पाकिस्तानातील एकमेव हिंदू राजघराणे : आजही अगदी थाटात जगणारे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

पाकिस्तान म्हटलं की आठवते फाळणी…आणि फाळणीत झालेली मनुष्यहानी…

 

partition india inmarathi
फाळणीचं क्षणचित्र

मात्र फाळणीच्या वेळेस तेथे काही हिंदू धर्मीय देखील स्थलांतरित झाले होते आणि ही गोष्ट तुम्हाला देखील माहीतच आहे. आज हेच हिंदू धर्मीय तेथे अल्पसंख्यांक म्हणून जीवन कंठत आहेत. पण त्यांची स्थिती म्हणावी तितकी चांगली नाही.

आधीच भारत पाकिस्तानमधील तणाव आणि सोबतच एकमेकांच्या धर्माबद्दल असणारा द्वेष यांमुळे याठिकाणी रोज हिंदुंवर अत्याचाराच्या विविध घटना समोर येत असतात.

त्यामुळे याठिकाणी अल्पसंख्याक असलेल्या हिंदु समुदायाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. पण या गोष्टी काही संपूर्ण पाकिस्तानभर घडत नाहीत.

पाकिस्तानातल्या काहीच ठिकाणी हिंदू आणि मुस्लीम धर्मियांमध्ये तेढ दिसून येते. तर दुसरीकडे असे बरेचसे प्रांत आहेत जेथे हिंदू आणि मुस्लीम धर्मीय लोक एकोप्याने राहत असल्याचे आढळते. त्यापैकीच एक प्रांत म्हणजे अमरकोट आणि येथे नांदते आहे पाकिस्तानातील एकमेव हिंदू राजघराणे!

हे एक राजपूत शाही कुटुंब असून त्यांची पाकिस्तानात चर्चा होत असते. पाकिस्तानचे राजकारण आणि एकूणच पाकिस्तानचा विकास यात या शाही कुटुंबाची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

 

hamir-singh-marathipizza01
cdninstagram.com

पाकिस्तानच्या या रॉयल फॅमिलीचे प्रमुख आहेत हमीर सिंग. हमीर सिंग हे पाकिस्तानच्या अमरकोट राजपरिवारातील आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव चंदपाल सिंग आहेत. ते पाकिस्तानात ७ वेळा खासदार राहिलेले असून पाकिस्तानचे माजी केंद्रीय मंत्रीही आहेत.

 

hamir-singh-marathipizza02
indianrajputs.com

चंदपाल सिंग पाकिस्तान पिपल्स पार्टीमध्ये होते. पण मतभेदांमुळे ते या पक्षातून बाहेर पडले आणि त्यांचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यांच्या या पक्षाचे नाव ‘पाकिस्तान हिंदू पार्टी’ असे ठेवण्यात आले. हमीर सिंग यांचे वडील चंदपाल सिंग हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झुल्फीकार अली भुट्टो यांचे निकटवर्तीय आणि मित्र होते. येथील राजकारणामध्ये सध्या हमीर सिंग यांचे चांगले वजन आहे.

 

hamir-singh-marathipizza03
4.bp.blogspot.com

पाकिस्तानातील या रॉयल फॅमिलीतील सदस्यांना शिकारीची आवड आहे. एके-47 बाळगणारे सुरक्षारक्षक सदैव या रॉयल फॅमिलिचे संरक्षण करतात.

पाकिस्तानच्या मुस्लीमांच्या मते हमीर सिंग आणि त्यांचे कुटुंबीय हे राजा पुरू (पारस) यांचे वंशज आहेत. त्यामुळे मुस्लीम पाक कुटुंबे आजही कायम हमीर सिंग यांच्या संरक्षणासाठी उभी असतात. राणा हमीर सिंह यांचा मुलगा कर्णी सिंग सोधा आणि जयपूरची पद्मिणी राठोर यांचा विवाह झाला आहे.

 

hamir-singh-marathipizza04
intoday.in

अशी आहे ही पाकिस्तानातील हिंदू राजघराण्याची शान!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?