श्रीमंत बाजीराव पेशवे : एकही लढाई न हारता मराठा साम्राज्याची पताका भारतभर फडकविणारा योद्धा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
बाजीराव पेशवे म्हणजे मराठा साम्राज्यातील एक महान सेनापती…त्यांनी १७२० सालापासून आपल्या मृत्यूपर्यंत चौथे मराठा छत्रपती शाहू महाराज यांची पेशव्याच्या (प्रधानमंत्री) रुपात सेवा केली. बाजीरावांनी आपल्या कार्यकाळात मराठा साम्राज्याला एका मोठ्या उंचीवर नेले होते.
आपल्या २० वर्षाच्या लहानग्या पण पराक्रमी कारकीर्दीमध्ये बाजीराव एकही लढाई हरले नाहीत हीच गोष्ट त्यांच्या महानतेचे दाखले देते.

बाजीरावांचे प्रारंभिक जीवन
बाजीरावांचा जन्म कोकनस्थ चितपावन ब्राम्हण वंशाच्या कुटुंबामध्ये १८ ऑगस्ट १७०० मध्ये झाला होता. त्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ, छत्रपती शाहू यांचे प्रथम पेशवे (प्रधानमंत्री) होते. त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते. बाजीरावांच्या छोट्या भावाचे नाव चिमाजी अप्पा होते.
बाजीराव लहान असतानाचा आपल्या वडिलांबरोबर युद्ध मोहिमेवर जात असत. जेव्हा १७२० मध्ये बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला तेव्हा शाहू महाराजांनी २० वर्षाच्या बाजीरावांना पेशवे (प्रधानमंत्री) म्हणून नियुक्त केले. बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा भारतभर डंका वाजवला.
दिल्लीच्या तख्तावर मराठा ध्वज फडकवणे हे बाजीरावांचे ध्येय होते.
लहान वयातच बाजीरावांना मिळाले पेशवे हे पद
जेव्हा बाजीरावांना पेशवे (प्रधानमंत्री) बनवले गेले, तेव्हा छत्रपती शाहू महाराज साताऱ्यामध्ये आपल्या महालातूनच राज्यकारभार सांभाळायचे, परंतु राज्याच्या रक्षणाची खरी जबाबदारी पेशव्यांच्या हातात होती. बाजीरावांना तरुण असतानाच पेशवे म्हणून नियुक्त केल्यामुळे सर्व वरिष्ठ मंत्री जसे नारो राम मंत्री, आनंद राम सोमंत आणि श्रीपत राय हे बाजीरावांचा मत्सर करत असत.
दक्षिणेत मोघल सुभेदार निजाम-ऊल-मुल्क असफजाह आपले स्वतंत्र साम्राज्य प्रस्थापित करू इच्छित होता आणि त्याकरता तो मराठा अधिकाऱ्यांना आव्हान देऊ लागला.

निजामांच्या विरोधात मोहीम
२७ ऑगस्ट १७२७ मध्ये बाजीरावांनी निजामांच्या विरोधात मोहीम उघडली. त्यांनी हल्ला करून निजामाचे जालना, बुरहानपुर आणि खानदेश उध्वस्त केले. जेव्हा बाजीराव पुण्यापासून दूर होते तेव्हा निजामाने पुण्यावर आक्रमण केले. जेथे दुसरे संभाजी कारभार पाहत होते.
२८ फेब्रुवारी १७२८ मध्ये बाजीराव आणि निजामाचे सैन्य पल्खेडच्या लढाई मध्ये एकमेकांसमोर आले. निजाम पराभूत झाला आणि त्याला करार करून स्वत:ची कातडी वाचवावी लागली. या करारानुसार मराठ्यांनी दक्षिनेणेमधून कर वसूल करण्याचा हक्क मिळवला.
