‘तिने’ ८ वर्षांपासून होत असलेल्या बलात्काराचा बदला त्याचे गुप्तांग कापून घेतला!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्या समाजात अंधश्रद्धा कोणत्या थराला पोहोचल्या आहेत ह्याची कल्पना करवत नाही. नवनव्या प्रकरणावून असं जाणवत रहातं की दिवसेंदिवस आणखी नीच पातळी गाठली जात आहे.

धर्माच्या नावाखाली ढोंगीपणा करणाऱ्या साधूंची चंगळ बळावत आहे. लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांचा गैरफायदा घेणे हा त्यांच्या खरा धंदा! त्यातल्या त्यात धर्म आणि संस्कृतीच्या आडून आपली वासना शमवण्यासाठी निष्पाप तरुणी आणि स्त्रियांचे आयुष्य बरबाद करणाऱ्या या नराधमांना कायद्याने नाही तर पीडितांचनी स्वत: शस्त्र हातात घेऊन जन्माची अद्दल घडवावी, असे मत आपल्यातील अनेक लोक नेहमीच मांडत असतात.

असाच एक प्रकार केरळ मध्ये घडलाय, जेथे पिडीत तरुणीने स्वत:च स्वत:वरील अत्याचाराचा ‘बदला’ घेऊन एका ढोंगी साधूला तो आयुष्यभर विसरणार नाही असा धडा शिकवला आहे.

 

knife-marathipizza02
indiatimes.com


कायद्याचा अभ्यास करणाऱ्या तिरुअनंतपुरम येथील एका २३ वर्षीय तरुणीवर गेल्या ८ वर्षांपासून एक ढोंगी साधू बलात्कार करीत होता. ५४ वर्षीय या साधूचे नाव गणेशनंद असून तो तिरुअनंतपुरम येथीलच पनामा आश्रमात तळ ठोकून होता. तो पीडित तरुणीवर शाळेत असल्यापासून बलात्कार करत होता. पण या शुक्रवारी मात्र तिच्या संयमाचा बांध तुटला होता, तिने कायमचा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा विचार केला. साधूच्या येण्यापूर्वी तिने एक सुरा आपल्या जवळ बाळगला होता.

 

knife-marathipizza01
hindustantimes.com

जेव्हा त्याने पुन्हा आपल्या वासनेची भूक तिच्याकरवी भागवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्या नरकमय परिस्थितीतून आपली सुटका करुन घेण्यासाठी तिने साधूचं गुप्तांगच कापून टाकलं. या आरोपी साधूची परिस्थिती सध्या नाजूक आहे.

 

kerala-marathipizza
indiatimes.com

तरुणीने स्वत: पोलीसांपुढे हजर होत आपण स्वसंरक्षणासाठी हे पाऊल उचलल्याचे कबूल केलंय.

पीडित तरुणीचे पालक या साधूचे भक्त होते. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पिडीत तरुणीच्या आईला देखील साधूची ह्या हीन कृत्याची माहिती होती, पण तिने कधीही त्याला विरोध केला नव्हता. त्यामुळे या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये तरुणीच्या आईला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. केवळ अंधश्रद्धेपोटी आपल्या मुलीला अश्या नरकयातना सहन करण्यास भाग पडणाऱ्या ह्या आईबद्दल काय बोलावं?

ह्या चीड आणणाऱ्या प्रसंगामुळे काही प्रश्न निर्माण होताहेत…जे आपल्याला बेचैन करून सोडतील.

असल्या साधू बाबांमुळे आपला धर्म बदनाम होतो, हे धर्माभिमानी, धर्मप्रेमी लोकांना समजत नाही का? समजत असेल तर अश्या भोंदू बाबांना शोधून शोधून त्यांना कायदेशीर शिक्षा घडवण्यास एखादी मोहीम सुरू का होत नाही?

त्या मुलीच्या अत्याचाराने परिसीमा गाठली होती – हे तर घटना वाचल्यावरच जाणवतं. आपल्या पोटची पोर अश्या नरक यातनांत जगत आहे हे तिच्या आईला कसं देखवलं? अंधश्रद्धेची ही किती भयंकर लेव्हल आहे?

ह्या भोंदू बाबा आणि आईच्या ह्या उदाहरणाला, त्या मुलीच्या धाडसी कृत्यामुळे वाचा फुटली. पण असे अनेक प्रकरणं आजही घडत असतीलच. अश्या विकृतीशी लढण्यासाठी शासन-प्रशासन आणि आपण सर्व सुजाण नागरिक तयार आहोत का? कधी होणार आहोत?

हे सर्व कसं थांबणार? कधी थांबणार?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “‘तिने’ ८ वर्षांपासून होत असलेल्या बलात्काराचा बदला त्याचे गुप्तांग कापून घेतला!

  • September 15, 2018 at 11:09 pm
    Permalink

    bhayanak

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *