रामायण- महाभारत सिरियल्स सुरू झाल्यामुळे हिंदू पुराणांचं “हे” उत्कृष्ट वास्तव समोर आलंय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : आशीष देवडे

===

Mythological सिरियल्स ह्या फक्त religious message देतात हे एक ‘लेबल’ मी आणि माझ्यासारख्या बऱ्याच लोकांनी इतक्या वर्षात लावून टाकलं होतं.

कदाचित मधल्या काळात तयार झालेल्या सिरियल्स चा दोष असेल हा. मागच्या पंधरा दिवसात पटलं की, तो काळ, त्याचं सादरीकरण हे योग्यपणे फक्त रामानंद सागर आणि बी आर चोपडा यांनाच दाखवता आलं.

लॉकडाउनच्या दिवसात बहुतांश लोकांचा दिवसभरातील कोणता वेळ जर का कोरोना चे विचार येण्यापासून मन divert करत आहे तर तो म्हणजे रामायण आणि महाभारत चे चार तास.

 

ramayana inamarathi 3
scroll.in फोटो- प्रातिनिधिक

 

हे फक्त मी म्हणत नाहीये तर त्या सिरियल्स ने तोडलेले टीआरपी चे रेकॉर्ड्स, वाढलेल्या जाहिराती सुद्धा सांगत आहेत. त्या काळात रस्ते मोकळे असायचे.

आज काल मी बघतोय की, त्या वेळात एक ही मेसेज whatsapp वर येत नाही. ना कोणत्या व्यक्तीचा ना कोणत्या ग्रुप वर. ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आज काल.

सध्या सकाळी आणि संध्याकाळी होणारं ‘सात्विक मनोरंजन’ ही एक समाधानाची बाब आहे.

आता पर्यंत प्रसारित झालेल्या भागात आजही implement करण्याची गरज असलेली बरीच जीवन मूल्ये (values) पहायला मिळाली. त्या काळात एक तर आपण लहान होतो आणि खूप लोक एकत्र येऊन कॉमन टीव्ही बघायचो.

 

ramayan tv inmarathi
india.com

 

माझ्यासाठी तरी हे सगळं ज्ञान झिरपण्याची हीच पहिली वेळ आहे.

Acceptance –

रामायण बघताना जेव्हा राम काहीही विरोध न करता १४ वर्ष संन्यास घ्यायला तयार होतात आणि कोणालाही दोष देत नाहीत. हे जर आजकालच्या जगात imagine जरी केलं तरी imagination मध्ये सुद्धा आपण accept करणं अवघड आहे.

 

ramayana inamarathi 2
sagar world

सध्या आपण बघतच आहोत. २१ दिवस घरात बसवणं हे सुद्धा किती अवघड जात आहे आपल्या प्रशासनाला. कारण, मुळात काही लोकांनी हा धोका, हा लॉकडाउन accept केलाच नाहीये.

बळजबरी करून पोलीस तरी किती करतील ? त्यात आपल्याकडे असलेले विविधतेने राहणारे लोक. कोणाचं काही चुकत आहे हे कोणी समोर येऊन त्यांना सांगत नाही. कडक शिक्षा होत नाही. त्याचा त्रास मात्र सर्वांना होतो.

 

Aggression –

लक्ष्मण चा रोल जे पहिल्यापासून पाहत आहेत त्यांना त्याचं aggression हे नक्कीच आवडलेलं असावं. जे सत्य आहे ते सत्य आहे हे म्हणायची धमक त्याच्यात होती.

 

lakshaman inmarathi
hindusatn times

 

आज काल हे सुद्धा लोक विसरत चालले आहेत. नको तिथे aggression दाखवतात.

खरं aggression जर आपल्याला दाखवायची इच्छा असेल तर जेव्हा कोरोना चीन ने हेतुपुरस्सर तयार केलेला वायरस आहे हे जाणवतंय तरी सुद्धा आपल्यातले काही त्यांच्या Tik Tok वर विडिओ करण्यात व्यस्त आहेत.

एकत्र १० करोड लोकांनी जरी uninstall केलं तरी काही तरी झळ पोहोचेल चीन ला. पण ते ही आपल्याला convince करावं लागतं लोकांना हे दुर्दैव.

बाकी चीन च्या वस्तू घेऊ नये या प्रत्यक्ष आमलात यायला खूप वर्ष जातील. पण ज्या अनावश्यक वस्तू आपण बाळगून आहोत त्या तरी आपण फेकून देऊच शकतो.

 

Attachment –

भरत आणि राम यांच्यातील attachment ज्याने बघितली त्याला लक्षात आलं असेल की नातं म्हणजे काय असतं.

 

bharat and ram inmarathi
dainik bhaskar

 

आज काल आपण attachment ला expectations आणि ego ची जोड देतो आणि त्याला मजबूत होण्याआधीच कमजोर करतो.

मेसेज ला blue tick आल्या पण उत्तर नाही दिलं की लगेच काहींना राग येतो. जे समजूतदार असतात ते कायम समजूनच घेत असतात.

 

Origin –

या दोन्ही सिरियल्स मधील काही पात्रांचा आलेख जेव्हा बघतो आपण तेव्हा फार आश्चर्य वाटतं. म्हणजे कृष्ण जन्म झाला त्या जेल मध्ये. त्याच्या नंतर त्याचा प्रवास हा सर्वश्रुत आहे.

 

krishna bansuri InMarathi

 

अर्थात, त्याच्याशी आपली तुलना होऊ शकत नाही. पण, निदान मी कुठून आलोय आणि मला कुठपर्यंत जायचंय याबद्दल एक लिमिटेशन्स आपण ठेवलेल्या असतात. त्या आपण पुसून टाकू शकतो असे पात्र बघितल्या वर.

 

Appreciation –

रामायण मधील प्रत्येक पात्रांचे संवाद हे ऐकण्यासारखे आहेत. किती ते अदबीने बोलणं. कोणाचं पूर्ण वाक्य संपल्यावरच आपलं वाक्य सुरू करणं. विरोध सुद्धा त्याच स्वरात दर्शवणं.

ज्याचं बोलणं पटलं त्याला त्वरित त्याच्या धन्यतेची पावती देणं. आता कोण करतं असं? इथे लाईक देताना लोक विचार करतात. लाईक म्हणजे मी याला सहमती दिली असं होईल.

 

ramayana inamarathi 1

 

मी तर असा नाहीये. इतका विचार होतो. त्याच्या विरुद्ध, एखाद्या गोष्टीवर टीका करायला किती तरी लोक हात धुवून तयारच असतात. विषय कोणताही असो. त्याबद्दल ज्ञान असो वा नसो.

तुम्हाला सुद्धा काही इतर वेगळ्या गोष्टी जाणवल्या असतीलच. कदाचित शब्दातीत करण्याच्या पलीकडे असतील. काही जण या विषयावर आपलं मत मांडलं तर स्वतःला कोणतं ‘लेबल’ लागेल या विचाराने टाळत असतील.

असो. मी यापुढे असा काही विचार करणार नाहीये. कोणती तरी एक बाजू चांगली म्हणजे दुसरी खराब असं होत नाही. त्या निमीत्ताने ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना सर्वांनी एकत्र बघू शकतो असा content available झालाय हेच नशीब.

अजून एक, कधी कधी हेच मुद्दे एखाद्या इंग्रजी पुस्तकात सापडले की त्याचं भरभरून कौतुक केलं जातं किंवा एखाद्या motivation speaker ने त्याच्या presentation मध्ये सादर केल्या की त्याला लोक standing ovation देतात.

तेच मी इथे द्यायचा प्रयत्न करतोय.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?