तुमच्या नकळत आरोग्यावर घाला घालणा-या या सवयी वेळीच बदलल्या नाहीत तर नंतर पश्चाताप करावा लागेल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जर तुम्ही नेहेमी सर्दी-खोकला, एलर्जी, श्वासासंबंधी त्रास, अंग दुखणे अश्या आजारांनी ग्रासलेले असाल. तर त्यामागे हेदेखील एक कारण असू शकते की तुमच्या आजारांसाठी तुमच्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी ह्यासाठी जबाबदार असू शकतात.

अनेकदा आपण आपल्या आजूबाजूला हवी तेवढी स्वच्छता ठेवत नाही ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

 

cleanliness-inmarathi
rd.com

ही सवय बहुतेकांना असते. म्हणजे ब्रश केल्यावर नेहेमी आपण आपला टूथब्रश बाथरूममधेच सोडून देतो. ह्यामुळे आपल्या टूथब्रशमध्ये बॅक्टेरिया तयार होतात. आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याच ब्रशने दात घासतो आणि हेच आपल्या आजाराच कारण बनते. त्यामुळे कधीही ओळ ब्रश बाथरूममध्ये सोडू नका. त्याला वळवून बाहेर ठेवावे. डेंटिस्टच्या मते दर २-३ महिन्याला टूथब्रश बदलायला हवा.

 

cleanliness-inmarathi01
wanista.com

अंघोळ केल्यावर स्क्रबर बाथरूममध्ये सोडू नये, त्यामुळे त्या स्क्रबरमध्ये बॅक्टेरियाज निर्माण होऊ शकतात. ह्याचं स्क्रबरला परत वापरल्याने ते आजाराचे कारण ठरू शकते.

 

cleanliness-inmarathi02
globalnews.ca

भांडी घासायच्या स्पंजमध्ये देखील ओलाव्यामुळे बॅक्टेरियाज निर्माण होऊ शकतात. हेच बॅक्टेरिया भांड्यांना लागून आजाराचं कारण ठरू शकतात. त्यामुळे एकदा वापरलेला स्पंज हा वळवून परत वापरावा.

 

cleanliness-inmarathi03
zopper.com

एका रिसर्च नुसार फ्रीजमध्ये सर्वात जास्त बॅक्टेरिया असतात. त्यामुळे वेळोवेळी फ्रीज साफ करणे आवश्यक आहे.

 

 

cleanliness-inmarathi04
salon.com

दरवेळी हात स्वच्छ करण्यासाठी हॅण्ड सॅनिटॅझरचा वापर केल्याने बॅक्टेरिया त्यांच्याकडे रेजिस्टंट होऊन जातात. अॅण्टिबायोटिक औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो. जर गरज नसेल तर हात स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा फक्त पाणी वापरावे.

 

cleanliness-inmarathi06
dubaiclean.com

एसीची वेळोवेळी स्वच्छता न केल्यास त्यात बॅक्टेरिया होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दर महिन्याला एसी स्वच्छ करत राहावे.

जर आजारांपासून दूर राहायचं असेलं तर आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?