तुमच्या फोनमध्ये लपलेले फीचर्स जाणून घ्या, आणि स्मार्टफोनला स्मार्टली वापरा
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
आज आपले जीवन स्मार्टफोन्स शिवाय अपूर्ण आहे. ज्याच्यासमोर कुठलाही कम्प्युटर कमी वाटतो. पण आपण आपला स्मार्टफोन खरच पूर्णपणे वापरतो का? त्यात किती फीचर्स आहेत हे आपल्याला माहित आहेत का?
आणि माहित असेल तरी आपल्या स्मार्टफोन्समध्ये काही असे लपलेले फीचर्स देखील असतात जे आपल्याला कदाचित अजूनही माहित नसेल.
आज आम्ही तुम्हाला असेच काही लपलेले किंवा तुम्ही कदाचित माहित नसलेले स्मार्टफोन फीचर्स आणि काही अश्या ट्रिक्स ज्यामुळे तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने तुमच्या स्मार्टफोनचा स्मार्ट वापर करू शकाल.
तुम्ही आपल्या स्मार्टफोनला “स्पाय डिवाईस” मध्ये रुपांतरीत करू शकता!

एक छोटीशी सेटिंग करून आपण आपल्या स्मार्टफोन ला एक “स्पाय टूल” बनवू शकतो, तसेच मुलांवर नजर ठेवणाऱ्या डिवाईसमध्ये बदलू शकता. ही ट्रिक खूप सोप्पी आहे.
त्यासाठी तुम्ही तुमचा फोन वरील ‘Auto Answer Incoming calls’ चे ऑप्शन अनेबल करून अश्या जागी ठेवा जिथून तुम्ही इतरांचे बोलणे ऐकू शकाल.
त्यानंतर रिमोट एरियामध्ये जाऊन त्या फोनवर कॉल करा. त्यानंतर तुमचा डिवाईस ऑटोमॅटिकली कॉल रिसीव्ह करणार आणि तुम्ही जिथे फोन ठेवलाय तिथून तुम्ही त्या सर्व गोष्टी ऐकू शकाल.
चोरी झालेल्या स्मार्टफोनला नेहेमी करिता लॉक कसे कराल

जर तुमचा स्मार्टफोन चोरी झाला असेलं आणि तो परत मिळणार नसल्याची कुठलीही अपेक्षा उरलेली नसेल. तर तुम्ही घरी बसल्या तुमच्या फोनला लॉक करू शकता.
म्हणजे तुमचा मोबाईल ज्याने कोणी चोरला असेलं, तो त्याच्या काहीही कामाचा उरणार नाही कारण तो कामच करणार नाही.
ह्यासाठी तुमच्या मोबाईल कंपनीमध्ये कॉल करा, आणि त्यांना आपला १५ डीजीटचा IMEI नंबर सांगा आणि आपला फोन लॉक करून घ्या. ह्यानंतर तुमच्या फोनचे सर्व फीचर्स लॉक होऊन जातील.
फोनला तुम्ही “मायक्रोस्कोप” बनवू शकता

जर तुम्हाला तुमचा फोन मायक्रोस्कोप मध्ये बदलायचा असेलं, तर तुम्हाला कुठल्याही महाग डिवाईस विकत घेण्याची गरज नाही. कुठल्याही लहान आणि स्वस्त लेन्सचा वापर करून देखील तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला मायक्रोस्कोप बनवू शकता. आणि कुठल्याही वस्तूची अगदी “मॅग्नीफाईड फोटोज” घेऊ शकता.
नॉन वॉटरप्रूफ स्मार्टफोनने देखील “अंडर वॉटर फोटोज” घेऊ शकता

जर तुमचा फोन हा वॉटरप्रूफ नाही आहे तरी देखील तुम्ही तुमच्या फोनने पाण्याच्या खाली देखील फोटो घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या फोनसाठी एक पॉलीथीन केस बनवावी लागेल. ते बनविल्या नंतर तुम्ही निश्चिंत होऊन पाण्याच्या आत देखील फोटोज घेऊ शकता.
स्मार्टफोनमध्ये फेस लॉक कसं लावणार?

स्मार्टफोनमध्ये फोनला लॉक करण्याच्या अनेक पद्धती असतात. ज्यामधील सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे “फिंगरप्रिंट लॉक”, पण काही स्मार्टफोन्समध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरचं ऑप्शन नसतं. तरीही जर तुम्हाला तुमच्या फोन ला सुरक्षित ठेवायचं आहे तर तुम्ही ‘फेस लॉक’ चं ऑप्शन वापरू शकता.
हे ऑप्शन तुम्हाला सेटिंग–सिक्योरिटी–स्क्रीन लॉक हा मेन्यू मिळेल. ज्याने तुम्ही फेस लॉक करून आपला फोन सुरक्षित ठेवू शकता.
आपल्या स्मार्टफोनला खराब होण्यापासून वाचवा

फोनच्या चार्गिंग पोर्टमध्ये धूळ आणि माती चे कण जमा होत असतात.
ज्यावर आपण कधीही लक्ष देत नाही. पण हेच आपला स्मार्टफोन खराब होण्याचं सर्वात मोठं कारण असू शकत. ह्यासाठी एक रिकामी सिरींज घ्या आणि त्याने फोनचा चार्गिंग पोर्ट नेहेमी स्वच्छ करत राहा. ह्या ट्रिकमुळे तुमच्या स्मार्टफोनची लाईफ वाढेल.
तर तुम्ही देखील ह्या स्मार्टफोन ट्रिक्स वापर आणि आपल्या स्मार्टफोनचा स्मार्टपणे वापर करा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
very nice