रक्तदानाचे असे फायदे जे पाहून तुम्हाला नियमित रक्तदान करावेसे वाटेल !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

रक्तदान श्रेष्ठदान असे म्हटल जाते. कारण तुमच्या रक्तदानाने कुठल्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकते. अनेक जण विचार करतात की आम्ही रक्तदान का करावे, त्याने आम्हाला काय फायदा होणार? जे बरोबर देखील आहे. आजच्या ह्या स्वार्थी जगात का म्हणून आपलं रक्त कोणाला असं फ्री मध्ये वाटत फिरायचं, त्याचा आपल्याला पण काही फायदा नको का व्हायला?

म्हणूनच आज माही आपल्याला रक्तदानाचे काही असे फायदे सांगणार आहोत जे ऐकल्यावर तुम्ही स्वतःहून नियमितपणे रक्तदान कराल.

 

blood donation benefits-inmarathi04
healththoroughfare.com

रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो :

 

heart-attack-inmarathi
hindustantimes.com

रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह सुधारतो. ह्यामुळे ब्लड वेसल्सच्या लायनिंग डॅमेज होत नाहीत. त्यामुळे शरीरातील आर्टरी ब्लॉकेज कमी होतो. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका ८८ टक्क्यांनी कमी होऊन जातो. Loyola University Health System Blood Bank चे संचालक Phillip De Christopher ह्यांनी सांगितले की, इतर लोकांच्या तुलनेत नियमित रक्तदान करणारे लोक खूप कमी प्रमाणात दवाखान्यात भर्ती होत असतात. राक्तदात्याला हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता फार कमी असते.

शरीरातील कॅलरीज कमी होतात :

 

blood donation benefits-inmarathi06
flitto.com

जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर ते तुम्ही रक्तदान करून देखील करू शकता. रक्तदान हे फिट राहण्यासाठी एक योग्य आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एका वेळी रक्तदान केल्याने शरीरातील ६५० कॅलरीज कमी होतात, त्यामुळे जर तुम्ही दर तीन महिन्याला रक्तदान केले तर तुमच्या किती कॅलरीज कमी होतील, नाही का?

फ्री चेक-अप :

 

blood donation benefits-inmarathi01
indiatvnews.com

रक्तदानाआधी तुमचे चेक-अप केल्या जाते. ज्यामध्ये तुमच्या शरीराचे तापमान, पल्स रेत, ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन इत्यादीची तपासणी केली जाते. त्यानंतर रक्त टेस्ट साठी पाठवले जाते, ज्यामध्ये तुमच्या रक्तावर १३ वेगेवेगळे टेस्ट केले जातात. त्यामुळे जर तुम्हाला कुठला आजार झाला असेल, किंवा तुमच्या शरीरात कशाची कमी असेल तर ते तुम्हाला लगेचच कळत ई तेही फ्री.

शरीरात Iron चे योग्य प्रमाण नियमित राखले जाते :

 

blood donation benefits-inmarathi02
flitto.com

आपल्या शरीरात ५ ग्राम एवढे Iron असते. Iron जास्तकरून रेड ब्लड सेल्स आणि बोन मॅरोमध्ये असते. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा १/४ एवढे Iron निघून जाते. पण ह्या Iron ची कमतरता एका आठवड्यात तुमच्या जेवणातून भरून निघते. त्यामुळे शरीरातील Iron चे संतुलन बनून राहते. तसेही शरीरात जास्त Iron ब्लड वेसल्स साठी हानिकारक असते.

एका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. मग आता जर आपले रक्त दान केल्याने इतरांना तसेच आपल्यालाही फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?