काकडीच्या बियांचे आश्चर्यकारक हेल्थ बेनिफिट्स!

===

===

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

उन्हाळ्यात काकडी ही आपल्याकडे खाल्ली जाणारी फळभाजी. काकडी ही उन्हाळ्यात आरोग्यवर्धक असतेच शिवाय काकडीत असलेल्या ग्लुकोज कंटेंट व पाण्यामुळे शरीराला होणारा डिहायड्रेशनचा त्रास जाणवत नाही. परंतु उन्हाळा वगळता काकडी कशी उपयोगी आहे याबद्दल फार कमी लोकांना माहिती असतं. तर आपण त्याबद्दल अधिक महिती घेणार आहोत.

InMarathi Android App

काकडीच्या बियांना आरोग्यशास्त्रात महत्वाचे स्थान प्राप्त आहे. काकडीच्या बियांचा मदतीने अगदी निरामय जीवन जगता येऊ शकते व अनेक गंभीर आजारांचा धोका टाळता येऊ शकतो. काकडीच्या बियांमध्ये आरोग्यवर्धक तत्व आहेत जे विविध आजारांचा धोका टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. मूत्राशयाच्या विकारांवर काकडीच्या बिया अतिशय उपयुक्त ठरतात.

अनेक लोकांना लघवी करतांना त्रास होत असतो, जर आपल्याला देखील हा त्रास होत असेल तर काकडीच्या बिया यावर सर्वोत्तम उपाय आहे. काकडीच्या १०-१५ बियांना रोज २ चमचे दही सोबत खाल्याने आठवडाभरात या त्रासातून मुक्ती मिळवता येऊ शकते.

 

cumumber-seeds-inmarathi
m.dailyhunt.in

तसेच जर लघवी करतांना जळजळ होण्याचा त्रास असेल तर त्यावरही काकडीच्या बिया हा अगदी गुणकारी उपाय आहे. ह्या बिया जळजळ कमी करून शीतलता प्रदान करतात. यासाठी काकडीच्या २० बियांचे एक महिना रोज सेवन केले गेले पाहिजे.

===
===

जर लघवीतून रक्त येत असेल तर काकडीच्या वाळलेल्या बियांचे चुर्ण बहुउपयोगी ठरते. याकरिता १ चमचा काकडीच्या बियांचे चूर्ण, १ चमचा आवळ्याचे चूर्ण अथवा आवळ्याचा रस आणि गुलकंद यांचे एकत्र मिश्रण करून रोज सेवन करा , काही दिवसांनी परिणाम दिसून येतील.

जर तुम्हाला मूत्राशयातील खड्यांचा त्रास असेल आणि अनेक औषधोपचार घेऊन सुद्धा तुम्हाला फरक जाणवत नसेल तर काकडीच्या बिया तुम्हाला वरदान ठरू शकतात. याकरिता ५ महिन्यांपर्यंत ४० काकडीच्या बियांचे नियमित स्वरूपात सेवन केले पाहिजे. बिया ओल्या असो वा वाळलेल्या असो त्या दोन्हीप्रकारे आरोग्यवर्धनासाठी उपयुक्त ठरतात.

याबरोबरच लहान मुलांचा अशक्तपणा दूर करण्यासाठी सुद्धा काकडीच्या बियांचा वापर केला जाऊ शकतो.

===
===

यासाठी दहा काकडीच्या बियांचे चूर्ण बनवा आणि एक चमचा लोणीसोबत त्याचे रोज सेवन करा. यामुळे अशक्तपणा दूर होईल. हा उपाय याबरोबरच पौरुषत्व वृद्धिंगत करण्यास ही मदतगार ठरतो. ताका सोबत जर काकडीच्या बियांचे सेवन केल्यास पोटाची जळजळ , पित्त नियंत्रित करता येऊ शकते.

 

cucumber-inmarathi
food.ndtv.com

स्त्रियांना नेहमी होत असलेल्या श्वेतप्रदराच्या समस्येवर देखील काकडीच्या बिया हा रामबाण उपाय आहे. यासाठी १ चमचा काकडीच्या बियांचे चूर्ण सेवन एका केळाबरोबर आणि बारीक कुटलेल्या एक चमचा मिश्री बरोबर करायचे, यातून श्वेतप्रदराच्या समस्येवर एक सकारात्मक परिणाम दिसून येतो असा आजवर चा अनुभव आहे.

अश्याप्रकारे काकडी हे अत्यंत बहुपयोगी औषधी गुणधर्म असलेली फळभाजी आहे, तिच्या बियांचे सेवन फक्त उन्हाळ्यात न करता सर्व ऋतूत केले पाहिजे. काकडीच्या आरोग्यवर्धक तत्वांच्या सेवनाने निश्चितच निरामय व रोगविरहीत आयुष्य जगता येऊ शकते.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *