मोदी द्वेषापोटी सेना अध्यक्षांच्या वक्तव्याचा विपर्यास : अहंकारी अट्टाहासाची अगतिकता

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सध्या शेंडा ना बुडखा असणारी कोणतीही गोष्ट ओढून खेचून ताणून धापा टाकत मोदींशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याबिगर लोक बुद्धिवाद वगैरे सिद्ध करू शकेनासे झालेत. मग आशा वेळी एखादा narrative मोदींना पूरक ठरू शकेल अशी शंका जरी आली तरी असे बुद्धिवादी लोक येनकेन प्रकारेण तो narrative कसा मुद्दाम उभा केला गेला वगैरे आकांडतांडव करायला लागतात.

संदीप दीक्षित सेनाअध्यक्ष बिपीन रावतांना विनाकारण सडक का गुंडा बोलून गेले. नंतर माफी बिफी मागितली. पण तरीही दिक्षितच कसे बरोबर हे ठासून सांगणे निव्वळ खोडसाळपणा आहे. मुळात दीक्षितांची शब्दांची निवड चुकलीये हे मान्य न करता “सेनेच्या अध्यक्षांवर टीका का नाही करायची” वगैरे बोलल्याने बुद्धिवाद सिद्ध होत नाही. तिथे अट्टाहास सिद्ध होतो. आपण  बोलतोय ते कितीही illogical असलं तरी आधीच ठरवून ठेवलेल्या भूमिकेला जस्टीफाय करण्याचा अट्टाहास! असत्य आहे, अतार्किक आहे तरीसुद्धा “आम्ही म्हणू तेच खरं” – हा स्वभक्तीचा अट्टाहास!

dikshit-rawat-marathipizza

 

स्वभक्त कोण? तर – ज्या त्या नेत्यांचे अंध समर्थन करणाऱ्यांना ज्या त्या नेत्याचे भक्त म्हणले जाते. पण केवळ एखाद्या नेत्याविषयी आकस बाळगून “आम्हालाच सगळे कळते, आमचा प्रचंड अभ्यास” अश्या अविर्भावात वावरून इतरांच्या मताला किंमत न देता फक्त आम्ही सांगतो तोच बुद्धिवाद म्हणणारे स्वभक्त असतात.

खरं तर सर्वकाही कळत असून मान्य नसणाऱ्या, स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या छद्म बुद्धिवाद्यांना सत्य परत परत सांगण्याची तशी गरज नाही. तरीसुद्धा – ह्या इंग्लिश कच्चे असणाऱ्यांसाठी खास अनुवाद आणि मेंदू वर्किंग कंडिशनमध्ये नसणाऱ्यांसाठी मोफत तात्पर्ये!

सेना प्रमुखांच्या भाषणातील विवादास्पद उत्तरं पूर्ण वाचून बघा. स्रोत आहे PTI .

“This is a proxy war and proxy war is a dirty war. It is played in a dirty way. The rules of engagements are there when the adversary comes face-to-face and fights with you. It is a dirty war… That is where innovation comes in. You fight a dirty war with innovations,”

हे एक प्रातिनिधिक युद्ध आहे आणि प्रातिनिधिक युद्ध घाणेरडे असते. घाणेरड्या पद्धतींनी लढले जाते. जेंव्हा शत्रू समोरासमोर येऊन तुमच्याशी भिडतो तेंव्हा लढाईचे काही नियम असतात. (पण) हे घाणेरडे(प्रतिनिधीक) युद्ध आहे….म्हणून इथे नवोन्मेष पद्धती जन्माला येतात. प्रातिनिधिक युद्ध तुम्ही नवोन्मेष पद्धती वापरून लढता.”

प्रॉक्सी वॉर लढताना पारंपरिक युद्धाचे नियम आणि एथिक्स पाळून उपयोग नसतो. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ‘Allways Fight with honor’ सारखा attitude घेऊन प्रॉक्सी वॉर जिंकता येत नसतात.
“People are throwing stones at us, people are throwing petrol bombs at us. If my men ask me what do we do, should I say, just wait and die? I will come with a nice coffin with a national flag and I will send your bodies home with honor. Is it what I am supposed to tell them as chief? I have to maintain the morale of my troops who are operating there,”

“लोक आमच्यावर दगडं फेकतात. पेट्रोल बॉम्ब फेकतात. माझ्या जवानांनी मला (प्रत्युत्तरादाखल) काय करावे म्हणून विचारले तर मी असं म्हणू का की, वाट पहा आणि मरा? मी तिरंग्यासोबत एक छानशी शवपेटी घेऊन येईन आणि तुमची प्रेतं आदराने तुमच्या घरी पाठवेन? त्यांचा मुख्य अध्यक्ष म्हणून मी हे म्हणायला हवं का? तिथे जे सैनिक कार्यरत आहेत मला त्यांचे मनोधैर्य संभाळावेच लागेल”

सैनिकांचे काम लढणे, नागरिकांची सुरक्षा आणि शांतीसाठी. पण जेव्हा काही नागरिकच सैनिकांशी लढायला लागले तर? हीच ती प्रॉक्सी वॉर जिथे शत्रू तुमच्या काही नागरिकांचा वापर तुमच्याविरुद्ध करायला लागतो. इथे ना गोळी घालता येते ना दुर्लक्ष्य करता येतं. म्हणून परिस्थिती सांभाळण्यासाठी नवीन नवीन क्लुप्त्या लढवाव्या लागतात. (संदर्भ : मेजर गोगोई)

“In fact, I wish these people, instead of throwing stones at us, were firing weapons at us. Then I would have been happy. Then I could do what I (want to do),” he said.

“खरं म्हणजे, ह्या लोकांनी दगडं फेकायच्या ऐवजी आमच्यावर शस्त्रांनी गोळीबार करायला हवा होता, तेंव्हा मला आनंद झाला असता. तेंव्हा मी ते करू शकलो असतो जे मला (करायचे आहे)”

दगडं फेकणारे उघड दुश्मनी निभावत आहेत. भारताच्या सार्वभौमत्वाला अव्हान देत आहेत. पण ते आपलेच नागरिक असल्याने परिस्थिती अजून बिकट आहे. हां, जर भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे असे लोक दगडांच्या ऐवजी बंदुकी घेऊन समोर आले असते तर त्यांच्याशी निपटणे सोपे झाले असते. तिथे एकच चॉईस उरतो. एन्काऊंटर, जो सध्या आहे त्या परिस्थिती पेक्षा तुलनेने सोपा उपाय आहे.

“Adversaries must be afraid of you and at the same time your people must be afraid of you. We are a friendly army, but when we are called to restore law and order, people have to be afraid of us,”

“शत्रूंनी तुम्हाला भिऊन असले पाहिजेत त्याच वेळेला तुमचे लोक सुद्धा तुम्हाला भिऊन असायला हवेत. आम्ही एक मैत्रीपूर्ण सैन्य आहोत, पण जेव्हा आम्हाला कायदा व सुव्यवस्था पुनर्संचयीत करण्यास सांगितले जाईल तेंव्हा लोकांना आमची भीती वाटावयासच हवी”

भारतीय सेनेचा धाक असायलाच हवा. शत्रूला आणि देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्याला देखील. जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणी देशाच्या आरोग्याला घातक परिस्थिती निर्माण होईल आणि सैन्यावर तिच्याशी निपटण्याची जबाबदारी असेल तेंव्हा त्या परिस्थितीला कारणीभूत असणारे लोक भ्यायलाच हवेत. मग ते शत्रू असोत की शत्रूला सामील असणारे नागरिक!

कोणताही बुद्धिवादी (खरा) हा अर्थ सहज समजेल. स्वभक्त नाहीच समजू शकणार!

समजूनच घ्यायचे नसेल तर 2+2=2002.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Suraj Udgirkar

A small town person who loves to write, read & then wrangle about it. usual business.

suraj has 27 posts and counting.See all posts by suraj

One thought on “मोदी द्वेषापोटी सेना अध्यक्षांच्या वक्तव्याचा विपर्यास : अहंकारी अट्टाहासाची अगतिकता

  • July 12, 2017 at 6:49 am
    Permalink

    Kharach Congress che Aandhale Gandhi Bhakt yevadhe shefarle aahet satta nahi mhanun te janatepane muddam Bhartiya Sainikan chi Ninda-Nalasti karu lagale aahet. Ase gandhi-bhakt Deshachya Virodhi karvaya karayla ghabarnar naahit. Shame on these peoples.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?