' बियर पिताय? जरा सांभाळून, जर्मनीतल्या १४ बियर्समध्ये आढळलाय Glyphosate! – InMarathi

बियर पिताय? जरा सांभाळून, जर्मनीतल्या १४ बियर्समध्ये आढळलाय Glyphosate!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

The Munich Environmental Institute (Umweltinstitut München)ने फेब्रुवारीत केलेल्या laboratory टेस्ट्समध्ये एक धक्कादायक बाब समोर आलीये, जर्मनीत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या १४ बियर्समध्ये Glyphosate हा “probable carcinogenic (कर्करोगाला प्रोत्साहन देणारा )” element आढळलाय!

२०१५ साली WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईझशनच्या IARCने Glyphosateला “probable human carcinogenic” घोषित केलं होतं!

The German Brewers’ Association ने ह्या टेस्ट results ना “not credible” म्हटलंय. पण low residue आढळल्यास त्यात काही आश्चर्य नाही असही ते म्हणाले. कारण गेल्या दशकात कृषी क्षेत्रातल्या त्याच्या वापरामुळे ते टाळणं शक्य नाही असं त्यांच म्हणणं आहे.

Sustainable Pulse चे Director Henry Rowlands म्हणतात, ” ह्या chemicals चा थोडासा डोस देखील hormone hacker अर्थात (endocrine disruptor ) सारखा काम करतो. IQ पातळी कमी होणे, प्रौढांमध्ये लठ्ठपणा वाढणे, autism सारखे दुष्परिणाम ह्या endocrine disruptors मुळे होतात. Glyphosate हा देखील त्यातलाच!”

 

jarman-beer-inmarathi

 

जर्मन बियर – Glyphosate Tests चे Results:

Hasseroder Pils – 29,74 μg/l (ppb)
Jever Pils – 23,04 μg/l
Warsteiner Pils – 20,73 μg/l
Radeberger Pilsner – 12,01 μg/l
Veltins Pilsener – 5,78 μg/l
Oettinger Pils – 3,86 μg/l
König Pilsener – 3,35 μg/l
Krombacher Pils – 2,99 μg/l
Erdinger Weißbier – 2,92 μg/l
Paulaner Weißbier – 0,66 μg/l
Bitburger Pils – 0,55 μg/l
Beck’s Pils – 0,50 μg/l
Franziskaner Weißbier – 0,49 μg/l
Augustiner Helles – 0,46 μg/l

मोन्सॅन्टो ह्या कंपनीचा Glyphosate कृषी क्षेत्रात सोडण्याचा सर्वात मोठा वाटा आहे.

ह्या कंपनीने भारतातही उच्छाद मांडलाय. मोन्सॅन्टोने बी – बियाणं यांचं patent घेऊन लोकांच्या जीवनावरच प्रभुत्व स्थापन केलंय. मोन्सॅन्टोचा GMO शी असलेला संबंध आपल्याला माहीतच आहे. १९८८ साली वर्ल्ड बँकेने भारतावर लादलेल्या Seed Policyमुळे मोन्सॅन्टोला भारतात प्रवेश मिळाला.

jarman-beer-inmarathi01

 

BT Cotton आपल्याला माहीतच आहे. त्याचं सर्वात जास्त उत्पन्न महाराष्ट्रात होतं. भारतीय सरकारच्या माहितीनुसार, ७५% शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या ह्या खरेदीकरिता घेतलेल्या कर्जामुळे होतात आणि मोन्सॅन्टोने ह्या क्षेत्रात उडी घेतल्यापासून आत्महत्त्या वाढल्या आहेत, आता हा योगायोग समजावा का? मोन्सॅन्टोचं रॉयल्टी वसूल करणं तसेच बियाण्यांच्या आणि केमिकल्सच्या किमती ह्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेत. GMO चांगलं कि वाईट हा मुद्दा नाही, पण आकडेवारी तर खोटं बोलत नाही ना?

 

jarman-beer-inmarathi02

भारतातल्या बियर्सवर देखील laboratory tests व्हायला हव्या. अशा productsना, बियाण्यांना लोकांनीच बहिष्कृत करायला हवं! technologyला विरोध नाही पण काही अतिमहत्त्वाच्या बाबी जर जाणूनबुजून लपवण्यात येत असतील तर ह्यांचा हेतू नक्की काय आहे याचा विचार देखील आपण करायला हवा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?