आईला कॅन्सर झाला, आणि त्याने बदलायचं ठरवलं! जे घडलं ते केवळ अविश्वसनीय आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

रावदीप हा पंजाबच्या फारवाही गावाचा एक तरुण ज्याने डिफेन्स स्टडीज मधून एमएची पदवी मिळवली आहे.रावदीपच्या घरी सहा एकर शेती आहे, त्यामुळे बालपणापासूनच माती आणि निसर्गाशी जुळलेले त्याचे नाते कधीही तुटले नाही. एमए झाल्यावरही त्याने शेती करण्याचाच निर्णय घेतला.

“सुरुवातीला जेंव्हा मी आईला बोललो की मला शेतीच करायची आहे तेंव्हा आई नाराज झाली. तुला शिकवण्यासाठी मी घेतलेले कष्ट वाया गेले,” असं म्हणाली.

पण, जेंव्हा मी प्रत्यक्षात शेती सुरु केली तेंव्हा माझा मुलगा कोणत्याही अडचणींवर मात करून सहज उभा राहू शकतो, याचा तिला अभिमान वाटू लागला. शेती हेच जेंव्हा रावदीपचा अर्थार्जनाचा मुख्य स्त्रोत बनला तेंव्हा स्वतःतील क्षमता सिद्ध करण्याची संधी त्याने सोडली नाही.

सुरुवातीला इतर शेतकऱ्यांप्रमाणेच रावदिप देखील भरपूर पिक म्हणजे भरपूर नफा हे सूत्र डोक्यात ठेवूनच शेती करत होता. आणि भरपूर नफा कमावण्यासाठी तो रासायनिक खाते आणि कीटकनाशकांचा अमर्याद वापर करत असे.

 

Moms-Cancer-Makes-Farmer-Go-Organic-Grows-Chemical-Free-Food-Saves-60-Water Inmarathi
The Better India

पण, रावदीपच्या आयुष्यात एक दिवस असा उगवला की त्याला या खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर म्हणजे आपल्याच हाताने निसर्ग, पर्यावरण, हवा-पाणी आणि सोबत मानवी जीवनाचा विनाश ओढवून घेतल्यासारखे आहे, जेंव्हा त्याच्या आईला कॅन्सर झाल्याचे समजले.

आईला कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी दवाखान्यात जाई तेंव्हा त्याच्या लक्षात येत गेले की ही कीटकनाशके किती धोकादायक आहेत. मोठी माणसेच नाहीतर लहान मुलांना देखील या रोगाने आपला बळी बनवले होते.

हे पाहून रावदिपला मोठा पश्चताप ताप झाला. पर्यावरण असो किंवा मानवी जीवन असो कुणालाही दुखावण्याचा आपल्याया काहीही अधिकार नाही, याची त्याला जाणीव झाली.

“शेवटी एवढा नफा मिळवून मी करणार तरी काय होतो. या कीटकनाशकांच्या विळख्याने माझाही घर सोडलं नाही. लहान लहान मुलांची तडफड तर अजिबातच सहन होत नाही.

केमिकल्स आपल्या आरोग्याला हानिकारक असतात हे मला माहित होतं.

 

ChemicalFertilizer Inmarathi
TaskEasy

परंतु, जेंव्हा माझी आई आजारी पडली तेंव्हा मला कळाल की आपण जे पिकवतोय ते विष आहे. केमिकल नाही वापरायचे मग शेती करायची तरी कशी? कारण त्यावेळी रसायने वापरून शेती करण्याचाच प्रघात होता.”

त्यानंतर रावदीप ‘खेती विरासत मिशन’च्या संपर्कात आला. शेतकऱ्यांचा हक्कासाठी लढणारी आणि अन्न सुरक्षेसंबाधी सुरक्षेची काळजी घेणारी शेतकऱ्यांना वरचेवर सेंद्रिय शेती कशी करावी याचे प्रशिक्षण देणारी ही एक सेवाभावी संघटना आहे.

