येशूचा आशीर्वाद इतरांना मिळवून देणारा, स्वतःला वाचवू शकला नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या कित्येक टीव्ही चॅनल वर अमुक तमूक नावाचा बाबा किंवा बाई येतात आणि सरळ डॉक्टर आणि देवापेक्षा सुद्धा स्वतःला श्रेष्ठ समजून सर्रास लोकांची फसवणूक करत असतात!

भाईगिरी नंतर भोंदूगिरी नावाचं घरबसल्या उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण झालं आहे. पावसाळ्यात बेडकाच्या छत्र्या उगवाव्यात तसे भोंदूबाबा ‘हर गली, हर नुक्कड’ वर दिसू लागले आहेत. धर्म कोणताही असो भोंदूगिरीचे सगळीकडे पेव फुटलेले आहे.

युट्यूब किंवा फेसबुक बघताना आपल्याला काही व्हीडिओ दिसतात. त्यात कोणी भोंदू पास्टर ‘हुडुं गुडूम बुहाहाहा हा हा हा हा हा’ करताना जोर जोराने ओरडत असतो.. त्याचा आवाज कमी असतो की काय म्हणून तो माईक घेऊन किंचाळत असतो..

 

bhondu baba inmarathi
webduniya

 

येशूच्या भक्तीत ‘तल्लीन’ झालेले हौशी ‘अभिनेते गण’ (आधीच ऍडव्हान्स घेतलेले) मग हैदोस घालायला सुरुवात करतात..कसला हैदोस..??

तर अशाच एका भोंदू माणसाबद्दल आपण जाणून घेऊया, सबस्टियन मार्टिन हे नाव सगळ्यांनाच माहित असेल किंवा याचा चेहरा एकदातरी पाहिला असेलच, तो जरी आता या जगात नसला तरी त्याची भोंदूगिरी सर्वांना ठाऊक आहेच!

त्याचे व्हिडियो आजही युट्युब वर पाहायला मिळतील आणि त्यातला कारभार बघून आपली फार करमणूक होते!

सबास्टियन मार्टिन नावाचा स्वयंघोषित पास्टर ओरडणार.. जोरजोरात हातवारे करणार.. आणि मग त्याच्या समोरचे हट्टे कट्टे पहिलवान धपकन खाली पडणार!

काही हातानी टाळ्या वाजवू लागणार.. काही स्वतः बरोबर आणखी तीन चार जणांना ओढून खाली पडणार..

 

healer-pastor-inmarathi
india.com

 

यातला एखादा उठुन सावरण्याचा प्रयत्न करायला लागतो तोवर हा पास्टर येतो आणि पुन्हा त्याच्यावर मंत्र टाकतो ‘हू हा हा हा हा भू हा हा हा हा’.. ‘रा रा रा रा’ आणि तो गरीब बिचारा भक्त पुन्हा एकदा पिसाळतो..

काही जण मदतीला उभे राहतात.. पडलेल्यांना उचलतात.. आणि दुसऱ्यांना उचललं की, स्वतःला मिळालेल्या ऍडव्हान्सची आठवण म्हणून की काय हे सुद्धा तमाशा सुरू करतात..

सबास्टीयन पास्टर ‘जादूगार रघुवीर’ सारखा स्टेज वरूनच सगळ्यांना हाताने उलटं पालटं पाडत असतो.जोरजोराने ‘रा रा रा रा रा रा रा’ करायचं आणि लोकांना मोठी शक्ती दिल्याच्या अविर्भावात स्टेज वर वावरायचं.

लोक पडत राहतात आणि हा पास्टर मैदान गाजवल्यासारखा भाव खात राहतो!

 

martin inmarathi
zee news

कोणी उड्या मारत असतं तर कोणी डोळे मिटून टाळ्या पिटत असतं.. कोणी ज्याच्या त्याच्या अंगावर पडत असतं तर, कोणी झोपून साष्टांग नमस्कार घालत असतं.

मजेशीर नौटंकी चालू राहते.. लहान मुलांना हे दाखवल्यास, १५-२० मिनिटे सर्कशीचे विदूषक पहिल्यासारखे ते मजेने खुदूखुदू हसतील..

टोपडी घालणाऱ्या स्त्रियाही कमी नाहीत. त्याही माकडचेष्टेत रमून गेलेल्या असतात. त्यांना असली थेरं करताना आपले कपडे कसे आहेत, पदर कुठे चाललाय हेही कळेनासे होते. सगळ्यांना (पैसे मिळाले आहेत तर आता) शो पूर्ण यशस्वी करून दाखवायचा असतो..

पांढरी साडी आणि टोपड्यातील पास्टरच्याच गोटातील काही बायका एकेकीला सावरण्याचे निष्फळ प्रयत्न करताना दिसतात.. पण खोटं नाटं अंगात आणलेल्याला काय सांभाळणार..? बरं हे सगळे ‘वॉर्म अप’ चे प्रकार झाले की मग सुरू होते प्रार्थना सभा..

हल्ली होम-हवन, यज्ञ-यागही सुरू झालेत प्रभू येशूसाठी. संस्कृत श्लोक आणि जपासाठी नाम वगैरे पण असते.

गरीब घरातील माणसांना जबरदस्तीने आपला धर्म बदलायला लावून त्यांना असल्या नाटकांमध्ये समाविष्ट करताना कोणतीही लाज लज्जा बाळगली जात नाही.

त्यांना खोटी स्वप्ने दाखवून, त्यांच्यावर प्रभू येशू कृपा करेल असे सांगून धर्मांतर कारायला भाग पाडले जाते.अशी भोळी-भाबडी माणसे असल्या भोंदुंच्या नादाला लागून आपलं आयुष्य बरबाद करत असतात..

त्यांची ही प्रार्थना सभा म्हणजे देखील माकडचाळेच असतात.. एकेक गरीब तोंडावळ्याच्या माणसाला किंवा स्त्रीला २-४ जणं पकडून स्टेज वर आणतात.. ती व्यक्ती आपल्याला काय काय होतंय हे डॉक्टरला सांगण्यापेक्षा पास्टरलाच सांगणे पसंत करते..

 

 

हा पास्टर लगेच ‘अपुनीच भगवान है’ ह्या अविर्भावात त्या व्यक्तीला मोठी शक्ती प्रदान करतो.. फक्त ‘रा रा रा रा रा’ केलं की झालं निदान. पुढच्या काही दिवसांनी ती स्त्री टोपडं बांधून २ पांढऱ्या साडीवाल्यांबरोबर पुन्हा येते आणि आपले ‘येशूकृपेचे’ अनुभव कथन करते.

‘माझ्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या. डॉक्टरांनी मला १० दिवसांचे आयुष्य सांगितलेले. पण देवासारख्या पास्टर सबास्टीयन मार्टिननी मला लगेच बरे केले.. मला येशू दिसले, त्यांनी आशिर्वाद दिला वगैरे वगैरे…’

ही डायलॉग बाजी केल्यावर लगेच पाकिटातून मानधन मिळत असावे. म्हणून असे गरीब बिचारी शे-पाचशे रुपयांसाठी अशी नौटंकी करताना दिसून येतात.

धर्मांतरांसाठी ही स्पॉन्सरशीप भारताबाहेरून येते असेही म्हटले जाते.

तर असा हा सबास्टीयन मार्टिन नामक पास्टरबुवा सगळ्यांना नुसत्या त्याच्या दैवी ‘रा रा रा रा रा’ शक्तीवर बरे करतो. (की उल्लू बनवतो?). प्रथमदर्शनी हे व्हीडिओ खूपच विनोदी आणि मनोरंजक वाटतात.

 

pastor-aashirwad-inmarathi
localpress.com

 

नंतर मात्र ही भोंदुगिरी बघून प्रचंड राग येतो. गरिबांना देवाच्या नावावर फसवणे हाही एक धंदाच झालेला आहे. ह्याच्या मागे खूप मोठे मोठे लोकही असतात. पण बळीस पडतो तो सर्वसामान्य गरीब माणूस.

कोण होता हा सबास्टीयन मार्टिन?

कॉलेज मधील प्रोफेसर असलेला हा उच्च शिक्षित स्वतः पास्टर म्हणून वसई विभागात चर्च मध्ये काम बघायचा.

‘आशिर्वाद प्रेयर सेन्टर’ नावाची संस्था सुरु केली जिथे तो रुग्णांना प्रभू येशूच्या आशीर्वादाने बरे करायचा. त्याने खूप जणांना अशाच जादुई आशीर्वादाने बरे केल्याचे त्याचे भक्तगण सांगतात. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने तो प्रसिद्ध झाला होता!

फेल झालेल्या किडन्या बऱ्या करणे, हार्ट पेशंट ला बरा करणे, टी. बी. रुग्ण बरे करणे असे रेकॉर्ड त्याच्या नावे झाले!

काळी जादू, जादुटोणा करण्याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन त्याच्या आशिर्वाद प्रेयर सेन्टरवर बंदी आणली.

हा इसम १७ ऑगस्ट २०१६ रोजी त्याच्या घरी मृत आढळला. सबास्टीयन मार्टिन हा गंभीर मधुमेहाचा रुग्ण होता.

 

sabestian-martin-death-inmarathi
youtube.com

 

येशूच्या आशीर्वादाने इतरांचे मोठे मोठे असहाय्य रोग बरे करणारा स्वतःवर का बरे उपचार करू शकला नाही..? ज्यावर इतकी प्रभू कृपा आहे तो स्वतः ला मृत्यूपासून वाचवू शकला नाही. स्वतःच आजारही बरा करू शकला नाही.

 

paaster inmarathi
hindustan times

 

इतरांना कितीही फसवले तरीही सत्य काही लपुन राहिले नाही. हा पास्टर एकटाच नाही अजूनही शेकडो व्हीडिओ सापडतील. धर्माच्या नावावर केरळ, काश्मीर, बंगाल मध्येही हत्याकांड झालीत.

मोठ-मोठी संकटं, आपत्तीच्यावेळी असे भोंदू बाबा कुठे असतात?? केरळच्या पुरामध्ये कुठे होते?? त्या वेळी मदतीला धावून जादू का नाही केली? हा विचार करायला हवा.अशा सापांना आपणच दूध पाजतोय.

अशा भोंदुंवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी त्यांचा पोकळपणा लक्षात घ्यायला हवा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “येशूचा आशीर्वाद इतरांना मिळवून देणारा, स्वतःला वाचवू शकला नाही!

 • March 10, 2019 at 7:25 pm
  Permalink

  पास्टरांन बद्दल लेख लिहिता समाजा मध्ये खूप भोंदू बाबा आहेत जरा त्यांचे पण पित्तळ उघड करा.अंगात यांच्या देव येतो जरा बाॕर्डर वर पाठवा असल्या देव अंगात येणाऱ्या भोंदू बाबांना

  Reply
 • March 27, 2019 at 5:46 am
  Permalink

  See He was Rapper before Ranveer Singh,
  He sang “Apna Time Ayega” Long back
  I used to teach this Crook Accounting in the College

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?