चीनच्या सर्वात गुढ आणि अद्भुत पर्वतावर आहे ‘स्वर्गाचे दार’!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

स्वर्ग म्हणजे मनुष्य प्राण्याने आजवर रंगवलेली सर्वात मोहक कल्पना होय. साक्षात देवांचे निवासस्थान म्हणजे स्वर्ग! या कल्पनेमध्ये सगळी सुखं आहेत. इथे दुःखाचा लवलेशही नाही, मृत्यूनंतर केवळ स्वर्गातच आपले स्वागत व्हावे, ही इच्छा प्रत्येकाच्या मनात फुलवणारी अशी ही रमणीय कल्पना. पण खरोखर स्वर्गासारखं एखादं ठिकाण अस्तित्वात की नाही यावर बराच वाद-विवाद होऊ शकतो. शेवटी तो वेगळा मुद्दा झाला, त्यात न पडलेलंच बरं. असो, याच संकल्पनेशी निगडीत, आज आम्ही तुम्हाला जगातील अश्या एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जेथे स्वर्ग नाही, पण त्याला Heaven’s Gate Mountain ‘ अर्थात स्वर्गाचे दार असणारा पर्वत असे म्हटले जाते. चला जाणून घेऊया या अद्भुत ठिकाणाबद्दल!

Heaven-Gate-Tianmen-Mountain-marathipizza001
placesmustvisit.com

हे ठिकाण मध्ये चीन मध्ये आहे. या पर्वताचे नाव आहे- Tianmen Mountain! चीनमधील सर्वात प्रमुख टुरिस्ट अॅट्रेक्शन म्हणजे हे ठिकाण होय. अहो कारण स्वर्ग राहू द्या, पण स्वर्गाचे दार तरी बघून घेऊया या आशेने दरवर्षी लाखो पर्यटक या जागेला भेट देतात.

Heaven-Gate-Tianmen-Mountain-marathipizza02
youtube.com

हा पर्वत जवळपास ५००० फुट उचं असून त्याच्या सर्वोच्च माथ्यावर एक गुहा आहे. या गुहेलाच ‘स्वर्गाचे दार’ म्हणतात.
असं सांगितलं जातं की फार पूर्वी या पर्वताचा काही भाग कोसळला , ज्यामुळे गुहा निर्माण झाली. ही गुहा १९६ फुट लांब, ४३१ फुट उंच आणि १८७ फुट रुंद आहे.

Heaven-Gate-Tianmen-Mountain-marathipizza03
feel-planet.com

तब्बल ५ हजार मीटर उंचीवर असल्याकारणाने ही गुहा नेहमीच ढगांनी वेढेलेली असते, ज्यामुळे असा भास होतो की जणू की त्या गुहेपलीकडे आणि ढगांच्या पार स्वर्गचं आहे, म्हणूनच या गुहेला ‘स्वर्गाचे दार’ हे नाव पडले.

Heaven-Gate-Tianmen-Mountain-marathipizza04
pinterest.com

येथे पोचण्यासाठी रस्त्यावरून चालत जाता येते किंवा केबल प्रवासाची देखील सोय आहे. जगातील सर्वात लांब आणि उंच या केबलचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे हे विशेष! यासाठी राबलेल्या इंजिनियर लोकांचे देखील कौतुक करावे तेवढे कमी आहे.

Heaven-Gate-Tianmen-Mountain-marathipizza07
techandfacts.com

केबल पर्यटकाला थेट गुहेपर्यंत घेऊन जाते असेही नाही, केबल मधून उतरल्यावर एकूण ९९९ पायऱ्या चढून पर्यटक गुहेपर्यंत पोचू शकतो. बरोब्बर ९९९ पायऱ्या यासाठी की चीनच्या ताओ फिलोसॉफीनुसार ९९९ ही संख्या पवित्र आहे तसेच राजघराण्याचे प्रतिक आहे.

Heaven-Gate-Tianmen-Mountain-marathipizza06
uk.pinterest.com

पूर्वी येथे एक धबधबा देखील होता. हा धबधबा यासाठी विशेष होता कारण तो केवळ १५ मिनिटांसाठीच दिसायचा, म्हणजे १५ मिनिटांनंतर धबधबा अदृश्य व्हायचा. धबधब्याचे पाणी तब्बल १५०० मीटर उंचीवरून कोसळायाचे. असा जलप्रपात सगळीकडेच पाहायला मिळतो असे नाही.

Heaven-Gate-Tianmen-Mountain-marathipizza08
techandfacts.com

चीनमध्ये हा पर्वत अतिशय रहस्यमयी पर्वत म्हणून देखील ओळखला जातो. या पर्वतावर अनेक खजिने असल्याचे ऐकायला मिळते. आजवर अनेकांनी हे खजिने शोधण्यासाठी जीवाची बाजी लावली, परंतु अजूनही यश मात्र कोणाच्याच हाती लागले नाही.

Heaven-Gate-Tianmen-Mountain-marathipizza09
great-panorama.blogspot.in

काय मग? जाणार का स्वर्गाचे दार पाहायला???

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?