शेवटी २०१२ पासून रावदीपने सेंद्रिय शेती करण्याचा निश्चय केला. “सुरुवातीला मी भातशेती करण्याचे थांबवले.

सेंद्रिय पद्धतीने हे पिक घेण्यासाठी खूप मोठा कालावधी जावा लागतो आणि हे पूर्ण सुकवल्याशिवाय, बाजारपेठेत त्याला कोणी भाव देत नाही. ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गव्हाची पेरणी लांबणीवर पडते.

तांदळाच्या उत्पादनाच्या बाबतीत पंजाब देशात तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. २.९७ दशलक्ष हेक्टर भूभागावर तांदळाचे पिक घेतले जाते.

सेंद्रिय शेती करण्यासाठी…

“सेंद्रिय शेती करण्याचा माझा निर्णय अगदी योग्य होता. मी रसायन-मुक्त, कीटकनाशक-मुक्त आणि विष-मुक्त असलेली संपूर्ण आरोग्यदायी पिके घेतो याचे तर समाधान मिळतेच, परंतु याठिकाणी शेतीचे विविध प्रयोग शिकता येतात.

 

Organic fertilizers Inmarathi
Gardener’s Supply

एकाच वेळी अनेक पिके घेता येतात. रोज येणाऱ्या नवनव्या आव्हानांना सामोरे जाताना नव्या गोष्टी आत्मसात करता येतात.”

सहा एकराच्या शेतीवर रावदीप डाळी, कडधान्ये, पालेभाज्या, मसाले अशी विविध प्रकारची पिके घेतो. अगदी १०-१५ प्रकरच्या भाज्या पिकवण्यापासून ते २० प्रकारच्या फळझाडे देखील त्याने उभी केली आहेत.

धान्यांमध्ये मका, गहू, ज्वारी, त्याचबरोबर मुग, तूर, उडीद, मसूर, तेलबिया, सरसो, आणि अरहर अशी कडधान्ये देखील तो पिकवतो. पेरू, लिंबू, द्राक्षे,किवी, इडलींबू, केळी, आंबा, खजूर यांची देखील झाडे त्याच्या शेतात आहेत.

कीटकनाशकांचा मारा टाळण्यासाठी तो अंतर-मशागत पद्धती वापरतो. अनेक प्रकारच्या भाज्यांची पेरणी तो एकाच वेळी करतो. यामुळे कीड नियंत्रणात राहते असे त्याचे म्हणणे आहे.

तसेच अंतर-मशागतीमुळे जमिनीचा कस आणि कीटकनाशकांचा मारा होण्याचे प्रमाण देखील कमी होते. शेतात जितक्या प्रकारचे कीटक, जंतू असतील त्यांचा शेतीसाठी फायदाच होतो.

कीटकनाशकांचा फवारा करून त्यांना मारून टाकण्यात काहीच अर्थ नाही कारण, ते देखील पर्यावरणाचाच एक भाग आहेत.

 

saini-seeds-and-pestisides-haridwaar-haridwar-seed-retailers-4bt73vz Inmarathi
Justdial

शेतात त्याने एक एकर जमीन राखून ठेवली आहे अगदी तंतोतंत जंगलासारखी दिसते. तिथे माणसांना हस्तक्षेप करण्यास बंदी आहे. त्यामुळे इथे अनेक फळ झाडे, औषधी झाडे आणि इतर प्रकारची झुडुपे यांची भरघोस वाढ झालेली आहे.

शेतीचा कस वाढविण्यासाठी तो हिरव्या खतांचे प्रयोग करतो. इथे उपटून टाकलेले हिरवे गवत आणि पिकांचा काही टाकावू भाग यांच्यापासून हिरवे खत तयार केले जाते. हे सर्व जमिनीवर पसरून टाकले जाते ज्यामुळे जमिनीचा कस वाढतो.

फक्त खतासाठी म्हणून अशा हिरव्या गवतांचे पिक घेतले जाते. वाळलेला पालापाचोळा, डहाळ्या, फांद्या आणि शेण यापासून कंपोस्ट खात बनवून त्याचा देखील वापर केला जातो.

ओल्या गवताचा खाताप्रमाणे वापर केल्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

“सेंद्रिय शेती करताना,जवळपास ६०% पाण्याची बचत होते. पिकाची वाढ आणि त्याचा दर्जा देखील कितीतरी पटीने अधिक चांगला असतो.”

 

ravdeep4 inmarathi
The Better India

या पद्धतीने शेती केल्याने नांगरणीचे काम वाचते त्यामुळे शेतीतील ५०% मशिनरीचा वापर देखील कमी होतो. रावदीप पूर्वी २.५ लाखाचे कर्ज घेऊन ५० एचपी पॉवर असलेला ट्रॅक्टर घेणार होता परंतु याप्रकारे शेती केल्याने त्याला फार मोठ्या मशिनरीची गरज पडत नाही.

सध्या शेती सांभाळण्यासाठी तो छोट्या छोट्या मशिनरीचाच वापर करतो.

कंपोस्ट खत आणि रासायनिक खतांचा वापरक बंद केल्याने त्याचा उत्पादन खर्च अत्यंत कमी झाला आहे. ताणाचा उपयोग खात म्हणून केल्याने जमिनीचा कस चांगला सुधारतो कारण, पिकांपेक्षा तणांची वाढ अधिक होते.

हा असा शेतकरी आहे ज्याला शेतातील ताणाचा अजिबात त्रास होत नाही.

आलेल्या उत्पादन तो बर्यापैकी शेतकऱ्यांचा आठवडी बाजारात विकतो. जिथे त्याला दुध, तूप यांसारखे इतर पदार्थ देखील विक्रीसाठी ठेवता येतात. फळांना तर बाजारपेठेत जास्तच मागणी आहे.

सेंद्रिय शेतीमुळे तुझ्या कमाईवर काही परिणाम झाला का असे त्याला विचारले असता, तो म्हणतो, अशा प्रकारे केलेल्या शेतीचा फायदा आठवड्याला किंवा महिन्याला दिसत नाही.

रासायनिक शेती करून शेतकरी जेवढे कमावतो तितके सेंद्रिय शेतीतून कमावण्यासाठी वेळ जावा लागतो. परंतु, यातून दीर्घकाळ मिळणारे फायदे अधिक आहेत.

 

Raavdeep agriculture Inmarathi
ravdeep4 inmarathi

“आमच्या कुटुंबाच्या आहारात आरोग्यदायी अन्नपदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने घरात कोणीही आजारी पडण्याचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे अर्थातच दवाखान्याचे पैसे वाचतात. एकाच वर्षात आम्हाला घरगुती पिकवलेले रसायन-मुक्त, कीटकनाशक-मुक्त असे वीस प्रकारची फळे खायला मिळतात.

अशी फळे बाजारातून महागड्या किमतीने विकत आणून खाणे आम्हाला परवडले असते का? सेंद्रिय शेतीमध्ये आर्थिक फायद्यापेक्षा जीवनशैली सुधारण्यास जास्त फायदेशीर ठरते.

माझ्या गरजा आणि माझ्या इच्छा यातील समतोल कसा राखायचा हे मला चांगले माहित असल्याने यातून मिळणाऱ्या नफ्यावर मी समाधानी आहे. नैसर्गिक शेतीतून तुम्हाला हेच शिकायला मिळते.

पंजाब तसेच भारतातील शेतकऱ्यांना रावदीपचा एकच संदेश आहे, “जर आपण आपल्या शेतात रसायनांचा अतिरिक्त वापर केला तर, पुढच्या दोन दशकातच संपूर्ण पंजाबचे वाळवंट होईल आणि तेही विषारी वाळवंट.

त्यामुळे पंजाबला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल आणि आपला देश सुखी समृद्ध करायचा असेल तर, सेंद्रिय शेतीकडे वळल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. सेंद्रिय शेती करणे ही काळाची गरज आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?