कुत्र्यांच्या आत्महत्येसाठी कुप्रसिद्ध असलेला ‘रहस्यमयी पूल’!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


जगात इतक्या विचित्र गोष्टी घडतात की त्यांवर थेट विश्वास ठेवणे कठीण होऊन बसते पण त्या खरोखर घडत असतात. याच विचित्र गोष्टींमधून जन्म होतो रहस्यांचा. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका रहस्यमय गोष्टीबद्दल माहिती देणार आहोत. तुम्हाला भारतातील जतिंगा गावाबद्दल माहित असेलच, जेथे पक्षी अचानक आत्महत्या करण्यास सुरुवात करतात, नसेल माहित तर तुम्ही हे वाचलंच पाहिजे- भारतातील एक गाव जेथे दरवर्षी पक्षी करतात आत्महत्या!

असाच काहीसा प्रकार घडतो, विदेशामध्ये, फक्त येथे पक्षी नाही तर कुत्रे आत्महत्या करतात, हाच काय तो फरक!

dog-suscide-marathipizza02
petslady.com

स्कॉटलंडच्या डांबार्टन जवळ एक गाव आहे मिल्टन. येथे एक पूल आहे जो कुत्र्यांना आत्महत्या करण्यासाठी आपल्याकडे आकर्षित करतो. ६० च्या दशकापासून आतापर्यंत ह्या पुलावरून उडी मारून जवळपास ६०० कुत्र्यांनी आत्महत्या केली आहे. १८५९ मध्ये बनवल्या गेलेल्या ह्या पुलाचे नाव ओवरटॉन पुल आहे. १९५० ते १९६० च्या दशकामध्ये याला पहिल्यांदा कुत्र्यांच्या आत्महत्या होतात हे लक्षात आले.

dog-suscide-marathipizza01
youtube.com

ह्या पुलावरून कुत्रे कोणत्याही कारणाशिवाय अचानक उडी मारतात आणि ५० फूट उंचावरून पडून त्यांचा मृत्यू होतो. काही प्रकरणांमध्ये जर उडी मारून जर एखादा कुत्रा जिवंत राहिलाच तरी तो पुन्हा पुलावरून उडी मारून आत्महत्या करत असे. सारख्या होणाऱ्या आत्महत्या बघून ह्या पुलावर चेतावनी देणारा बोर्ड लावण्यात आला होता.


dog-suscide-marathipizza03
mirror.co.uk

विचित्र गोष्ट तर ही आहे की, जेवढया पण कुत्र्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या सगळ्या रहस्यमयी होत्या,ह्या सर्व आत्महत्या ओवरटॉन पुलाच्या एकाच बाजूने केल्या गेल्या होत्या,आणि खास  करून एकाच जागेवरून केल्या गेल्या होत्या.त्यामुळे या दगडी पुलामध्ये नक्की काय रहस्य आहे, जे या कुत्र्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे, त्याचा शोध आजही सुरु आहे.

dog-suscide-marathipizza04
lostateminor.com

काही लोकांचे म्हणणे आहे कि, या पुलावर वाईट शक्तीचे सावट आहे. १९९४ मध्ये एका माणसाने आपल्या मुलाला ओवरटॉन पुलावरून खाली फेकून दिले होते आणि सांगितले की तो मुलगा अँटी क्राईस्ट आहे.नंतर काही महिन्यांनी त्या माणसाने ही त्याच पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

dog-suscide-marathipizza05
damadenegro.wordpress.com

आणखी एका दाव्यानुसार, ओवरटॉन पूल अश्या जागेवर आहे, जिथे जिवंत आणि मृत व्यक्तींचे जग एकत्र येते आणि असे मानले जाते की, माणसाला न दिसणाऱ्या गोष्टी कुत्र्यांना चांगल्याप्रकारे जाणवतात. या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन या पुलावर बोर्ड लावून आपल्या कुत्र्यांना सांभाळून सावधानी बाळगून ठेवण्यास सांगितले आहे.

dog-suscide-marathipizza06
jessycartman.tumblr.com/

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?