जाणून घ्या: “गुळ” खाण्याचे तुम्हाला माहित नसलेले आरोग्यदायी फायदे

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===


भारतात गुळ हा सर्वांनाच आवडतो आणि आपल्याकडे तो आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय लाभदायक मानला जातो. आपल्याकडे मोठ्या चवीने गुळ खाल्ला जातो, एव्हाना आपल्या पदार्थांत देखील गुळ घातला जातो.

तसेच ह्या गुळात काही औषधी गुण देखील आहेत, ज्याचा उपयोग आपल्या शरीराला होतो. गुळाचे असेच काहीसे चमत्कारिक गुण आज आपण जाणून घेणार आहोत.

सांधेदुखीवर उपायकारक :

 

jaggery-usese-inmarathi
food.ndtv.com

जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यावर गुळ हे एक अतिशय चांगले औषध आहे. एक ग्लास दुधासोबत गुळ घेतल्याने हाडं मजबूत होतात. तसेच आल्यासोबत गुळचे सेवन केल्याने देखील सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

त्वचा रोग :

 

pimples-inmarathi
skincareorg.com

त्वचा संबंधी रोग असलेल्या लोकांसाठी देखील गुळ खूप लाभदायी असतो. गुल शरीरातील नुकसानकारक केमिकल्सन बाहेर काढण्याचं काम करतो. तसेच हे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्याचं देखील काम करतो.

जेवण पचविण्यास मदत होते :

 

jaggery-usese-inmarathi01
medicalnewstoday.com

पोटा संबंधीच्या अनेक आजारांत गुळ खूप फायद्याचा ठरतो. गुळ खाल्ल्यामुळे मुळे आपले पचन तंत्र सुधारते. जेवल्यानंतर गुळ खाल्ल्याने पचनक्रिया आणखी चांगली होते. डॉक्टर गर्भवती स्त्रियांना देखील गुळ खाण्याचा सल्ला देतात.

सर्दी-खोकल्यावर उपायकारक :

 

cold-inmarathi
onlymyhealth.com

सर्दी-खोकल्यापासून त्रस्त असलेल्या लोकांसाठी गुळ खाणे खूप फायद्याचे ठरू शकते. त्यामुळेच हिवाळ्यात लोक गुळ खातात. गुळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते ज्यामुळे सर्दी आणि खोकला लवकर बरा होतो.

वजन कमी करण्यातही होते गुळाची मदत :

 

jaggery-usese-inmarathi03
zeenews.india.com

गुळाचा वजन कमी करण्यात देखील फायदा होतो. ह्यासाठी रोज गुळाचा चहा घ्यावा. ह्याने वजन कमी होण्यास मदत होते.

मासिकपाळी दरम्यानचा त्रास कमी होण्यास मदत होते :

 

viagra-uses-inmarathi04
thehealthsite.com

मासिकपाळी दरम्यान अनेकांना पोटदुखीच्या त्रासाने ग्रस्त असतात. ह्या त्रासातून मुक्तता मिळविण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. गुळ खाल्ल्याने पोट दुखीचा त्रास कमी होतो.

संभोगानंतर गुळाचे सेवन करावे :

 

Sex-inmarathi
greatist.com

संभोग केल्यानंतर गुळाचे सेवन करावे त्याच्या काही वेळाने पाणी घ्यावे. असे केल्याने तुमच्या शरीराला थकवा जाणवणार नाही. त्यामुळे संभोग केल्यावर गुळाचे सेवन करणे खूप फायद्याचे ठरते.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.




2 thoughts on “जाणून घ्या: “गुळ” खाण्याचे तुम्हाला माहित नसलेले आरोग्यदायी फायदे

  • July 1, 2019 at 1:58 am
    Permalink

    I am suffering from piles deasese. I am piles patient. So can I eat jaggary every day..

    Reply
  • July 1, 2019 at 2:01 am
    Permalink

    I am suffering I am suffering from piles deasese. I am piles patient. So can I eat jaggary every day.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?