवर झाले आहेत.

व‌त्तवाहिनीच्या प्रतिनिधींना लोकांचा रोषही सहन करावा लागला आहे. संतापलेल्या लोकांनी चुकीच्या वृत्तांकनासाठी फेसबुकवरुन पानं रंगवून राग व्यक्त केलेले किस्सेही आपण ऐकले असतील.

पण तुम्हाला माहिती आहे का जगातील अत्यंत विश्वसनीय समजल्या जाणाऱ्या बीबीसीने सुद्धा असे वडाची साल पिंपळाला सारखे अनर्थ घडवले आहेत. चुकीच्या बातम्या, चुकीचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. विश्वास बसतोय? नाही? चला…वाचाच हे.

हे वाचून तुम्हाला याला उपहासाचा वास येईल पण, बीबीसीने खरोखरच अशा चुका केल्या आहेत ज्या मुर्खपणाच्याच वाटतील आणि त्यामुळं बीबीसीची विश्वासार्हता प्रश्नांकित झाली आहे.

यात पहिली घटना आहे.. लंडनमधील बीबीसीने काश्मीरच्या चरार-ए-शरीफच्या बातमीमध्ये चेचेन्या आणि काश्मीरमधील फोटो एकत्र केले आणि चुकीचं फुटेज कित्येक वेळ बऱ्याच नेटवर्कवर फिरवलं गेलं होतं. केवळ ही एकच बातमी अशी नव्हती.

 

bbc inmarathi
opindia.com

अशा चुकांची मालिकाच बीबीसीकडून झाली आहे. चरारे शरीफ सारखीच बीबीसीने इटलीमध्येही औषधांबाबत खोटी छायाचित्रे पसरवली होती आणि हे उघडकीला आल्यावर बीबीसीने झालेली चूक ही अक्षम्य आहे आणि त्यासाठी पुन्हा असं घडू नये म्हणून नियम अतिशय कडक करुन त्यांचे कठोरपणे पालन केलं जाईल असं त्यांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र त्याचा भयंकर परिणाम बीबीसीच्या विश्वासार्हतेवर झाला.

त्याबाबत बीबीसीचे अधिकारी बॅरी लँग्रीज यांनी चेचेन्या आणि काश्मीरमधील फोटो यांचं मिक्सिंग झाल्याची घटना फेटाळून लावली.

ती तांत्रिक चूक आहे पण बीबीसीच्या लंडनमध्ये असलेल्या सूत्रांनी सांगितले की अशा बारीकसारीक चुका या वारंवार होतात. जसे- ताजमहाल वाराणसीच्या शेवटच्या टोकाला आहे. नेपाळचे पंतप्रधान मनमोहन अधिकारी हे मनमोहनसिंग झाले.

इतकेच नव्हे तर चरार-ए-शरीफ आणि अमृतसरच्या सुवर्णमंदिरात दाखवलेला समांतर भाग या बातमीबाबत बीबीसीचे प्रमुख डेव्हीड लियोन दुरुस्ती करु शकले नाहीत. याही पुढे जाऊन काश्मीर मधील बातमी कव्हर करताना दिल्लीतील दारुगोळा दाखवला.

त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत बीबीसीचा समाचार घेतला की, बीबीसीचा लंडनमधील कर्मचारी वर्ग पाकिस्तानी प्रेमी आहे. त्यांच्या तिरकस शेरेबाजी मुळं सरकारी प्रवक्त्यानं केलेल्या नाराजीनंतरही बीबीसीच्या दिल्लीतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला नाही.

तीच गोष्ट काश्मीर बाबत. तिथं बीबीसीवर श्रीनगर येथील शासकीय कर्मचाऱ्यांने हा आरोप केला होता की, बीबीसीनं तिथं नेमलेल्या युसूफ जमीलची सारी वक्तव्ये ही अतिरेक्यांच्या बाजूनेच असतात आणि त्यात मुख्यतः काश्मीरमधील वाईट नी चुकीची बाजूच जगासमोर आणली जाते.

 

bbc inmarathi
newssting.in

पण बीबीसीच्या प्रमुखांनी हा आरोप फेटाळून लावला होता आणि सांगितले की, जमील निर्दोष आहे. भारतीय अधिकारी हे एकत्र भेटत नाहीत किंवा बहुतांश प्रश्नांना त्यांचं उत्तर माहीत नाही असं असतं. याउलट पाकिस्तानी अधिकारी आहेत.

श्रीनगरमधील शासकीय कर्मचाऱ्याने बीबीसीच्या विधानांना गांभीर्याने का घेत नाही भारत सरकार? असंही विचारलं होतं. जेंव्हा जेंव्हा असं काही घडायचं तेंव्हा बीबीसीच्या नेटवर्कला काहीतरी अडचण यायची.

चरारे शरीफ बाबत सुध्दा बीबीसीने दिलेली बातमी होती भारतीय सेना दलानं हे देवस्थान वादळी वृत्तीनं काबिज केलं. बीबीसी रेडीओनं नंतर ही चूक दुरुस्त केली. पण बीबीसीच्या टीव्ही वृत्तवाहिन्या मात्र वादळा सारखी भारतीय सेना हेच घोडं दामटत होत्या.

बीबीसीच्या प्रसारणात मुख्य अडचण अशी होती की, बीबीसीच्या लंडनस्थित कार्यालयातील परदेशी कर्मचारी हे रेडिओ कर्मचाऱ्यांसारखे दक्ष नव्हते. ना त्यांचा दृष्टिकोन व्यावसायिक होता.

 

bbc inmarathi
telegraph.co.uk

एसेक्स ते ससेक्स परगणा एवढंच त्यांचं जग असावं आणि अनुभवी जाणते लोकही त्यांना मार्गदर्शन करताना आढळत नव्हते. त्याचबरोबरीने पैशाचा तुटवडा हेही अजून एक कारण होतं. जाणकारांच्या मते बीबीसी वर्ल्ड वाईड टेलिव्हिजन फार कठीण काळातून जात आहे.

रेडीओ वाहिनीच्या तज्ज्ञांनी थोडासा वेळ देऊन हे केलं तर शक्य आहे. पण जर अशीच परिस्थिती राहिली तर बीबीसीवर फार कठीण काळ येईल.

या बातम्यांच्या प्रसारणांमुळे बीबीसीची विश्वासार्हता प्रश्नांकित तर झाली आहेच पण यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर ती धोक्यात येऊन नष्टही होईल.

या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीबीसीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे हे मात्र यातून अधोरेखित होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *