' दहशतवादाच्या छायेत ही ‘महत्वाची’ ऐतिहासिक स्थळं नष्ट होत आहेत! – InMarathi

दहशतवादाच्या छायेत ही ‘महत्वाची’ ऐतिहासिक स्थळं नष्ट होत आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

दहशतवाद ही आजच्या घडीची जगाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. केवळ खोट्या विचारसरणीच्या आधारावर हिंसक मार्गाने आपला लढा देणारा हा दहशतवाद एखाद्या क्रूर महाराक्षसापेक्षा कमी नाही.

या महाराक्षासाने आजवर कित्येक लोकांचे जीव घेतले. कित्येक शहरे उध्वस्त केली. हसत्या खेळत्या वातावरणाचे रुपांतर स्मशानात केले.

 

terrorism inmarathi
rand corporation

 

भारताने तर कित्येक वर्षांपासून या दहशतवादाचा सामना केला आहे आणि आजही करतो आहे, तरी काही केल्या हे भ्याड हल्ले कमी व्हायचं नाव घेत नाही!

२६/११ चा मुंबईचा दहशतवादी हल्ला, १९९३ चा बॉम्बस्फोट, संसदेवरचा हल्ला,काश्मीर मध्ये होणारे अत्याचार, मुंबईतल्या लोकल्स मध्ये झालेला सिरियल बॉम्ब ब्लास्ट, मालेगाव मध्ये झालेला हल्ला, आपल्या सैन्यावर झालेला पुलवामा इथला हल्ला, आणि ही यादी कधीच थांबणार नाही!

इतकं काही सोसलं आहे आपल्या देशाने ‘दहशतवाद’ या नावाखाली! पण आपल्या सुद्धा सैन्याने पलटवार करत हे दाखवून दिलं की आता आपण गप्प बसणार नाही!

 

terror attack inmarathi
india tv

 

सिरीया, अफगानिस्तान, येमेन अशी कित्येक नावे घेता येतील, जेथे दहशतवाद्यांनी होत्याचे नव्हते केले. यात केवळ मनुष्याचे बळी पडले असे नाहीत, तर यात प्राण गेला तो त्या ऐतिहासिक वास्तूंचा ज्यांच्याकडे संपूर्ण जग अभिमानाने बघत असे.

आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून प्रत्येक संस्कृतीने त्या वास्तूंचे प्राण ओतून जतन केले होते. पण दहशतवाद्यांच्या हल्ल्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही आणि या वास्तू पुरत्या धुळीला मिळाल्या आहेत.

युनेस्काने जागतिक वारसास्थळांची एक यादी तयार केली आहे. यामध्ये एकूण १,०३१ स्थळांचा समावेश आहे. यापैकी ४८ स्थळे धोक्यात आहेत. ती धोक्यात असण्याची अनेक कारणे आहेत. कुठे नागरी युध्‍द, तर संवर्धनाच्या अभावामुळे ती नष्‍ट होण्‍याची भीती आहे.

आज आम्ही तुम्हाला यापैकी ९  अश्या ऐतिहासिक स्थळांबद्दल माहिती देणार आहोत जी केवळ आणि केवळ मानवी विध्वंसामुळे म्हणजेच दहशतवादामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

 

१. बेथलेहम नेटिविटी चर्च 

 

historical-places-marathipizza01
jerusalemfromamman.com

 

६ व्या शतकामध्ये उभारले गेलेले हे चर्च बेथलेहम, पॅलेस्टाइन येथे स्थित आहे. येथेच प्रभू येशूचा जन्म झाला असे मानण्यात येते, म्हणून या जागेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 

२. बगराती कॅथेड्रल आणि गेलाटी मोनेस्ट्री

 

historical-places-marathipizza02
tripadvisor.com

 

ही वास्तू कुतेसी, जॉर्जिया येथे आजही प्राचीनतेचा वारसा जपून आहे. मोठे चर्च आणि आश्रम सामावून असलेली ही वास्तू ११ व्या शतकात उभारली गेली होती.

 

३. टिम्बकटू

 

historical-places-marathipizza03
orangesmile.com

 

हे एक प्राचीन इस्लामिक सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. माली येथे स्थित असलेली ही वास्तू १३७५ मध्ये बांधली गेली होती इस्लाम धर्मात या वास्तूला वरचे स्थान आहे.

 

४. ओल्ड सिटी ऑफ जेरुसलेम

 

historical-places-marathipizza04
timeout.com

 

हे नाव अनेकांनी ऐकले असेल. जेरुसलेम येथील ही वास्तू ज्यू, ख्रिश्‍चन आणि मुस्लिम यांचे संयुक्त पवित्रस्थळ म्हणून ओळखले जाते. ख्रिस्तपूर्ण १५०० मध्ये हे नगर उभारले गेल्याचे सांगण्यात येते.

 

५. सिटी ऑफ समारा

 

historical-places-marathipizza05
cemml.colostate.edu

 

प्राचीन मुस्लिम इमारतींचा समूह म्हणजे सिटी ऑफ समारा जी इराक मध्ये वसलेली आहे. इसवी सन पूर्व ५ हजार मध्ये निर्माण झालेले हे शहर इतिहासकारांना अतिशय प्रिय आहे.

 

६. मीनार-ए-जामसिटी ऑफ पोटोसी 

 

historical-places-marathipizza06
tripadvisor.com

 

पोटोसी, बोलिविया येथे स्थित असलेली मीनार-ए-जामसिटी ऑफ पोटोसी ही वास्तू १६ व्या शतकामध्ये उभारली गेली होती. तेव्हाचे सर्वात मोठे औद्योगिक शहर म्हणून येथील परिसर नावारूपाला होते. येथील ६५ मीटर उंच मिनार पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात.

 

७. अबू मीना

historical-places-marathipizza07
http://lampsedinburgh.blogspot.in

 

अलेक्झेंड्रिया, इजिप्त येथे वसलेले हे शहर इसाईंचे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे. ख्रिस्तपूर्व २६९ मध्ये हे शहर वसवण्यात आले होते.

 

८. ओल्ड सिटी ऑफ सना

 

historical-places-marathipizza08
wordsinthebucket.com

 

येमेन मधील हे शहर इसवी सन पूर्व ५०० मध्ये वसवले गेले होते. ११ व्या शतकात हे शहर अतिशय नावारूपाला आले होते.

 

९. प्राचीन शहर अलेप्पो

 

historical-places-marathipizza09
thesun.co.uk

 

सीरिया मधील हे शहर जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. इसवी सन पूर्व २ मध्ये हे शहर वसवण्यात आल्याचे सांगितले जाते. प्राचीन इमारतींसाठी हे शहर जगभरात प्रसिद्ध होते.

या सर्व वास्तूंच हे फोटोमध्ये दिसतंय तसं चित्र बिलकुल नाहीये.

या वस्तूंचा बराचसा भाग हा दहशतवादी हल्ल्यामुळे ढासळून गेलाय, यातील काही शहरे तर पूर्वी अतिशय सुंदर होती, पण आता त्यांच्याकडे बघवतही नाही. या दहशतवादाला वेळीच आवर घातला नाही तर या वास्तूच काय तर संपूर्ण जग उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?