१७२८ मध्ये बाजीरावांनी आपले बस्तान सासवड वरून पुणे येथे हलवले आणि या छोट्या शहराचे एका महानगरामध्ये रुपांतर केले. बाजीरावांनी मुठा नदीच्या किनाऱ्यावर शनिवारवाडा तयार करण्यास सुरुवात केली जो १७३० मध्ये पूर्ण झाला, जिथून पेशवे संपूर्ण राज्यावर नियंत्रण ठेवत असतं.
माळव्याची विजयी मोहीम
१७२३ मध्ये बाजीरावांनी माळवाच्या दक्षिणी भागांमध्ये मोहीम सुरु करण्याची योजना बनवली. मराठा मंत्री माळव्याच्या कित्येक भागांमधून कर वसूल करण्यात यशस्वी झाले होते. मराठा साम्राज्याचा विरोध करण्यासाठी मोघल बादशाहाने गिरधर बहादूरला माळव्याचा शासक म्हणून नियुक्त केले.
निजामला हरवल्यानंतर बाजीरावांचे लक्ष आता माळव्यावर होते. ऑक्टोबर १७२८ मध्ये बाजीराव आपले छोटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली एक विशाल सेना घेऊन माळव्याकडे कूच करू लागले.
चिमाजींच्या सैन्याने अमझेराच्या लढाई मध्ये मोघलांना पराभूत केले. या लढाईत गिरधर बहादुर आणि त्याचा सेनापती दया बहादुर ठार झाला. पुढे चिमाजींनी उज्जैनकडे सुद्धा कूच केली परंतु रसद कमी पडल्याने त्यांना करार करावा लागला. १७२९ पर्यंत मराठा सैन्य सध्याच्या राजस्थानपर्यंत पोहोचले होते.
बुंदेलखंड मोहीम
बुंदेलखंडात छत्रसाल याने मोघल साम्राज्याच्या विरोधात उठाव केला आणि आपले स्वतंत्र साम्राज्य स्थापित केले. डिसेंबर १७२८ मध्ये मोहम्मद खानच्या नेतृत्वाखाली मोघलांनी छत्रसालला हरवून त्याच्या कुटुंबियांना कैद केले. छत्रसालने बाजीरावांकडे मदत मागितली पण तेव्हा बाजीराव माळवा मोहिमेमध्ये व्यस्त होते.
शेवटी मार्च १७२९ मध्ये पेशव्यांनी छत्रसालला मदत पाठवली आणि मराठ्यांनी बुंदेलखंडाकडे कूच केली. छत्रसाल कैदेतून सुटला आणि मराठा सैन्यामध्ये समाविष्ट झाला. या संयुक्त आघाडीने जशी जैतपुरकडे कूच केली त्याच क्षणी मोघलांना बुंदेलखंड सोडावा लागला आणि बुंदेलखंड परत एकदा छत्रसालच्या अधिपत्याखाली आला.
छत्रसालने एक मोठी वतनदारी बाजीरावांना दिली. डिसेंबर १७३१ मध्ये आपल्या मृत्युच्या अगोदर देखील छत्रसालने आपले काही भाग मराठ्यांच्या नावे केले.

गुजरात मोहीम
मध्य भारतात मराठी वर्चस्व वाढवण्यासाठी बाजीरावांनी गुजरातला आपले लक्ष्य बनवले. १७३० मध्ये चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली एका तुकडीला गुजरातला पाठवण्यात आले. गुजरातचा मोघल सुभेदार सरबुलंद खान याने मराठ्यांच्या समोर समर्पण केले आणि त्यांना गुजरातचा कर वसूल करण्याचा अधिकार दिला.
सेनेवर असणाऱ्या बाजीरावांच्या नियंत्रणाला कंटाळून शाहू महाराज्यांचा सेनापती त्रिंबकराव याने मराठ्यांविरुद्ध उठाव केला. त्याला गुजरातच्या दोन मराठा मंत्र्यांनी पाठींबा दिला. मोघल बादशाहने मोहम्मद खान बंगाशला गुजरात परत मिळवण्यासाठी पाठवले. बंगाशने त्रिंबकराव दाभाडे आणि इतर दोन मंत्र्यांसोबत संयुक्त सेना बनवली. दाभोईच्या लढाईमध्ये त्रिंबकरावचा मृत्यू झाला.
