केशराचे हे उपयोग जाणून तुम्ही देखील रोज केशराचे सेवन कराल

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

केशर म्हटले की, केशरी दुध व केशरी पेढा आठवल्याशिवाय राहत नाही. मात्र ह्या केशराचे औषधीय ऊपयोग आपल्याला क्वचितच माहित असावेत.

केशराचा ऊगम हा तसा ‘ग्रीस’ देशातील आहे. तर भारताच्या ‘काश्मीर’मध्ये याचे पीक घेतले जाते. केशर म्हणजे फुलांच्या आतिल परागकण असतात.

हा सर्वात महाग मसाल्याचा पदार्थ आहे.

 

Saffron-inmarathi
shiveshpratap.com

 “केशर” पोषणमुल्ये :


खरा केशर खायचा सोडा व पाणी यांच्या मिश्रणात केशराच्या काड्या टाकल्यास त्यांचा रंग पिवळा होतो. केशर नसल्यास हा रंग तपकिरी होतो.

आता केशराचे औषधीय ऊपयोग पाहुया :

 • केशरात Carotenoid नावाचे द्रव्य असते, ज्यात Anti-cancer properties असतात. यातील Crocetin हा घटक Cerebral Oxygenation वाढवतो.
 • Urethritis,gout या व्याधीत ऊपयुक्त ठरतो.
 • मात्र liver, kidney, bone marrow Disorder मध्ये वापरू नये.
 • Vision loss (अंधत्व), Retinal degeneration यात ऊपयुक्त ठरते.
 • Insomnia (निद्रानाश) मध्ये केशराचे सेवन नियमीत करावे.
 • मेंदुचे आरोग्य अबाधीत ठेवते.

 

brain-inmarathi
newsarchive.heart.org
 • पचनास मदत करते.
 • Burn (भाजणे) च्या जखमा केशर सेवनाने लवकर बऱ्या होतात.
 • मासिक पाळीतील पोटदुखीवर अत्यंत ऊपयुक्त ठरते. या काळात स्त्रीच्या शरीरातील बदलणाऱ्या Hormones वर नियंत्रण ठेवुन mood swing टाळते. त्यामुळे PMS (pre menstrual Syndrome) मध्ये अवश्य घ्यावे.
 • ह्रदयाचे आरोग्य ऊत्तम राखते.
 • त्वचेचा रंग ऊजळतो.

आता आयुर्वेदीक दृष्टीकोन पाहुया :

आयुर्वेदाने केशर ही अत्यंत गुणकारी वनस्पती सांगितली आहे.

तारूण्यपिटीका, त्वचारोग, काळे डाग यावर तर केशर ऊपयुक्त आहेच पण तसेच त्याने रोगप्रतिकारक्षमता देखील वाढते आणि
स्मरणशक्ती सुधारते.

केशराचे ३ प्रकार सांगितले आहेत.

१. पद्मगंधी

२. मधुगंधी

३. बहलिका गंधी

यातील पद्मगंधी केशर हे श्रेष्ठ मानले जाते.

केशराचे काही ऊपयोग

 

Saffron-inmarathi02
momjunction.com

• दुध किंवा मधासोबत केशर घेतल्यास त्वचेची पोत सुधारतो.

• केशरची पेस्ट काळे डाग व मुरूम यावर ऊपयुक्त ठरते.

• ‘दशमुळ लेह्य’ या कल्पासोबत प्रसतीऊत्तर काळात केशर दिल्यास गर्भाशयातील स्नायुंना बळकटी येते.

• रोज केशरी दुध घेतल्यास स्मृती चांगली राहते.

• केशरची पावडर सुंठ व दशमुळ यांचा काढा करून त्यात मिसळुन सेवन केल्यास संधीवात व ज्वर यात ऊपयुक्त ठरते.

• याशिवाय, शिरोरोग, कृमी (worm infestation), व्यंग (frakles) यात केशर ऊपयुक्त ठरते.

 गर्भधारणेत केशरी दुध का प्यावे?

-गर्भधारणेत केशरी दुध पिल्यास मुल गौरवर्णी होते असा समज आहे मात्र वर्ण ही पुर्णतः अनुवंशीक बाब आहे. पण मातेला केशराचे सेवनाने बरेच फायदे होतात.

 

Saffron-inmarathi
momjunction.com

• Mood swingहा pregnancyतील प्रकार टाळल्या जातो.

• B. p.नियमीत राहते.

• पचनास मदत करते.

• गर्भारपणात होणारी अरूची (morning sickness) कमी होतो.

• शांत झोप लागते.

• रक्ताल्पता(Anamia) कमी होते.

त्यामुळे आपल्या आहारात ह्या बहुपयोगी केशराचा समावेश नक्की करा.

 –

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “केशराचे हे उपयोग जाणून तुम्ही देखील रोज केशराचे सेवन कराल

 • August 21, 2018 at 8:33 am
  Permalink

  good article

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *