त्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : ह्या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही पूर्णपणे फिट राहू शकता

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपण सर्वांनीच कधी ना कधी हे ऐकले असेल की, एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. काही जणांच्या मते हे वजन कमी करण्यास सहाय्यकही ठरते.

कोमट पाणी पिण्याचेही खूप फायदे आहेत, त्यातच मग मध आणि लिंबाचा रस मिसळून पिल्याने ह्या मिश्रणाचा आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. तसेच मध हे किती गुणकारी आहे हे देखील आपल्याला माहित आहे. त्यामुळे मधाचे सेवन केल्याने आपण अनेक आजारांपासून बचावले जाऊ शकतो. आज मधाचे असेच काही गुणकारी फायदे आपण जाणून घेणार आहोत.

 

honey-inmarathi
remediesforme.com

१. पोट साफ होते :


आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला योग्य वेळी खायला जमत नाही, कधी मिटींग्स तर कधी काम ह्यामुळे अवेळी जेवण हे आजच्या लाइफस्टाइलचा भाग झाले आहे. पण अश्या अवेळी आणि अयोग्य जेवणाचे आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतात. त्यामुळे अॅसिडिटी, पोट साफ न होणे, पाचन क्रिया मंदावणे त्यातून मग मुळव्याधीचा त्रास उद्भवणे इत्यादी सर्व होतं.

 

constipation-inmarathi
noihirek.hu

पण जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा शहद आणि लिंबाचा रस मिसळून घेतले तर तुम्ही ह्या व्यांधींपासून दूर राहाल. तुमची पोट साफ न होण्याची समस्या देखील दूर होईल. त्यामुळे लिव्हर चांगले राहील आणि अन्न पचण्यास मदत होईल. तसेच मधामुळे पोटामध्ये होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून आपले संरक्षण होते

२. वजन कमी होते :

 

weight-inmarathi
healthonabudget.com

मध, लिंबू आणि कोमट पाणी दररोज सकाळी घेतल्यास शरीराचे मेटाबॉलिज्म उत्तम होते. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. ज्यामुळे दिवसभर गोड खाण्याची इच्छा होत नाही. डायटिंग प्रभावी करण्यासाठी ह्या मिश्रणाचे सेवन फायदेशीर ठरते. याचे नियमित सेवन आणि व्यायाम केल्याने वजन लवकर कमी केले जाऊ शकते.

३. गर्भावस्थेत मध उपयोगी ठरतो :

 

blood-pressure-in-pregnancy-inmarathi01
pregnancyandbaby.com

गर्भावस्थे दरम्यान जर गर्भवती स्त्रीने मधाचे नियमित सेवन केले, तर तिचे होणारे बाळ हे निरोगी आणि मासिकदृष्ट्या चांगला असतो. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी आवर्जून मधाचे सेवन करावे.

४. तोंडाची दुर्गंधी दूर होते :

लिंबू, मध आणि गरम पाणी तोंडाचा वास दूर करण्यासाठी मदत करते. लिंबूमुळे तोंडातील ग्रंथी सक्रिय होतात आणि बॅक्टीरियाला नष्ट करून तोंडाला शुद्ध करतात. ज्यामुळे तोंडाचा वास येत नाही.

 

mouth-smell-inmarathi
doctorplusblog.wordpress.com

मध आणि गरम पाण्यामुळे शरीरातील उर्जेचा स्तर वाढतो. शरीरात जास्त ऊर्जा तयार झाल्याने चयापचय क्रिया सुधारते.

५. त्वचा सतेज होते :

त्‍वचेला लिंबू खूप फायदेशीर आहे. यातले तत्व रक्ताला शुद्ध करण्यासाठी मदत करतात. नवीन रक्तपेशीच्या निर्मीतीसाठी मदत करतात. तसेच मध हे चेहऱ्याला तरुण ठेवण्यास मदत करते. म्हणून जर तुम्हाला तजेलदार त्वचा हवी असेल तर हे पेय नियमित घ्या.

 

Deepika-Padukone-Diet-inmarathi
indiglamour.com

६. रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

 

Immunity-inmarathi
hehealthsite.com

मध, लिंबू आणि गरम पाणी नियमित पिण्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये एंटीऑक्सिडेंट्स, विटॅमिन्स आणि पोषक तत्व असल्यामुळे बदलत्या मोसमात तुम्ही आजारी पडत नाही.

७. डोळ्यांसाठी गुणकारी :

 

blink-eyes-inmarathi01
ayurmantra.com

मध हे डोळ्यांसाठी देखील खूप फायद्याचे असते. गाजराच्या रसात मध मिसळून ह्या मिश्रणाचे सेवन केल्याने दृष्टी सुधारते. त्यामुळे ज्यांना चष्मा असेलं त्यांनी नियमितपणे ह्या मिश्रणाचे सेवन केल्याने त्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होऊ शकते.

८. उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो :

 

लसून आणि मध ह्यांचे एकत्र सेवन केल्याने उच्च रक्तदाब सामान्य होण्यास मदत होते. त्यामुळे उच्च राक्त्बाद असलेल्यांनी ह्याचे सेवन जरूर करावे.

९. घावांवर देखील मध उपयोगी ठरतो :

 

wound-inmarathi
wikihow.com

जर तुमची त्वचा जळाली असेलं, कापल्या गेली असेलं किंवा सोलली असेलं तर त्यावर देखील मध हे गुणकारी ठरू शकतं. अश्या प्रकारच्या जखमांवर मध लावल्याने लवकर आराम मिळतो.

१०. बद्धकोष्ठता दूर होते :

कोमट पाण्यात शहद आणि लिंबू घातलेलं मिश्रण पिल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. हे आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे पोटाला हाइड्रेट करते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

त्यामुळे निरोगी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी नियमितपणे कोमट पाणी, मध आणि लिंबू ह्या मिश्रणाचे सेवन करावे. तसेच मध हा एवढा गुणकारी पदार्थ असल्याने आपल्या नियमित आहारात त्याचा प्रकर्षाने समावेश करावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “त्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : ह्या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही पूर्णपणे फिट राहू शकता

  • June 8, 2018 at 7:10 pm
    Permalink

    आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त माहिती आहे मला आवडली

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *