' प्लास्टिक बॉटल्समधील पाणी खरंच सुरक्षित आहे का ? जाणून घ्या. – InMarathi

प्लास्टिक बॉटल्समधील पाणी खरंच सुरक्षित आहे का ? जाणून घ्या.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणत्याही ठिकाणी फिरायला गेल्यावर आपण जास्त करून तिथले पाणी पिण्याचे टाळतो. कारण आपल्याला त्या ठिकाणचे पाणी कसे आहे याबद्दल काहीही कल्पना नसते. त्या पाण्याने कदाचित आपली तब्येत बिघडू शकते, अशी आपल्याला भीती वाटत असते.

त्यामुळे आपण बिस्लेरी किंवा इतर कोणते तरी बॉटलमध्ये बंद असलेले पाणी पिण्यासाठी विकत घेतो. जेणेकरून आपल्याला पाण्यामुळे कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये.

 

Bottled water.Inmarathi
macleans.ca

 

आजकाल आपल्या घरामध्ये येणारे पाणी देखील कितीतरी भेसळीचे असते. ज्याच्यामुळे आपल्या विविध प्रकारचे आजार जडतात. त्यामुळे ते पाणी स्वच्छ करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवतो. आपण त्यासाठी ते पाणी उकळतो, तसेच घरामध्ये वॉटर प्युरीफायर लावतो.

आपल्या घरामध्ये येणारे पाणी शुद्ध नाही, असे देखील आपल्याला जेव्हा – जेव्हा वाटते, तेव्हा देखील आपण या बाटलीमधील पाण्याच्या मोठमोठ्या कंपन्यांवर विश्वास ठेवून त्याचा वापर पिण्यासाठी करतो. पण जगभरामध्ये बाटलीमध्ये बंद असलेल्या पाण्याच्या गुणवत्तेविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे, जी सगळ्यांनाच आश्चर्यात टाकणारी आहे.

 

Bottled water.Inmarathi1
myslimquick.com

 

अमेरिकेच्या एका रिसर्चमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जगभरामध्ये ९३ टक्के बाटलीमध्ये बंद असलेल्या पाण्यामध्ये प्लास्टिकचे बारीक कण मिसळलेले असतात. हा दावा अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये स्थित असलेल्या स्टेट युनिव्हर्सिटीने केला आहे.

भारत धरून जगातील नऊ देशांमध्ये बाटलीत बंद असलेल्या पाण्याचा पुरवठा करणारी ११ ब्रॅन्डच्या कंपन्यांच्या पाण्याची जेव्हा तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यातून असे समजले की, ते पाणी पिण्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. रिसर्च करणाऱ्या टीमने या ब्रॅन्डच्या २७ लॉटमधील २५९ बाटल्यांना तपासले.

 

Bottled water.Inmarathi2
youthvoices.net

 

रिपोर्टनुसार, रिसर्च करणाऱ्यांना तपासणीच्या दरम्यान एक लिटरच्या बाटलीमध्ये १०.४ मायक्रोप्लास्टिक पार्टिकल्स मिळाले. रिसर्चमध्ये १०० मायक्रोन आणि ६.५ मायक्रोन आकाराच्या दूषित कणांची ओळख करण्यात आली.

तुम्हाला यामध्ये हे ऐकून अजून आश्चर्य वाटेल की, यामध्ये एक्वाफीना, एव्हीयन, बिस्लेरी यांसारख्या आणि इतर अजून काही मोठ्या ब्रॅन्डचे नाव देखील समाविष्ट आहे.

यासाठी लागणारे सॅम्पल्स भारतात आणि जगातील इतर नऊ देशांमध्ये बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ११ ब्रॅन्डच्या कंपनींमधून घेण्यात आले. भारतामधून नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमधून सॅम्पल्स जमा करून त्यांची तपासणी करण्यात आली.

 

Bottled water.Inmarathi3
nypost.com

 

या रिसर्चमध्ये अजून एक गोष्ट सांगण्यात आली, जी घाबरवणारी आहे. यामध्ये हे सांगण्यात आले की, जो माणूस दररोज एक लीटर बाटलीमध्ये बंद असलेले पाणी पितो, तो माणूस वर्षाला प्लास्टिकचे १० हजार सूक्ष्म कण त्या पाण्याबरोबर ग्रहण करत असतो.

भारतामध्ये अशा लोकांची संख्या कोटीमध्ये आहे, ज्यांना गरजेपोटी आर्सेनिक, फ्लोराइड आणि युरेनियम यांची भेसळ असलेले पाणी प्यावे लागते. जे त्यांच्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक असते. त्यामुळे कधीही कोणतेही पाणी पिताना ते बघून प्या आणि नेहमी बाटलीमध्ये बंद असलेले पाणी पिणाऱ्या लोकांनी ते पाणी पूर्णपणे शुद्ध असल्याचे नीट तपासून घ्या.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?