बाजीरावांचे व्यक्तिगत जीवन
बाजीरावांची पहिली पत्नी काशीबाई होय. तिला तीन मुले होती. बाळाजी (नाना साहेब), रघुनाथ राव आणि जनार्दन राव. १७४० मध्ये बाजीरावांच्या मृत्युनंतर नानासाहेब पेशव्यांचे उत्तराधिकारी बनले.
बाजीरावांची दुसरी पत्नी मस्तानी होती. मस्तानी आणि बाजीराव यांचा एक मुलगा होता, तो समशेर बहादुरच्या नावाने ओळखला गेला. सहा वर्षाचा असल्यापासून त्याला काशीबाईंनी वाढवले होते. १७६१ मध्ये मराठा आणि अफगाण यांच्यामध्ये झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात वयाच्या २७ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
–
- या मुघल बादशाहने काढला होता चक्क “गोहत्या प्रतिबंधक” फतवा!
- छत्रपती संभाजी महाराज आणि काल्पनिक नायिका गोदावरी
–
बाजीरावांचा मृत्यू
२८ एप्रिल १७४० मध्ये ३९ व्या वर्षी बाजीरावांचा मृत्यू झाला. त्यावेळी बाजीराव आपल्या सैन्यासमवेत इंदौर शहराच्या जवळ खारगोन जिल्ह्यामध्ये होते. बाजीरावांचे नर्मदा नदीच्या काठावर रावरखेडी नावाच्या ठिकाणावर अंतिम संस्कार करण्यात आले, त्यांच्या आठवणीमध्ये या ठिकाणावर एक वास्तू देखील उभारण्यात आली आहे.

मराठा साम्राज्याचा या महान सेनापतीला मानाचा मुजरा!!!
–
- मोहम्मदखान बंगशाला रणांगणात धूळ चारणाऱ्या बाजीरावांची पराक्रमगाथा
- जेव्हा मुठभर मराठे दहा हजारांच्या गनीमाला कापून काढतात…!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Chitpavan Brahman ha Jo ullekh tumhi. Kela. Tyavarun tumhisudha deshasth ka tatsam konitari Brahman watata. Aho peshve he shiv chatrapatinche sevak hote . Astpradhan mandalatil pahile peshve Moropant Pingle hote. Je ki shivrayanche sevak hote. Aho Pune shahar. Shivajirajani vasavle. Vhukicha itihas sangun brahmanshahiche stom. Badwu naka.
Aata te Brahmin hote mhtlyavr ullekh tr honarch.Ani jri te shahunche sevak asle tri jo prakrm tyanni kelay to nakarta yenar nahi ani yat chukich kay ahe.Jr koni khup motha parakrm gajvla ani ti vyakti ek Brahmin asli tr prtyek veli to itihas chukicha ahe he boln kitpt yogy aahe??
ha etihas tar sangla tumhi… ki 1 pan ladhai harli nahi, tar mag jara chatrapati shambhu raje cha pan ethas sanga na.. tyancha pan etihas khup motha aahe jyachyapudhe peshvyan cha ethas kahich nahi..
ह्या आधीच आपण छत्रपती संभाजी राजे ह्यांच्यावर कितीतरी उत्कृष्ट लेख प्रसिद्ध केले आहेत.
Ajinkya Chatrapati Sambhaji Maharaj……… घात कॆला काही बांडगुळांनी नाहीतर इंग्रज पण भारतात आलॆ नसतॆ.
Apan asa jati jatin madhe bhandala nahi pahije. Hi Shivajimaharajanchi shikvan nahi. Apan asa apapsat bhandun ulat tyanchyach shikvanicha avman krtoy. Apan asa kryla nahi pahije.