प्राचीन आयुर्वेदात सांगितलेलं “या” मसाल्याच्या पदार्थाचं वैद्यकीय महत्व प्रत्येकाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

केशर म्हटले की, केशरी दुध व केशरी पेढा आठवल्याशिवाय राहत नाही. मात्र ह्या केशराचे औषधी उपयोग आपल्याला क्वचितच माहित असावेत.

केशराचा उगम हा तसा ‘ग्रीस’ देशातील आहे. तर भारताच्या ‘काश्मीर’मध्ये याचे पीक घेतले जाते. केशर म्हणजे फुलांच्या आतिल परागकण असतात.

हा सर्वात महाग मसाल्याचा पदार्थ आहे.

 

Saffron-inmarathi
shiveshpratap.com

 “केशर” पोषणमुल्ये :

खरा केशर खायचा सोडा व पाणी यांच्या मिश्रणात केशराच्या काड्या टाकल्यास त्यांचा रंग पिवळा होतो. केशर नसल्यास हा रंग तपकिरी होतो.

आता केशराचे औषधीय उपयोग पाहुया :

  • केशरात Carotenoid नावाचे द्रव्य असते, ज्यात Anti-cancer properties असतात. यातील Crocetin हा घटक Cerebral Oxygenation वाढवतो.
  • Urethritis, gout या व्याधीत ऊपयुक्त ठरतो.
  • मात्र liver, kidney, bone marrow Disorder मध्ये वापरू नये.
  • Vision loss (अंधत्व), Retinal degeneration यात उपयुक्त ठरते.
  • Insomnia (निद्रानाश) मध्ये केशराचे सेवन नियमीत करावे.
  • मेंदुचे आरोग्य अबाधीत ठेवते.

 

brain-inmarathi
newsarchive.heart.org
  • पचनास मदत करते.
  • Burn (भाजणे) च्या जखमा केशर सेवनाने लवकर बऱ्या होतात.
  • मासिक पाळीतील पोटदुखीवर अत्यंत उपयुक्त ठरते. या काळात स्त्रीच्या शरीरातील बदलणाऱ्या Hormones वर नियंत्रण ठेवुन mood swing टाळते. त्यामुळे PMS (pre menstrual Syndrome) मध्ये अवश्य घ्यावे.
  • ह्रदयाचे आरोग्य उत्तम राखते.
  • त्वचेचा रंग ऊजळतो.

आता आयुर्वेदीक दृष्टीकोन पाहुया :

आयुर्वेदाने केशर ही अत्यंत गुणकारी वनस्पती सांगितली आहे.

तारूण्यपिटीका, त्वचारोग, काळे डाग यावर तर केशर उपयुक्त आहेच पण तसेच त्याने रोगप्रतिकारक्षमता देखील वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते.

केशराचे ३ प्रकार सांगितले आहेत.

१. पद्मगंधी

२. मधुगंधी

३. बहलिका गंधी

यातील पद्मगंधी केशर हे श्रेष्ठ मानले जाते.

केशराचे काही ऊपयोग

 

Saffron-inmarathi02
momjunction.com

• दुध किंवा मधासोबत केशर घेतल्यास त्वचेची पोत सुधारते.

• केशरची पेस्ट काळे डाग व मुरूम यावर उपयुक्त ठरते.

• ‘दशमुळ लेह्य’ या कल्पासोबत प्रसतीउत्तर काळात केशर दिल्यास गर्भाशयातील स्त्रियांना बळकटी येते.

• रोज केशरी दुध घेतल्यास स्मृती चांगली राहते.

• केशरची पावडर सुंठ व दशमुळ यांचा काढा करून त्यात मिसळुन सेवन केल्यास संधीवात व ज्वर यात उपयुक्त ठरते.

• याशिवाय, शिरोरोग, कृमी (worm infestation), व्यंग (frakles) यात केशर उपयुक्त ठरते.

 गर्भधारणेत केशरी दुध का प्यावे?

  • गर्भधारणेत केशरी दुध पिल्यास मुल गौरवर्णी होते असा समज आहे. मात्र वर्ण ही पुर्णतः अनुवंशीक बाब आहे. पण मातेला केशराच्या सेवनाने बरेच फायदे होतात.

 

Saffron-inmarathi
momjunction.com

• Mood swing हा pregnancyतील प्रकार टाळला जातो.

• B. p.नियमीत राहतो.

• पचनास मदत करते.

• गर्भारपणात होणारी अरूची (morning sickness) कमी होतो.

• शांत झोप लागते.

• रक्ताल्पता(Anamia) कमी होते.

त्यामुळे आपल्या आहारात ह्या बहुपयोगी केशराचा समावेश नक्की करा.

 –

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “प्राचीन आयुर्वेदात सांगितलेलं “या” मसाल्याच्या पदार्थाचं वैद्यकीय महत्व प्रत्येकाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे

  • August 21, 2018 at 8:33 am
    Permalink

    good article

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?