निरोगी आहाराची गुरुकिल्ली : शिंगाडा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ऊपवासाला वापरले जाणारी भारतातील आणखी एक वनस्पती म्हणजे “शिंगाडा”. ईंग्रजीत याला “water chestnut” असे नाव आहे.

 

Shingada-inmrathi04
blogspot.in

पोषणमुल्ये :

Carbs-23.9mg
Suger-4.8mg
Fiber-3mg
Fat-0.1mg
Protein-1.4mg

Vitamins in percentage – B1-12%, B2-17%, B3 7%, B5-10%, B6-25%, B9-4%, Vitc-5%, Vit E-8%

Minerals- Magnessium-6%, Magnese-16%, Phospherous-9%, Potassium-5%

 

Shingada-inmrathi
dnaindia.com
 • भरपुर पोषणमुल्ये,कमी calories आणि low fat असणारा शिंगाडा म्हणजे निरोगी आहाराची गुरुकिल्लीच.
 • जीवनसत्व भरपुर असल्याने detoxificationमध्ये मदत करते. त्यामुळे काविळ झाल्यास सिंगाडा खावा.
 • सिंगाड्यातील mineralsही thyroid glandsच्या कार्याचे नियमन करतात. त्यामुळे thyroidism(hypo/hyper)च्या रूग्णांनी तो अवश्य खावा.

 

Shingada-inmrathi02
thehealthsite.com
 • Antioxidents भरपुर असल्याने सिंगाड्यात antiviralव antibacterial properties असतात.
 • तसेच यातील काही antioxidents जठर(stomach)व प्लिहा(spleen)यांची कार्यक्षमता वाढवतात.
 • तसेच antioxidentsमुळे त्वचा व केस यांचे आरोग्य राखल्या जाते.
 • वजन वाढवण्यास मदत करतो.
 • यातील potassiumच्या योग्य मात्रेने मांसपेशी(muscles)व मज्जासंस्थे ची कार्यक्षमता वाढते.
 • energyचा ऊत्तम स्त्रोत असल्याने अतिकष्टाची कामे, व्यायाम, खेळ करणाऱ्या व्यक्तीसाठी ऊत्तमआहार आहे.

 

Shingada-inmrathi03
bestindiancooking.com


आता आयुर्वेदीय दृष्टीकोन पाहुया –

आयुर्वेदात शिंगाडा याला अत्यंत महत्वाचे मानल्या जात असुन याला “शृंगाटक” असे संस्कृत नाव आहे. पित्तदोषाचे शमन व पौरूष शक्तीचे वर्धन ही त्याची महत्वाची कार्ये सांगितली आहेत.

 • मुत्राल्पता(dysuria),अतिमुत्रता(polyuria) अशा व्याधीत ऊपयुक्त आहे.
 • शोथ(सुज)(inflamation) कमी करण्यास मदत करते. रक्तस्त्रावजन्य व्याधी(bleeding disorders) मध्ये ऊपयुक्त ठरते.
 • पित्तशामक व ऊष्णतेचे शमन करणारे असल्याने डोळ्याची जळजळ,तळव्यांची आग होणे,अशी लक्षणे दिसल्यास सिंगाड्याचे सेवन करावे.
 • तसेच ऊन्हाळ्यातही सिंगाडा अवश्य खावा.

  Shingada-inmrathi01
  blogspot.in
 • यातील vitaminsवminerals चे प्रमाण पाहता गर्भिणीनी सिंगाडा अवश्य खावा.
 • आयुर्वेदाने (threatened abortion)गर्भपात वारंवार होत असेल तर शिंगाडा ऊपयुक्त सांगितला आहे
 • दाह कमी करण्याचे कार्य सिंगाडा करतो
 • ग्राही हा गुण सांगितला असुन त्यामळे indigestion,irritable bowel syndrome मध्ये ऊपयुक्त ठरतो .

बर्याच आयुर्वेदीक कल्पांमध्ये सिंगाडा समाविष्ठ असतो. ऊदा. अमृतप्राश घृत, सौभाग्यशुन्ठी

तर असा हा शिंगाडा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे, त्यामुळे याचा आपल्या आहारात नक्की समावेश करावा..

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?