बाहुबलीमध्ये दाखवलेले ‘महिष्मती साम्राज्य’ खरंच प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होते?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बाहुबली हा चित्रपट आपल्या सर्वांनाच माहित आहे. या चित्रपटाची सगळ्याच प्रेक्षकांकडून प्रशंसा झाली. बाहुबली या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी भारतात आणि इतर देशांमध्ये देखील चांगला व्यवसाय केला. बाहुबलीमध्ये दाखवण्यात आलेल्या महिष्मती राज्याची भव्यता डोळे दिपवून टाकणारी होती. त्या राज्याची प्रत्येक गोष्ट एका वेगळ्याच जगतामध्ये आपण आल्याचे भासवत होती. पण तुम्हाला हे माहित आहे का – की हे राज्य खरोखर प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होते. पण ते चित्रपटात दाखविल्याप्रमाणे दक्षिण भारतात नव्हते…!

चला मग या राज्यबद्दल आणि बाहुबलीच्या महिष्मतीबद्दल आणखीन काही गोष्टी जाणून घेऊया.

बाहुबलीची, त्याच्या आकर्षक सेटसाठी खूप चर्चा झाली होती.

 

real Mahishmati.marathipizza
www.thebetterindia.com

बाहुबलीमध्ये दाखवण्यात आलेला महिष्मती राज्याचा सेट हा काही काल्पनिक नाही आहे. विविध नोंदींमध्ये हे दिसून येते की, हे त्या काळातील शहर राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र असल्याचे आढळले आहे. हे शहर अवंती राज्याची राजधानी होती. अवंती हे प्राचीन भारताचे जनपद होते.

महिष्मती म्हणजेच आताचे महेश्वर मध्यप्रदेशमध्ये नर्मदा नदीच्या काठी वसलेले आहे.

 

real Mahishmati1.marathipizza
www.weekendthrill.com

महेश्वर हे खरगोन जिल्ह्यामध्ये आहे, जे महेश्वरी साड्या, घाट, मंदिरे आणि किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. महिश्मन राजाने महेश्वरची स्थापना केली होती.

इतिहासानुसार अवंती हा प्रदेश दोन राज्यांचे केंद्र होते.

 

real Mahishmati2.marathipizza
1.bp.blogspot.com

एक म्हणजे उत्तरेकडील उज्जेनी आणि दुसरे म्हणजे दक्षिणेकडील महिष्मती. तिथे अजून एक दावा केला आहे की, हेहैया राज्यकर्त्यांची ती राजधानी देखील आहे.

खालील पुस्तकामध्ये महाभारताच्या अनुशासन पर्वाचे वर्णन दिलेले आहे.

 

real Mahishmati3.marathipizza
www.vedicbooks.net

महाभारताचे अनुशासन पर्व “हजार सशस्त्र कार्तवीय (अर्जुन) हेहैया, ज्याने महिष्मतीमधून संपूर्ण पृथ्वीवर राज्य केले त्याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे.” अजून एक साहित्यिक हरीवंश यांनी उल्लेख केला आहे की, महिष्मतीची स्थापना राजा महिष्मत याने केली होती.

पुस्तकाचे लेखक पी.के.भट्टाचार्य यांनी इतर संबंधांचा उल्लेख केला आहे.

 

real Mahishmati4.marathipizza
d1u4oo4rb13yy8.cloudfront.net

त्यांनी लिहिले आहे की,

महिष्मती प्रदेशाला अनुपा नावाने सुद्धा ओळखले जात असे. रघुवमसामध्ये असे स्पष्ट सांगितले आहे की, प्राचीन काळातील रेवा नदीवर वसलेले महिष्मती हे अनुपा राज्याची राजधानी होती.

महिष्मती शहराचे इतर ठिकाणी असलेल  वर्णन दर्शवते की, ते नर्मदा नदीवर नसून तिच्या मध्यभागी होते.

महाभारतामध्ये महिष्मतीचा संदर्भासह उल्लेख आढळतो.

 

real Mahishmati5.marathipizza
upload.wikimedia.org

काही संदर्भानुसार, नील राजा महिष्मतीचा शासक होता. अग्नीदेव नील राजाच्या मुलीच्या प्रेमात होते, म्हणून तिला आकर्षित करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणाचे रूप धारण केले. पण हे नील राजाला आवडले नाही, त्याने त्या ब्राह्मणाला शिक्षा करण्याचे ठरवले. पण जेव्हा अग्निदेवाने आपले खरे रूप दाखवले, तेव्हा नील राजाने त्यांना शिक्षा देण्यास नकार दिला आणि उलट अग्निदेवाला आपल्या राज्याचे रक्षणकर्ता होण्यास सांगितले.

नंतर जेव्हा युधिष्ठीर महिष्मतीचे राज्य जिंकण्यासाठी आला,तेव्हा त्याचा धाकटा भाऊ सहदेव याने अग्निदेव यांच्याकडे यशासाठी प्रार्थना केली. तसेच रावणाने सुद्धा महिष्मतीवर आक्रमण केल्याचा संदर्भ आहे.

राजा सहस्त्रबाहू याचा उल्लेख देखील महिष्मतीच्या संदर्भामध्ये येतो. तो खूप शक्तिशाली होता.

 

real Mahishmati6.marathipizza
2.bp.blogspot.com

त्याने आपल्या १००० बाहूंनी रावणाला पकडले होते आणि नर्मदा नदीचा प्रवाह थांबवला होता. त्यानंतरच्या काळामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वर ही त्यांची राजधानी म्हणून घोषित केली.

मांधता हे सुद्धा महिष्मती मधील संभाव्य स्थळ मानले जाते.

 

real Mahishmati7.marathipizza
www.thebetterindia.com

इतिहासकारांनी सुचवले आहे की, आताचा महेश्वर, मांडला आणि अगदी म्हैसूर सुद्धा यापूर्वीच्या महिष्मती मधील एक भाग होते. पण बौद्ध ग्रंथानुसार महिष्मती अवंतीचा एक भाग आहे.

११ व्या ते १२ व्या शतकाच्या दरम्यानचे दक्षिण भारतातील राज्यकर्ते महिष्मती हे आपले मूळ स्थान असल्याचे मानतात. १३ व्या शतकाच्या शिलालेखांमध्ये असेही काही उल्लेख आढळले आहेत की पूर्वीचे काही राज्यकर्ते त्या काळातील महिष्मतीमध्ये वास्तव्यास होते.

बाहुबलीमधील महिष्मतीची भव्य रचना आपल्याला आश्चर्यामध्ये टाकते.

 

real Mahishmati8.marathipizza
tollycinema.in

तर असा आहे हा महिष्मती राज्याचा समृद्ध पण गोंधळात टाकणारा इतिहास!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?