पाण्याखाली ३ दिवस मृत्यूशी झुंज!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===


आजवर लोकांचे चमत्कारिकरित्या प्राण वाचल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या किंवा पाहिल्या आहेत. अश्या घटना पाहिल्या की देवाचे अस्तित्व नाकारता येत नाही. कारण अश्या चमत्कारिकरित्या वाचलेल्या व्यक्ती इतक्या बिकट परिस्थितीमध्ये असतात की तेथून स्वत:ची सुटका होइल यावर त्यांचा देखील विश्वास नसतो आणि जेव्हा या व्यक्ती त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडतात आणि बाहेर येऊन सांगतात की तो काळ कसा सोसला तेव्हा आपल्या लोकांचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसतं नाही. आता आम्ही तुम्हाला अशीच एक कहाणी सांगणार आहोत जी वाचून तुम्ही देखील म्हणालं, “देव तारी त्याला कोण मारी”

harrison-marathipizza

स्रोत

अटलांटिक महासागरात बुडालेल्या आणि सुमारे १०० फूट खोलीवर तळाशी विसावलेल्या बोटीतील मृतदेह काढण्याचे काम सुरू होते. पाणबुड्यांनी त्या बोटीतून चार मृतदेह आधीच बाहेर काढले होते. या सर्व कामावर पाण्याखाली टीव्ही कॅमे-याद्वारे देखरेख ठेवली जात होती. अचानक टीव्हीच्या स्क्रीनवर एक हात दिसू लागला. तो हात आणखी एका मृतदेहाचा असावा, असे सर्वानाच वाटले. त्यामुळे पाणबुडे त्या हाताच्या जवळ सरकले. पण ज्या पाणबुड्याने तो हात पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या हातानेच त्या पाणबुड्याला पकडले आणि त्या पाणबुड्यासहित सर्वाच्याच अंगावर भीतीने शहारे आले.

तो कोणताही भुताटकीचा प्रकार नव्हता आणि तो हात मृतदेहाचा नव्हता. तर जी बोट बुडाली होती त्या बोटीवर काम करणारा नायजेरियन स्वयंपाकी हॅरिसन ओडजेग्बा ओकिने याचा होता. पाण्याखाली १०० फुटांवर असलेल्या त्या बोटीच्या आत हा स्वयंपाकी तीन दिवस जिवंत राहिला होता. बोटीच्या आत एका ठिकाणी हवेची पोकळी तयार झाली होती. त्या पोकळीत शिल्लक असलेल्या ऑक्सिजनवर हॅरिसन तीन दिवस तग धरू शकला. ही घटना २०१४ मध्ये घडली होती.

harrison-marathipizza01


स्रोत

पाण्याखाली असलेल्या या बोटीत त्याचे तीन दिवसांचे वास्तव्यदेखील थरारक आहे. ज्या वेळी ही बोट बुडाली त्या वेळी हॅरिसनच्या अंगावर केवळ एक हाफ पँट होती आणि अटलांटिक महासागरात पाण्याखाली असताना तापमान गोठणबिंदूच्या जवळ गेल्यावर त्या कडाक्याच्या थंडीत तो देवाचा केवळ धावा करीत राहिला.

harrison-marathipizza03

स्रोत


पाण्याखाली ७२ तास राहिल्यावर जिवंत सुटका होणे म्हणजे खरोखरच दैवी चमत्कार आहे, असे खुद्द हॅरिसन मानतो.
हॅरिसनचा हात जेव्हा त्या पाणबुडयांनी पाहिला आणि त्या हाताने त्या पाणबुड्याला पकडले तेव्हा सर्वच घाबरून गेले होते. मात्र, पाण्याखाली कोणीही जिवंत असण्याची शक्यता नसताना एक व्यक्ती जिवंत आहे हे पाहिल्यावर त्या भीतीचे रूपांतर आनंदात झाले. या बोटीवर एकूण ११ जण होते व त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला.

harrison-marathipizza02

स्रोत

दैव बलवत्तर असेल तर माणूस कोणत्याही संकटातून सहीसलामत सुरु शकतो हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं.

 


लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?