संगीत ऐकण्याच्या या आरोग्यदायी फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


आजकालच जीवन आणि जीवनशैली ही अतिशय जलद आणि तेवढीच आधुनिक झाली आहे. म्हणूनच ती अनेकांना आवडते देखील, कारण ह्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या सुख-सोयी उपलब्ध झाल्या आहेत.

पण ह्या जीवनशैलीचे जेवढे फायदे आहेत तेवढेच नुकसानही आहेत.

आणि सर्वात घातक नुकसान म्हणजे आजार. अश्यात मग थोडं बरं वाटावं म्हणून लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. त्यातच काही लोक संगीत प्रेमी असतात, ते नेहेमी संगीत एकत असतात.

 

music-stress-reliever-inmarathi
amo.org.au

तुम्हाला माहित नसेल पण संगीत हे एका हिलिंग एजंट प्रमाणे काम करतं. कुठलही संगीत ऐकल्यावर आपल्याला एका वेगळ्याच प्रकारची संतुष्टी मिळते. पण हेच संगीत तुमच्या शरीरासाठी देखील तेवढंच फायद्याचं ठरू शकतं. कसं ते आम्ही सांगतो…

संगीत आपला मूड फ्रेश करते :

 

music-stress-reliever-inmarathi05
gorgeousingrey.com

आपलं आवडतं संगीत ऐकल की आपल्याला छान वाटत. आतून आपण फ्रेश आणि आनंदी असतो. हे तणाव कमी करण्यासाठी देखील खूप फायद्याचं ठरते. पण मूड फ्रेश करण्यासाठी त्याप्रकारच संगीत ऐकणे गरजेचं असते.


अमेरिकेच्या कंसास मेडिकल सेंटरने एका संशोधना दरम्यान असे समोर आले की, संगीतामुळे मन आणि मेंदू ह्यावर खूप सकारात्मक प्रभाव टाकतो.

ब्लडप्रेशरला नियंत्रित करतो :

 

music-stress-reliever-inmarathi03
soundwhiz.com

अमेरिकन सोसायटी ऑफ हायपरटेन्शननुसार जर हायब्लडप्रेशर असलेली व्यक्ती रोज सकाळ-सायंकाळ संगीत ऐकत असेल तर त्यांच ब्लडप्रेशर सामान्य होऊन जाईल.


हृदयाला स्वस्थ ठेवण्याचं काम करतं :

 

music-stress-reliever-inmarathi01
quora.com

गोड संगीत हे हृदयाचा ठोके सामान्य करण्याचं काम करतात. ह्याने श्वसनासंबंधी असलेले आजार देखील बरे होऊ शकतात. त्यासोबतच अर्थरायटिस, ऑस्टियोपरोसिस सारख्या आजारात जरा मदत होते. संगीत ऐकल्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोन्सची उत्पत्ती होते ज्यामुळे त्रास कमी होण्यास मदत होते.

मेंदूसाठी फायद्याचं आहे :

 

music-stress-reliever-inmarathi02
youtube.com

संगीत हे सर्वात जास्त मेंदूसाठी फायदेशीर असते. संशोधन सांगते की, स्ट्रोक आल्यावर क्लासिकल संगीत ऐकल्यावर लोक लवकर रिकव्हर होतात. ह्यामुळे मेंदू अधिक गतीने चालायला लागतो आणि स्थिती सुधारायला लागते. ह्यामुळे मायग्रेनच्या त्रासात देखील फायदेशीर ठरू शकते. त्यासोबतच तणावातून मुक्त होण्यासाठी देखील तुम्ही संगीत ऐकू शकता.

त्यामुळे संगीत ऐकत राहा आणि तणावातून, आजारातून मुक्तता मिळवा.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?